- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
– उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश; पाणीपुरवठा, एसटीपी दर्जा प्रश्नावर तोडगा – भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या प्रश्नावर राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पाणी पुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबत करारनामामधील पळवाटा शोधून गृहप्रकल्पातील सोसायटीधारकांना वेठीस धरणाऱ्या विकसक व बांधकाम व्यावसायिकांना राज्य सरकार आता चाप लावणार आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर विकास विभाग आणि ‘महारेरा’मध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई येथे महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपा आमदार महेश लांडगे यांनी सोसायटीधारकांना भेडसावणारी पाणी समस्या आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) दर्जा संदर्भातील विकसकांची मनमानी याबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधले. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री…
तब्बल ५४ टक्के मालमत्ताधारकांनी घेतला सवलतींचा लाभ; आयुक्तांकडून जागरूक करदात्यांचे आभार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या तिजोरीमध्ये आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये ४३२ कोटी रुपयांचा मालमत्ताकर संकलित करण्यात आला. शहरामध्ये निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमिनी आदी अशा एकूण ६ लाख ३० हजारांहून अधिक नोंदणीकृत मालमत्ता असून, यावर्षी त्यापैकी ५४ टक्के करदात्यांनी पहिल्या तिमाहीमध्येच मालमत्ताकर भरून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे. करदात्यांनी जागरूकपणे कर भरून सवलतींचा लाभ घेतल्याने महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी जागरूक करदात्यांचे आभार मानले आहेत. नागरिकांनी मालमत्ताकर भरण्यासाठी करसंकलन विभागाने विविध उपाययोजना राबविल्या. त्याच्या माध्यमातून करदात्यांपर्यंत मालमत्ताकरावरील सवलतीबाबत…
– आळंदीतील इंद्रायणी नदीकाठी सकाळी 11 वाजता होणार आंदोलन -शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांची माहिती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लाखो वारकर्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी ऐन आषाढी वारीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेली दिसून आली. नदीत विविध कारखान्यांचे पाणी सोडल्याने नदीवर मोठ्या प्रमाणात फेस आला आहे. या फेसाचा पूर्ण तवंग नदीच्या सर्व पात्रात पसरला आहे आणि पाण्याला दुर्गंधी येत आहे. या नदीचे पाणी पवित्र समजले जाते आणि त्यात वारकरी स्नान करतात. हे पाणी सध्या इतके प्रदूषित आहे की, वारकर्यांनी स्नान केल्यानंतर त्यांना त्वचा विकारही झाल्याचे दिसून आले. गेले अनेक दिवस याबाबत तक्रारी करून प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रेयस पतसंस्थेची सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला. नवी सांगवी कारवार समाज सभाग्रहामध्ये पहिली ते बारावी पर्यंतच्या 65 विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रात मांडणारे उत्कृष्ट रचनाकार, गायक म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेले ज्यांनी संगीतनाटके, संगीत दिग्दर्शक म्हणून काम पाहिलेले आणि त्यांनी भूपाळी गान, आरती गान, लोकरंग, “माझे एक ऐक देवा “अशी महानाटके यांनी सादर केली आहे असे होनराजे मावळे यांना शिवाजी महाराजांची मूर्ती संस्थेचे अध्यक्ष सतीश मदने यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश मदने म्हणाले की आमची संस्था ,आम्हाला समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेतून…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रविवार, दिनांक ०७ जुलै २०२४ रोजी सकाळी ठीक ०९:०० वाजता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे, पिंपरी येथे भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या कवी विजय वडवेराव यांनी २०१४ मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मातीच्या ढिगावर बसून लिहिलेली ‘भिडेवाडा बोलला’ ही कविता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. त्यामुळे देशातील मुलींची पहिली शाळा असलेल्या, स्त्रीशिक्षणाचे उगमस्थान आणि स्त्रीमुक्ती चळवळीचे केंद्रबिंदू ठरलेल्या भिडेवाडा या ऐतिहासिक वास्तुबद्दल तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमाबी शेख, वस्ताद लहुजी साळवे यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाबद्दल कवींनी अभ्यास करून कवितेच्या माध्यमातून अभिव्यक्त व्हावे…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी चे नववा पदग्रहण सोहळा जैन इंग्लिश स्कूल येथे संपन्न झाला. रोटरी क्लबचे किरण ओसवाल यांनी नवीन अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. जैन इंग्लिश स्कूल या ठिकाणी पार पडलेल्या या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल मोहन पालेषा उपस्थित होते. प्रसिद्ध विधीतज्ञ सोहनलाल जैन यांच्या हस्ते याप्रसंगी चिंचवड येथील कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक, सचिव डॉ. दीपक शहा यांचा तळेगाव रत्न पुरस्कार पुणेरी पगडी, शाल, पुष्पगुच्छ व भव्य स्मृती चिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. डॉ.दीपक शहा यांचे कौतुक करताना, त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय…
– रहिवाशांच्या २० वर्षांपासूनच्या मागणीला यश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गंधर्वनगरी, मोशी येथील उद्यान आणि ओपन जीमच्या काम प्रगतीपथावर आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने हे काम सुरू केले असून, स्थानिक नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. या भागातील लहान मुलांना खेळण्यासाठी, वृद्धांना बसण्यासाठी उद्यान आणि नागरिकांना नियमित व्यायाम करण्यासाठी ओपन जीम असावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांची होती. त्यानुसार, येथील नागरिकांनी आमदार लांडगे यांची भेट घेतली आणि सदर काम मार्गी लावण्याबाबत सूचवले होते. त्यानुसार कामाला सुरूवात करण्यात आली. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सोपान बेळे, उपाध्यक्ष विश्वास पाटील, सतिश गिरी, खजिनदार विनोद काची, सह खजिनदार योगेश रौंदळ, सचिव…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगडी यांच्या आदेशानुसार उपाध्यक्ष अहमद खान साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शहर अध्यक्ष कैलास कदम, महिला शहर अध्यक्ष,सायली नढे,ज्येष्ठ नेते सद्गुरू नाना कदम ज्येष्ठ नेते, निगर बारस्कर ,वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे,ऍड उमेश खंदारे,कौस्तुभ नवले सौरभ शिंदे,वीरेंद्र गायकवाड,Dr. मनीषा गरुड,बाबू नायर,मेहबूब शेख,अब्दुल करीम,साजी वरगी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी निश्चित करण्यात आलेला कालावधी हा अत्यंत कमी असून त्यामुळे राज्यातील लाखो गरजू महिला या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर योजनेचा अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी केली आहे. यासंदर्भात चंद्रशेखर जाधव यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. निवेदनात जाधव यांनी म्हंटले आहे की, अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर कालपासून ( दि. १ जुलै) महाराष्ट्रभर अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी प्रत्येक ठिकाणी उसळलेली दिसून येत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधान परिषदेसाठी अमित गोरखे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थितीमध्ये अमित गोरखे यांनी अर्ज दाखल केला. त्यावेळी भाजपा आमदार माधुरी मिसाळ, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप उपस्थित होते. विधान परिषदेवर अमित गोरखे यांना संधी मिळाल्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार असून पक्षाला आगामी निवडणुकीत फायदा होणार आहे. विधानसभेचे दोन आणि विधानपरिषदेचे दोन असे भाजपचे चार आमदार गोरखे यांच्या रूपाने होणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र…
