ताज्या घडामोडीपिंपरी
‘टायफन २०२४’ स्पर्धेत पीसीसीओईचे यश! पीसीसीओईच्या ॲम्बुश संघाच्या ‘ऑटोमेटेड मल्टी-व्हेजिटेबल ट्रान्सप्लांटर’चा चौथा क्रमांक
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एसएई इंडिया, जॉन डीअर इंडिया प्रा. लि. आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यामाने आयोजित केलेल्या ‘टायफन २०२४’ या स्पर्धेत पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) ‘टीम ॲम्बुश’ने सहभाग घेऊन उत्कृष्ट यश मिळविले. ‘बेस्ट सेल्स ॲण्ड मार्केटिंग’ या श्रेणीत भारतात चौथा, एकूण स्पर्धेत देशात दुसरा आणि ‘बेस्ट कॉस्ट’ या प्रकारात तिसरा क्रमांक पटकावला. भारतातील प्रभावी ‘प्रोटोटाइप’ या विषयावर स्पर्धाचे कालावधीत करण्यात आले होते. या स्पर्धेत भारतातील ४० संघ सहभागी झाले होते.
टीम ॲम्बुशने अखिल भारतीय रँक – चौथा क्रमांक, सर्वोत्कृष्ट विक्री आणि विपणन – दुसरा क्रमांक (रनर अप) तसेच पंधरा हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सर्वोत्कृष्ट प्रभावी प्रोटोटाइप तिसरा क्रमांक पटकावला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. शितलकुमार रवंदळे, डॉ. पी. ए. देशमुख, डॉ. एन. आर. देवरे, प्रा. उम्मीद शेख, प्रा. इशान साठणे, प्रा. अशोक गाडेकर यांनी टीम ॲब्युशचे अभिनंदन केले.