औद्योगिक ऊर्जा संवर्धन स्पर्धेत पुण्यातील 28 कंपन्यांचा सहभाग
चिंचवड , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे शाखेच्या वतीने ऊर्जा संवर्धन 2024 स्पर्धच आयोजण करण्यात आले. भोसरी येथील कॉलिटी सर्कल एक्सलन्स सेंटर मध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत ऊर्जा संवर्धन या विषयावरील कंपन्यांच्या मद्ये केलेल्या सुधारणा व त्याचे अनुभव त्यांनी केसेस्टडी प्रेसेंटेशन, स्लोगन व पोस्टर मध्ये एकूण 28 कंपन्यातील 174 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड (एमएसईबी) चे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले तसे स्पर्धेचा समारोप पिरंगुट येथील अँकेमको इंडिया प्रा.लि. कंपनीचे प्लांट हेड महेंद्र मगदूम यांच्या उपस्थितीत पार पडला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाखेचे कौन्सिल सदस्य माधव बोरवणकर, धनंजय वाघोलीकर, पवन कुमार रौंदळ, परविन तरफदार, कार्यकारी समिती सदस्य डॉ. संजय लकडे, प्रभूलिंग झुंजा यांचे सहकार्य लाभले. तर कार्यक्रमाचे आयोजन पुणे शाखेचे प्रशांत बोराटे आणि चंद्रशेखर रूमाले यांनी केले.