काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्यामुळे कॉंग्रेसला नवसंजीवनी मिळवून दिल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात कॉंग्रेसचे तेरा खासदार निवडून आले. प्रचंड परिश्रम घेऊन नानाभाऊंनी कॉंग्रेसला नवसंजीवनी मिळवून दिल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कॉंग्रेस भवन येथे नानाभाऊंचा सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले.
येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँगेस पक्षाला भरघोस यश मिळून नानाभाऊ पटोले मुख्यमंत्री व्हावे आशा शुभेच्छा दिल्या. तसेच पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर यांनी वाल्हेकर वाडी येथे चालू केलेल्या इंदिरा माई स्वस्त थाळी च्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्यामुळे भरत वाल्हेकर यांनी नानाभाऊंना पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात इंदिरा माई स्वस्त थाळी हा उपक्रम राबवण्यासाठी आपण मार्गदर्शन करावे असे नाना भाऊंना सुचवले व भरत वाल्हेकर हे कार्य करत असलेले पाहून नानाभाऊंनी त्यांचे कौतुक करत त्यांना या गोष्टी करिता पूर्ण पाठिंबा देण्याचे जाहीर केले व जातीने या गोष्टीकडे लक्ष देतो असे त्यांनी वचन दिले.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष भरत शंकर वाल्हेकर, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सायली नढे, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस अनुसुचित जाती विभाग अध्यक्ष विजय ओव्हाळ, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस हरिश डोळस, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस ग्राहक सेलचे अध्यक्ष झेवियर ऍन्थोनी, किरण नढे, संदेश नवले, आबा खराडे , अध्यक्ष परिवहन सेल सुरज गायकवाड, उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड परिवहन सेल , फिरोज तांबोळी, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विकास बळवंत कांबळे, सुदर्शन धाडवे, विशाल गवळी, अनिल दहीभाते, ज्ञानेश्वर बोरकर संदीप काटे , विजया कांबळे , अमिन बोरकर , इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
सदर योजने संदर्भात भरत वाल्हेकर व सायली ताई नढे यांना विचारले असता वाल्हेकर वाडी येथे चालु असलेल्या इंदिरा माई स्वस्त थाळी व स्किल इंडिया अंर्तगत मोफत शिलाई मशीन व कम्प्युटर क्लास ला मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहता पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये शंभर शाखा स्थापन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त करून दाखवला व तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी व माजी आमदार उल्हास पवार व माजी राज्य मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी सदर योजनेला शुभेच्छा देऊन पाठींबा दिला.