फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि वाहतूक पोलीस विभाग यांची वाहतूक समस्याबाबत संयुक्त बैठक संपन्न
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि वाहतूक पोलीस विभाग यांची वाहतुकीच्या समस्या आणि त्यावरील उपाय योजना याबाबत संयुक्त बैठक संपन्न झाली.
भोसरी एमआयडीसी भोर इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स येथे संपन्न झाली यावेळी पिंपरी चिंचवड आणि चाकण माळुंगे या ठिकाणी वाहतुकीला येणाऱ्या अडचणी समस्या याबाबत चर्चा करण्यात आली. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी यावेळी उद्योजकांना येणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. अर्ध्या तासाच्या प्रवासाला दोन दोन तास लागतात. तसेच पिंपरी चिंचवड ते चाकण या परिसरामध्ये बहुसंख्येने मोठे उद्योग आहेत आणि कामगार वर्ग सुद्धा लाखोच्या घरात आहे परंतु वाढते .
औद्योगीकरण पाहता ज्या मूलभूत सुविधा वाहतूक सुरळीत होण्यासाठी होण्यास पाहिजेत .त्याकडे अद्याप शासनाचे दुर्लक्ष असल्याचे सांगितले. हीच समस्या कायम राहिल्यास चाकण भागातील उद्योग स्थलांतरित होण्याची भीती निर्माण केली. अनेक ठिकाणी एमआयडीसी महावितरण महानगरपालिका आणि पीडब्ल्यूडी विभाग यांच्याकडून कामाला दिरंगाई होत आहे. अनेक भागांमध्ये वाहन तळ नसल्यामुळे अनाधिकृत पार्किंग कंपन्या बाहेर मोठमोठाले ट्रक यामुळे वाहतूक कोंडी होताना दिसते. अनेक सिग्नल आणि चौकांमध्ये वाहतूक पोलीस यांची कमतरता दिसून येते. यावेळी अनेक उद्योजकांनी आपल्या समस्या पोलिसांसमोर मांडल्या.
सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग भास्कर ढेरे यांनी सर्व उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या. आणि त्यावर त्वरित कठोर उपाययोजना करून उद्योजकांना येणाऱ्या अडचणींना सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी सहाय्यक आयुक्तांनी अनेक उद्योजकांना पोलिसांबरोबर सहकार्याची भूमिका घेण्यात सांगितले. काही कंपन्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपापले स्वयंसेवक या ठिकाणी नेमल्यास सहकार्याची भूमिका करावी .जेणेकरून आपल्याला वाहतुकीत सुधारणा करता येईल.
तसेच पोलीस निरीक्षक भोसरी वाहतूक विभाग दीपक साळुंखे आणि पोलीस निरीक्षक माळुंगे प्रदीप पाटील यांना एमआयडीसी परिसर आणि चाकण परिसरातील वाहतुकी संदर्भात काही सूचना देऊन त्वरित अंमलबजावणी करण्यास सांगितले .भोसरी पोलीस निरीक्षक साळुंखे यांनी उद्योजकांना अपघाताला आळा घालण्यासाठी कंपन्यांनी हेल्मेट जनजागृती मोहीम हाती घ्यावी.
जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होईल असे सांगितले महाळुंगे चाकण येथील पोलीस निरीक्षक श्री पाटील साहेब यांनी महाळुंगे आणि चाकण येथील काही रोड बाबत समस्या असल्याचे सांगितले. आणि शासन पातळीवर त्याचा पाठपुरावा चालू असून लवकरात लवकर त्या समस्या दूर करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले अनेक उद्योजकांनी आपल्या समस्या या ठिकाणी मांडल्या. यावेळी भोसरी एमआयडीसीतील महत्त्वाचे चौक विस्तारीकरण करण्याची मागणी उद्योजकांतर्फे करण्यात आली तसेच एमआयडीसी परिसरात सिग्नल आणि इतर मूलभूत सुविधा देण्याची सुद्धा मागणी केली.
यावेळी अध्यक्ष अभय भोर पोलीस सहाय्यक आयुक्त भास्कर डेरे , पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील साहेब पोलीस निरीक्षक दीपक साळुंखे आणि बहुसंख्य उद्योजक आणि एमआयडीसीतील कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.