महानगरपालिकेच्या कचऱ्यामधून भंगार (स्क्रॅप) चोरी करून फायद्यासाठी भंगार (स्क्रॅप) विकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी – निखिल दळवी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कचऱ्यामधून भंगार (स्क्रॅप) चोरी करून फायद्यासाठी भंगार (स्क्रॅप) विकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
युवासेनेचे उपशहरप्रमुख निखिल दळवी यांनी आयुक्तांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १) प्रभाग क्रमांक १४ काळभोर नगर मिल्कमेड कंपनी जवळ २) प्रभाग क्रमांक १० बर्ड व्हॅली उद्यान समोरील मोकळ्या जागेत ३) प्रभाग क्रमांक १० भोला हॉटेल मागे असलेल्या पेट्रोल पंपा जवळ
या दोनही प्रभागांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका अ.क्षेत्रीय कार्याल्याच्या आरोग्य विभागाकडून वरील दिलेल्या पत्त्यावर चार चार मोठ्या कचऱ्याच्या कुंड्या कचरा मधून भंगार स्क्रॅप वेगळे करण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या छोट्या कचऱ्याच्या गाड्या शहरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन कचरा गोळा करतात व कचरा गोळा करून झाल्यावर या तीन ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कुंड्यांमध्ये सदरचा कचरा खाली केला जातो.
छोट्या कचऱ्याच्या गाडीतला कचरा कुंडीमध्ये खाली केल्यानंतर सदर ठिकाणी काही महिला व पुरुष या कुंडी मधल्या कचऱ्यामधील पुष्टा प्लास्टिक काचेच्या बाटल्या लोखंड लोखंडी तारा याप्रकारे आणखी काही भंगार स्क्रॅप कचऱ्यामधून वेचून वेगळे करतात व सर्व भंगार स्क्राप कचऱ्या मधून वेगळे करून झाल्यावर मोठ्या पोत्या मधी भरून ठेवतात कचऱ्यामधून वेगळे केलेले भंगार स्क्रॅप परस्पर महानगरपालिकेची कोणतीही परवानगी नसताना रोज महानगरपालिकेच्या कचऱ्यामधून काढलेले स्क्रॅप भंगार ठरलेल्या भंगारवाल्याला अनधिकृत पणे विकले जाते हा सर्व प्रकार अ क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य विभागाचे मुख्याधिकारी श्री राजु साबळे यांच्या आशीर्वादाने सुरू आहे.
राजु साबळे यांनी प्रभाग क्र १० व प्रभाग क्र १४ या दोन प्रभागांमधील तीन ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कचऱ्याच्या कुंड्यांमधून भंगार स्क्रॅप वेचून वेगळे करण्यासाठी काही महिला व पुरुष रोजावर कामाला ठेवले आहेत ते रोज कचऱ्याच्या गाडीतला कचरा कुंड्यांमध्ये खाली झाल्यानंतर कचऱ्या मधले भंगार वेगळे करून ठरलेल्या भंगारवाल्याला राजु साबळे यांच्या सांगण्यावरून विकत देतात दोनही प्रभागांमध्ये ठेवलेल्या कुंड्यांमधील कचऱ्या मधून काढलेले भंगार स्क्रॅप त्यांनी ठरवलेल्या भंगार वाल्याला विकून आरोग्य अधिकारी श्री राजु साबळे हे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत महानगरपालिकेची चोरी व लूट करून पैसे कमवत आहेत श्री राजु साबळे यांची चौकशी करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी आरोग्य विभागाच्या छोट्या कचऱ्याच्या गाड्या घरोघरी जाऊन नागरिकांचा कचरा गोळा करतात सदर कचरा गोळा करून कचऱ्याची गाडी कचरा खाली करण्यासाठी मोशी डेपो येथे का जात नाही कचरा डायरेक्ट डेपो मधी नेऊन खाली का करत नाही कचऱ्या मधी भंगार स्क्रॅप कडून उर्वरित कचरा परत गाडीमध्ये भरून मोशी कचरा डेपो येथे खाली केला जातो कचरा खाली करण्यासाठी या दोनही प्रभागांमध्ये कुंड्या का ठेवल्या आहेत त्या दोन प्रभाग मध्ये ठेवलेल्या कुंड्या मुळे सदर परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणत कचऱ्याच्या वासा मुळे दुर्गंधी पसरत आहे परिसरातील नागरिक कचऱ्याच्या वासा मुळे हैराण झाले आहेत या दोनही प्रभागांमध्ये ठेवलेल्या कुंड्या त्वरित हटवाव्यात अशाप्रकारे महानगरपालिकेने शहरातील कोणत्याही ठिकाणी कचरा मधून भंगार स्क्रॅप वेगळे करण्यासाठी कुंड्या ठेवून देऊ नये पिंपरी चिंचवड मनपाच्या कचऱ्या मधील भंगार स्क्रॅप विकून मोठा भ्रष्टाचार सुरू आहे यामध्ये महानगरपालिकेचे नुकसान होत आहे सदर विषयाची गंभीर दखल घेऊन अ.क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य आरोग्य अधिकारी श्री राजु साबळे यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व दोनही प्रभागामध्ये कचऱ्यातून भंगार स्क्रॅप वेगळे करण्यासाठी ठेवलेल्या कुंड्या त्वरित हटवाव्या सदर विषयाचे गंभीर बाब लक्षात घेऊन दखल घ्यावी व कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे .