- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शत्रुघ्न (बापू) काटे यांनी पालिका अधिकारी यांच्यासोबत प्रभागात सुरू असलेल्या पावसाळापूर्वी नाले सफाई तसेच स्टॉर्म वॉटर लाईन साफसफाई अभियानाची पाहणी केली. नियोजनबद्ध पद्धतीत नाले सफाई करा, शत्रुघ्न काटे यांची पालिका प्रशासनाला सूचना केल्या. पावसाळा काही दिवसावरच सुरु होण्याच्या दिशेने अग्रेसर होत आहे.त्यामुळे या दिवसात चेम्बर्स , ड्रेनेज लाईन, स्टोर्म वॉटर लाईन तसेच नाले तुंबण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात व नागरिकांना त्याचा फार त्रास होतो . त्यामुळे शत्रुघ्न (बापु) काटे यांनी सतत पाठपुरावा करत पावसाळा सुरु होण्यापूर्वी पुर्व तयारी तसेच खबरदारी म्हणून परिसरातील सर्व स्टॉर्म वॉटर लाईन, ड्रेनेज लाईनची साफ सफाई कामाची सुरुवात करण्याचे सूचना…
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महायुतीच्या मित्र पक्षांनी मनापासून काम केले आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातून मला मताधिक्य मिळेल. मी शंभर टक्के विजयी होणार असून दोन लाख ५० हजार ३७४ मतांनी विजयी होईल, असा विश्वास महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. खासदार बारणे यांनी आज (मंगळवारी) पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की मावळमध्ये महायुतीची ताकद होती, आहे आणि राहील. ‘उबाठा’ची कोठेही ताकद नाही. शेकापची उरण, पनवेलला ताकद आहे. मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. महायुतीच्या सर्व आमदारांनी मनापासून काम केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, पार्थ पवार यांनीही काम केले आहे. त्यामुळे पनवेल,…
पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाचे स्कुल ऑफ फाइन व अप्लाइड आर्ट्स (सोफा), राष्ट्रीय सेवा योजना(एनएसएस), विद्यार्थी कल्याण विभाग आणि स्कुल ऑफ होलेस्टिक डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने अनिकेत सेवाभावी संस्था, पुणे येथे ‘कला शिक्षणाद्वारे शैक्षणिक परिवर्तन’ या चार दिवसीय स्तुत्य उपक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. प्रा. शीलकुमार कुंभार आणि प्रा. उत्तम जनवाडे यांच्या मार्गदर्शना तंर्गत या उपक्रमात एमआयटी सोफाच्या विद्यार्थ्यांसह अनिकेत सेवाभावी संस्थेतील 55 विशेष दिव्यांग मुलांचाही उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला, याद्वारे त्यांनी संस्थेच्या आवारात जीवंत भित्तीचित्रे तयार करण्यासाठी एकत्रितपणे काम केले. या उपक्रमाचा उद्देश अनिकेत सेवाभावी संस्थेचे सुशोभिकरण करणे, तसेच या भित्तीचित्रांच्या माध्यमातून एक चांगला संदेश देण्याचा…
– सिटीसर्वे आणि भूमी अभिलेख विभागाला कार्यवाहीचे पत्र – मे महिन्याच्या अखेर सर्वेक्षणाच्या कामाला होणार सुरुवात पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडमधील बहुप्रतिक्षित ‘रेड झोन’च्या मोजणीप्रकियाला अखेर गती मिळाली असून, संरक्षण विभागाच्या गोला बारूद निर्माणी, खडकी प्रशासनाने रेड झोन सर्वेक्षणाला ‘ ग्रीन सिग्नल’ दिला आहे. भारतीय संरक्षण विभागाच्या देहू ॲम्युनेशन डेपो व दिघी मॅगझिन डेपो या भागातील ‘रेडझोन’ चे मार्किंग झालेले नाही. त्यामुळे रेड झोनची मोजणी करुन नकाशा प्रसिद्ध करण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी. यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. शहरात दिघी, भोसरी, वडमुखवाडी, तळवडे, चिखली, निगडी, रावेत, किवळे भागात रेडझोन क्षेत्र आहे. तसेच, सांगवी,…
चिंचवड , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे शाखेच्या वतीने ऊर्जा संवर्धन 2024 स्पर्धच आयोजण करण्यात आले. भोसरी येथील कॉलिटी सर्कल एक्सलन्स सेंटर मध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ऊर्जा संवर्धन या विषयावरील कंपन्यांच्या मद्ये केलेल्या सुधारणा व त्याचे अनुभव त्यांनी केसेस्टडी प्रेसेंटेशन, स्लोगन व पोस्टर मध्ये एकूण 28 कंपन्यातील 174 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड (एमएसईबी) चे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले तसे स्पर्धेचा समारोप पिरंगुट येथील अँकेमको इंडिया प्रा.लि. कंपनीचे प्लांट हेड महेंद्र मगदूम यांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी…
*वासंतिक व्याख्यानमाला – अंतिम पुष्प पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “आपल्या मनातच ‘स्वर्णिम भारत’ ही संकल्पना रुजायला हवी!” असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी आकांक्षा यांनी चिंचवडगाव येथे केले. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड आयोजित तीन दिवसीय वासंतिक व्याख्यानमालेत ‘स्वर्णिम भारत’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना ब्रह्माकुमारी आकांक्षा बोलत होत्या. माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन तसेच रत्नप्रभा खोत आणि मंगला दळवी यांनी केलेल्या त्रिवार ओंकाराने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. अध्यक्ष रमेश इनामदार यांनी प्रास्ताविकातून संस्कृत कवी बाणभट्ट यांचा संदर्भ देत कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मकपणे पाहिले पाहिजे; तसेच आत्मा ते परमात्मा…
पुणे , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र पुणे, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च व माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल मंगळवारी राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केला. यंदा परीक्षेला बसलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीचा निकाल ९३.३७ टक्के एवढा लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी २.१२ टक्क्यांनी जास्त आहे. गतवर्षी २०२३ चा निकाल ९१.३५ टक्के एवढा लागला होता. बारावी परीक्षेचे दि.२१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत आयोजन केले होते. राज्य मंडळाच्या पुणे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात फलक निष्कासनाची कारवाई आजपासून सुरू करण्यात आली असून ‘इ’ क्षेत्रिय कार्यालय क्षेत्रातील एकूण ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तसेच येत्या तीन दिवसांत शहरातील उर्वरित अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या वतीने शहरातील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणामध्ये आतापर्यंत अ (३), ब (५), क (३), ड (२), इ (५), फ (६) असे मिळून क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण २४ अनधिकृत फलक आढळले असून वाढीव ३२१ जाहिरात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कचऱ्यामधून भंगार (स्क्रॅप) चोरी करून फायद्यासाठी भंगार (स्क्रॅप) विकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे उपशहरप्रमुख निखिल दळवी यांनी आयुक्तांकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १) प्रभाग क्रमांक १४ काळभोर नगर मिल्कमेड कंपनी जवळ २) प्रभाग क्रमांक १० बर्ड व्हॅली उद्यान समोरील मोकळ्या जागेत ३) प्रभाग क्रमांक १० भोला हॉटेल मागे असलेल्या पेट्रोल पंपा जवळ या दोनही प्रभागांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका अ.क्षेत्रीय कार्याल्याच्या आरोग्य विभागाकडून वरील दिलेल्या पत्त्यावर चार चार मोठ्या कचऱ्याच्या कुंड्या कचरा मधून भंगार स्क्रॅप वेगळे करण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या छोट्या…
– भाजपा पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांची आयुक्तांकडे मागणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही महिन्यात तळवडे, शाहूनगर, चिखली आदी ठिकाणी भीषण आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. धक्कादायक म्हणजे त्यात मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्त हानी झाली आहे. कहर म्हणजे पिंपरी-चिंचवड परिसरातील औद्योगिक क्षेत्रात आगीच्या घटनांमध्येसुध्दा मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शाहूनगर, संभाजीनगर, पूर्णानगर या दाट लोकवस्तीच्या परिसरासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्राची गरज निर्माण झाली आहे. त्या भागात तातडीने अग्निशमन केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजपा पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी केली आहे. अमित गोरखे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह…
