ताज्या घडामोडीपिंपरीमावळसांस्कृतिक

आपण जे नाटक पाहतो त्यात खूप आनंद आणि समाधान – अलका कुबल – आठल्ये

Spread the love

 

नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नाटकाशी माझी नाळ जोडलेली आहे. आपण जे नाटक पाहतो त्यात खूप आनंद आणि समाधान मिळून जाते, असे प्रतिपादन अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांनी केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील गोळवलकर मैदान येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ‘कला गौरव पुरस्कार’ महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम विशाखा सुभेदार व पंढरी कांबळे यांना अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार सुनील शेळके, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष जनार्धन रणदिवे, नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद तळेगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे, बबनराव भेगडे, गणेश काकडे, विलास काळोखे, संग्राम जगताप, बसवराज पाटील, ॲड.सुभाष मोहिते, सरदार याज्ञसेनी दाभाडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अलका कुबल – आठल्ये म्हणाल्या, की नाट्य परिषदेने कला गौरव पुरस्कारासाठी नेमक्या व्यक्तींची निवड केली आहे. विशाखा सुभेदार व पंढरी कांबळे यांनी रसिकांना भरभरून हसविले आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान केल्याने मनाला समाधान मिळाले आहे.
भाऊसाहेब भोईर म्हणाले, की शहराची प्रसिद्धी किती इन्फ्रास्ट्रक्चर आहे, यावर नसते; तर सांस्कृतिक वातावरण कसे आहे, यावर अवलंबून असते. कलापिनी, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद या संस्थामुळे तळेगावच्या नवलौकिकात मोठी भर पडली आहे.
दरम्यान, नाट्य परिषदेचे सल्लागार चंद्रकांत भिडे यांना अमृत महोत्सवानिमित्त जीवनगौरव पुरस्कार, तर नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष नितीन शहा व नाट्य परिषदेचे आधारस्तंभ ज्येष्ठ रंगकर्मी अभय लिमये यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी, मधुसूदन ओझा प्रस्तुत रजनीगंधा हा हिंदी मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
पुरस्काराला उत्तर देताना पंढरीनाथ कांबळे म्हणाले, की या पुरस्कारामुळे मोठी जबाबदारी वाढली आहे. विशाखा सुभेदार यांनी सांगितले, नाट्य परिषद हे माझे माहेर आहे. उतारवयामध्ये कलाकारांना साथ द्याल, ही अपेक्षा आहे.
प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी, सूत्रसंचालन डॉ. विनया केसकर यांनी, तर आभार प्रसाद मुंगे यांनी मानले.

चौकट :
आमदार शेळके व बापूसाहेब भेगडेंमध्ये रंगला कलगी तुरा :
नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी प्रास्ताविकात तळेगावमध्ये नाट्यगृह व्हावे, ही अनेक वर्षांची मागणी असल्याचे सांगितले. हाच धागा पकडून ‘ नाट्य परिषदेचा २१ वा वर्धापनदिन नाट्यगृहामध्येच साजरा होईल, असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला. यावर बापूसाहेब भेगडे यांनी नाट्यगृह हे आधीच झाले असते, परंतु आमदार शेळके यांच्या विरोधामुळेच नाट्यगृह झाले नसल्याचे सांगितले. यावर शेळके यांनी ‘माझं नाव न घेता ते बीजेपी वाले असे म्हणा, कारण आता मी तुमच्या पक्षात आलो आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button