Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – एसएई इंडिया,  जॉन डीअर इंडिया प्रा. लि. आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यामाने आयोजित केलेल्या ‘टायफन २०२४’ या स्पर्धेत पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) ‘टीम ॲम्बुश’ने सहभाग घेऊन उत्कृष्ट यश मिळविले. ‘बेस्ट सेल्स ॲण्ड मार्केटिंग’ या श्रेणीत भारतात चौथा, एकूण स्पर्धेत देशात दुसरा आणि ‘बेस्ट कॉस्ट’ या प्रकारात तिसरा क्रमांक पटकावला. भारतातील प्रभावी ‘प्रोटोटाइप’ या विषयावर स्पर्धाचे कालावधीत करण्यात आले होते. या स्पर्धेत भारतातील ४० संघ सहभागी झाले होते.    टीम ॲम्बुशने अखिल भारतीय रँक – चौथा क्रमांक, सर्वोत्कृष्ट विक्री आणि विपणन – दुसरा क्रमांक (रनर अप) तसेच पंधरा हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन  संचलित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस शाळेचे  उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत   यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार  तसेच विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. इयत्ता सहावीचा विद्यार्थी विश्वजीत काटे याने शाहू महाराज यांच्या जीवनावरती पोवाडा गायला, तसेच तृप्ती शर्मा, मोनिका भाजीभाकरे, हेमा सिंग  यांनी शाहू महाराजांविषयी माहिती सांगितली. उपस्थितांना मार्गदर्शन करताना अरुण चाबुकस्वार  म्हणाले, माणसांवर माणूस म्हणून प्रेम करणारे शाहू महाराज हे मोठ्या मनाचे राजे होते, सर्वसामान्य माणसाला राज्यात मान व…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडीतील आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यांवर दररोज होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जुनी सांगवी ते पिंपळेसौदागर रहाटणीमार्गे हिंजवडी, चिंचवडगाव ते वाल्हेकरवाडी, रावेतमार्गे हिंजवडी आणि चिंचवडगाव ते काळेवाडी, थेरगावमार्गे हिंजवडी या तीन मार्गावर वातानुकूलित (एसी) आणि आरामदायी इलेक्ट्रिकल विशेष बसेस सुरू करावेत, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पीएमपीएमएलकडे केली आहे. तसेच सर्व मेट्रो स्थानकांकडे जाणाऱ्या सर्व फीडर रुटवर दर १५ मिनिटांनी एक बस धावेल याचे नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे,…

Read More

जयंतीनिमित्त कष्टकरी कामगारांकडुन अभिवादन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- गरीब आणि वंचित समुदायातील मुलांसाठी अनेक शाळा आणि महाविद्यालये स्थापन आणी सामाजिक परिवर्तनासाठी आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले जीवन समर्पित केले असे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज कष्टकरी कामगारांकडून विनम्र अभिवादन करण्यात आले. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, फेरीवाला क्रांती महासंघ, बांधकाम कामगार समिती यांच्याकडून आज राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, समन्वयक नाना कसबे, ओमप्रकाश मोरया, इरफान चौधरी,दिनेश कदम,राजेंद्र भोसले, राधा बनसोडे, विजया पाटील, अर्चना कांबळे, सुधीर मोरे यांचे सह विविध क्षेत्रातील कामगार उपस्थित होते. नखाते म्हणाले स्पिनींग अँड विविंग…

Read More

– परिसरातील १० हजार रहिवाशांसह वाहनचालकांना दिलासा – भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारे प्रश्न सुटला पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे- नाशिक महामार्गावरील भोसरी-सदगुरूनगर येथे मुख्य रस्त्याला सेवा रस्ता नव्हता. धोकादायक रस्ता दुभाजकामुळे १०० मीटर पेक्षा जास्त अंतराच्या पट्टयात वाहतूक समस्या, अपघाताच्या घटना नित्त्याच्या झाल्या होत्या. या प्रश्नाकडे वाहतूक पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले होते. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार, आवश्यक असलेल्या सेवा रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने भोसरी विधानसभा मतदार संघात ‘‘वाहतूक कोंडीमुक्त भोसरी मतदार संघ’’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. वाहतूक पोलीस, महापालिका, एमआयडीसी, आरटीओ आणि पोलीस प्रशासनाच्या…

Read More

       पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –    पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना, डॉ. श्रीक्रिष्णा मुंडे यांचे श्री आरोग्य व दंत स्टुडीओ निगडी प्राधिकरण आणि आयडीएफसी फस्ट बँक यांचे संयुक्त विद्यमाने भोसरी औद्योगिक परिसरातील कामगारांसाठी जागतिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग दिनाचे औचित्य साधून मोफत आरोग्य व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.       या आरोग्य शिबिरास संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, संचालक संजय सातव, लघु उद्योजक प्रकाश ढमाले, डॉ. श्रीक्रिष्णा मुंडे, डॉ. स्नेहल दातीर, डॉ. पंकज आहाळे, डॉ. संचिता पोंडे  तसेच आयडीएफसी फस्ट बँकेचा स्टाफ उपस्थितीत होता.        या मोफत आरोग्य व दंत तपासणी शिबिरात जवळपास १४५ कामगारांनी आपले आरोग्य तपासून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध कामांमध्ये ठेकेदारांनी रिंग केल्याने सदर कामे रद्द करून फेरनिविदा करणे, अशी मागणी नाना काटे यांनी प्रभारी आयुक्त राहुल महिवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध कामे करण्यासाठी मार्च 2024 मध्ये निविदा झाली असून त्याच वेळी याची प्रक्रिया अर्धवट केली असून आज पर्यंत कुठल्याही कामाबाबत कोणतेही आदेश दिले नाहीत. मामुर्डी सांगवडे या ठिकाणी असणाऱ्या पुलाबाबत तर ए आर कन्स्ट्रक्शन या ठेकेदारासाठी संपूर्ण कागदपत्रे घेऊन ए  आर कन्स्ट्रक्शन व टी अँड टी इन्फ्रा. लि. या दोन ठेकेदारांना पात्र करून नेहमी काम करणाऱ्या अनेक ठेकेदारांना अपात्र केले…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात विधानसभा निवडणुकीवरून रस्सीखेच सुरु असतानाच आता भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा चिंचवड विधानसभा मतदारसंघ परीवर्तनाच्या वाटेवर आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप या पिंपरी- चिंचवडच्या आमदार झाल्या. काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक लागेल. चिंचवड विधानसभेची उमेदवारी आमदार अश्विनी जगताप किंवा माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांना पक्षाने द्यावी असे मत   महाराष्ट्र प्रदेशचे भाजपा युवा मोर्चाचे  उपाध्यक्ष  राज तापकीर यांनी व्यक्त केले. स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जडणघडणीमुळे आणि विकासाच्या अजेंड्यामुळे चिंचवड मतदारसंघ भाजपसाठी केव्हाच सेफ झाला. त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी. श्रीमती. अश्विनी लक्ष्मण जगताप या विनासायास…

Read More

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; विश्वस्त, पदाधिकारी यांची उपस्थिती पुणे , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३२ व्या वर्षानिमित्त यावर्षी गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील श्री जटोली शिवमंदिर साकारण्यात येणार आहे. यंदाच्या सजावटीचे वासापूजन बुधवार पेठेतील जय गणेश प्रांगण या सजावट स्थळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते झाले. जय गणेश आणि मंत्रपठणाच्या जयघोषात ट्रस्टचे विश्वस्त व कार्यकर्त्यांनी यंदाच्या सजावटीच्या तयारीचा श्रीगणेशा केला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग…

Read More

सांगली,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “विचारवंतांच्या कृतीने जोडलेला महाराष्ट्र आज तोडण्याचे काम सुरू आहे!” असे प्रतिपादन ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली येथे केले. पाली – मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद, इस्लामपूर शाखा आणि बाबा भारती प्रतिष्ठान, पिंपरी – पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलनात प्रा. डॉ. सबनीस बोलत होते. साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, माजी नगराध्यक्ष अरुणादेवी पाटील, बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, डॉ. दीपक स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. वाळवा…

Read More