ताज्या घडामोडीपिंपरी

स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी नवनवीन क्षेत्रे धुंडाळायला हवीत- श्रीरंग आप्पा बारणे

Spread the love

 

पिंपळे  सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज  पिंपळे सौदागर येथील बासुरी बँक्वेट हॉल याठिकाणी शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन मार्फत आयोजित दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच करियर मार्गदर्शन शिबीर कार्यक्रम संपन्न झाला .

या प्रसंगी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की आज या गुणवंत विद्यार्थ्यांनी आयुष्याची पहिली पायरी यशस्वीपणे पार करून दाखवले आहे परंत दिल्ली अभी दूर हैं…….आयुष्याच्या या प्रवासात एवढ्याश्या यशाने हरभडून न जाता किंवा यशाची हवा आपल्या मेंदूत घुसू न देता आपल्या समोर येणाऱ्या पुढच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे आणि अशी आव्हाने पेलण्यासाठी यापुढील प्रवासाला योग्य दिशा देण्याची नितांत गरज असते आणि ती गरज अश्या मार्गदर्शन शिबिर मार्फत पूर्ण होत असते.यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नाही.उच्चीत उद्दीष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश आणि जर आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुख: करीत बसू नका कारण काळ बदलत असतो.यासाठी वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतिच्या दिशेने पाऊले टाका,सतत प्रगतिच्या दिशेने पाऊल टाकत राहा.

यावेळी  अरुणराज जाधव यांनी पुढील काळात कोणतेही क्षेत्र निवडतांना विद्यार्थ्यांसमोरील पर्याय व आव्हाने याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या मनात असलेल्या शंकाचे समाधान ही केले.साधारण ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित राहून या मार्गदर्शन शिबिराला सकारात्मक प्रतिसाद दिला.

व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना या पुढील काळात या स्पर्धात्मक जगात आपले आव्हान कसे टिकवता येईल याकडे सर्व विद्यार्थ्यांनी आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे अनमोल विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले .आजची ही तरुण पिढी आपल्या उद्याच्या समाजाची तसेच या देशाचे उज्वल भविष्य आहे आणि या भविष्याचा पाया मजबूत करण्यासाठी , त्यांना एक योग्य दिशा देण्यासाठी आणि एका सुरक्षित हातात आपल्या देशाचे भविष्य देण्यासाठी,त्यांचे हात बळकट करण्यासाठी असे कार्यक्रमाचे आयोजन करण्याची गरज आहे असे विचार व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक  शत्रुघ्न काटे आणि प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंग आप्पा बारणे,आमदार अश्विनी जगताप,जेष्ठ नेते  भाऊसाहेब भोईर, जयनाथ काटे, राजेंद्र जगताप,चंद्रकांत अण्णा नखाते, मोरेश्वर शेडगे, रवी सांकला, जॉन्सन पौलेसे कीलकून, डॉ. रोहन काटे, भानुदास काटे पाटील, प्रकाश झिंजुर्डे, बाळासाहेब (नाना) काटे,  विजू धनवटे, वसंत काटे, धनंजय भिसे, राम वाकडकर,IIB इन्स्टिटयूटचे महेश लोहारे, अरुण चाबुकस्वार, कैलास कुंजीर, प्रवीण कुंजीर, सुभाष भिसे,श्री बाळकृष्ण परघळे,  दीपक बोडके,श्रीमती शीतल पटेल, दिपक गांगुर्डे, संदीप फुके,समीर देवरे, विनोद सुर्वे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास (भोला) काटे आणि श्रीमती उषा भारद्वाज यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button