Author: maharashtrabreakingnews.com

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज सांयकाळी झालेल्या धुवाधार पावसात आकुर्डीतील दत्तवाडी विठ्ठलवाडी क्रांतीनगर साई दर्शन नगर परिसरात बहुतांशी भाग कंबरे एवढा पाण्याखाली गेला असून नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे नागरिकांची फार तारांबळ उडाली असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना याचा फटका बसल्याचा आरोप दिवंगत नगरसेवक जावेद शेख स्मृती प्रतिष्ठान चे इखलास सय्यद आणि तौहिद जावेद शेख यांनी केला आहे. पावसाळ्यापूर्वी ज्या भागात गंभीर परिस्थिती निर्माण होईल अशा सर्व ठिकाणी स्ट्रोम वॉटर लाईन दुरुस्त करावी आवश्यक त्या ठिकाणी नवीन लाईन टाकणे गरजेचे असल्याचे लेखी पत्राद्वारे कळवले होते तसेच काम लवकर सुरू करने बाबत वारंवार मोबाईल द्वारे पाठपुरावा करून देखील स्थपत्य विभागाच्या…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज) – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात कॉंग्रेसचे तेरा खासदार निवडून आले. प्रचंड परिश्रम घेऊन नानाभाऊंनी कॉंग्रेसला नवसंजीवनी मिळवून दिल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कॉंग्रेस भवन येथे नानाभाऊंचा सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँगेस पक्षाला भरघोस यश मिळून नानाभाऊ पटोले मुख्यमंत्री व्हावे आशा शुभेच्छा दिल्या. तसेच पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर यांनी वाल्हेकर वाडी येथे चालू केलेल्या इंदिरा माई स्वस्त थाळी च्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्यामुळे भरत वाल्हेकर यांनी नानाभाऊंना पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात इंदिरा माई स्वस्त थाळी हा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या सोमवार दि.२४ जून रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत जनसंवाद सभा होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय महिन्यातील दुस-या आणि चौथ्या सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या असून ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरात आज पहिलाच जोरदार पाऊस झाला असून यामध्ये खास करून पिंपरी विधानसभा क्षेत्रातील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी घराघरात गेलेले आहे.पहिल्याच पावसात पिंपरी चिंचवड पालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम हतबल पालिका प्रशासनाने ताबडतोब लक्ष द्यावे  असे प्रसिद्धी पत्रकात अमित गोरखे यांनी म्हटले आहे. ड्रेनेजचे पाणी या पावसाच्या पाण्यात मिक्स होऊन ड्रेनेज तुमच्या कारणाने घराघरात पाणी गेल्याची परिस्थिती खास करून दत्तनगर, विद्यानगर, शंकर नगर या भागात झालेली दिसली यातून पालिकेने पावसापूर्वी कुठलीच दक्षता घेतली नाही हे दिसून आले आहे आज पिंपरी मधील भाटनगर, मिलिंद नगर,त्याचबरोबर आनंदनगर अशा मोठ्या वस्त्यांमध्ये पावसाचे प्रचंड पाणी घराघरात शिरले असून…

Read More

– चिखली, दिघीतील विकासकामांचे भूमिपूजन भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावे आणि सोसायटीधारकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आम्ही सातत्यपूर्ण काम करीत आहोत. सर्वसामान्य नागरिकांना पायाभूत सोयी-सुविधा सक्षमपणे पुरवण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी भूमिका भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली. आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने चिखली येथील ताम्हाणे वस्ती येथे श्रीदत्त मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच, शिवछत्रपती हाउसिंग सोसायटी येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही केले आहे. यावेळी माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, जितेंद्र यादव, किसन बावकर, माजी क्रीडा समिती सभापती कुंदन गायकवाड, पांडुरंग साने, विनायक मोरे, निलेश भालेकर, संजय ताम्हाणे, सुदाम ताम्हाणे, राजू म्हेत्रे, सुहास ताम्हाणे, अजय साने,…

Read More

पिंपळे  सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज  पिंपळे सौदागर येथील बासुरी बँक्वेट हॉल याठिकाणी शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन मार्फत आयोजित दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच करियर मार्गदर्शन शिबीर कार्यक्रम संपन्न झाला . या प्रसंगी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की आज या गुणवंत विद्यार्थ्यांनी आयुष्याची पहिली पायरी यशस्वीपणे पार करून दाखवले आहे परंत दिल्ली अभी दूर हैं…….आयुष्याच्या या प्रवासात एवढ्याश्या यशाने हरभडून न जाता किंवा यशाची हवा आपल्या मेंदूत घुसू न देता आपल्या समोर येणाऱ्या पुढच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे आणि अशी आव्हाने पेलण्यासाठी यापुढील प्रवासाला योग्य दिशा देण्याची नितांत गरज असते…

Read More

चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगभरात योगाचा प्रसार करण्यासाठी आणि त्याच्या फायद्यांची जाणीव करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. योग ही भारताच्या प्राचीन परंपरेने दिलेली एक अमूल्य देणगी आहे. योग मन व शरीर, विचार व कृती, संयम व पूर्णता, मनुष्य व निसर्ग यांच्यातील ऐक्याला मूर्त रूप देतो. आरोग्य व स्वत:च्या कल्याणसाठी सर्वांगीण दृष्टिकोन प्राप्त करून देतो. योगासने हा केवळ एक व्यायाम नाही, तर स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकरूपतेची भावना शोधण्याचा मार्ग आहे, असं प्रतिपादन चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या उपसंचालिका  अनिता संदीप काटे यांनी केलं. पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये…

Read More

पीसीईटी शैक्षणिक संकुलात विविध वर्किंग प्रोफेशनल्स साठीच्या अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  शैक्षणिक क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर एक विश्वसनीय संस्था म्हणून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टने (पीसीईटी) नावलौकिक प्राप्त केला आहे. आजच्या स्पर्धात्मक काळाची गरज ओळखून पीसीईटीने बी. व्होक, एम. व्होक, एम. टेक, वर्किंग प्रोफेशनल बी. टेक आदी अभ्यासक्रमांचे सुरूवात केली असून या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू झाले आहेत. नवे ‘शैक्षणिक धोरण – २०२०’ नुसार अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग निगडी, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी (पीसीयू) साते, ता. मावळ आदी शैक्षणिक संकुलात हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, अशी माहिती पीसीसीओईचे विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी योग शिबीराचे आयोजन करण्याची मागणी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन केली होती. त्याची दखल घेत शुक्रवारी महापालिकेच्या ८० शाळांमध्ये योग व व्यक्तिमत्त्व विकासावर कार्यशाळा घेण्यात आली. पत्राची दखल घेत विद्यार्थ्यांना योग साधनेचे धडे दिल्याबद्दल भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त व  शिक्षण मंडळाच्या प्रशासनाचे आभार मानले आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता, स्मरणशक्ती, स्वस्थ जीवनशैली व व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर गुणवत्तापूर्ण कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याची पिंपरी-चिंचवड महापालिकेने अंमलबजावणी करावी यासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी १५ जून रोजी आयुक्तांना…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि वाहतूक पोलीस विभाग यांची वाहतुकीच्या समस्या आणि त्यावरील उपाय योजना याबाबत संयुक्त बैठक संपन्न झाली. भोसरी एमआयडीसी भोर इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स येथे संपन्न झाली यावेळी पिंपरी चिंचवड आणि चाकण माळुंगे या ठिकाणी वाहतुकीला येणाऱ्या अडचणी समस्या याबाबत चर्चा करण्यात आली. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी यावेळी उद्योजकांना येणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. अर्ध्या तासाच्या प्रवासाला दोन दोन तास लागतात. तसेच पिंपरी चिंचवड ते चाकण या परिसरामध्ये बहुसंख्येने मोठे उद्योग आहेत आणि कामगार वर्ग सुद्धा लाखोच्या घरात आहे परंतु वाढते . औद्योगीकरण पाहता ज्या मूलभूत सुविधा वाहतूक सुरळीत होण्यासाठी होण्यास…

Read More