मोशी गंधर्व नगरीतील उद्यान, ओपन जीमचे काम प्रगतीपथावर! – भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार
– रहिवाशांच्या २० वर्षांपासूनच्या मागणीला यश
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गंधर्वनगरी, मोशी येथील उद्यान आणि ओपन जीमच्या काम प्रगतीपथावर आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने हे काम सुरू केले असून, स्थानिक नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
या भागातील लहान मुलांना खेळण्यासाठी, वृद्धांना बसण्यासाठी उद्यान आणि नागरिकांना नियमित व्यायाम करण्यासाठी ओपन जीम असावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांची होती. त्यानुसार, येथील नागरिकांनी आमदार लांडगे यांची भेट घेतली आणि सदर काम मार्गी लावण्याबाबत सूचवले होते. त्यानुसार कामाला सुरूवात करण्यात आली.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सोपान बेळे, उपाध्यक्ष विश्वास पाटील, सतिश गिरी, खजिनदार विनोद काची, सह खजिनदार योगेश रौंदळ, सचिव अमित पवार, सहसचिव महेश माने, कार्यकारणी सदस्य राजकुमार लांडे, अनिल कुमार उपाध्ये, अजित साळवी, अभिराजे, प्रदीप मानकर, प्रवीण सोनार, विश्वंभर शिंदे, दीपक देशमुख, तुषार आंबेकर, राहुल खाडे, सुशांत चतुर्वेदी, स्वामीनाथ ढंगेजी, रोहित खाचणे, राजेंद्र वेणू आदी उपस्थित होते.
उद्यान आणि ओपन जीमच्या कामासाठी संबंधित जागा ही विकसकाकडून महपालिका प्रशासनाकडे वर्ग करण्यात आली. त्या दोन जागांवर उद्यान व ओपन जीम उभारण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे प्राधिकरणातील ओपन जीमसाठी रस्ताओलांडून जाण्याची आवश्यकता स्थानिक नागरिकांना लागणार नाही. लहान मुले व वृद्धांसाठी हक्काचे उद्यान विकसित होत आहे.
महेश लांडगेंमुळे परिसराचा विकास…
गंधर्वनगरी, मोशी परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्याप्रमाणात नागरीकरण झाले आहे. मात्र, पायाभूत सोयी-सुविधा अपूर्ण होत्या. आमदार महेश लांडगे यांनी सर्वप्रथम या भागातील ‘बफर झोन’ हटवला. त्यामुळे नागरी सुविधा सक्षमपणे निर्माण होण्यास गती मिळाली. वीजवाहिनी भूमिगत करणे, पथदिवे, रस्ता काँक्रिटीकरण, स्ट्रॉम वॉटर लाईन, गतीरोधक आणि आता दोन गार्डनचे काम केल्यामुळे स्थानिक नागरीक, रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.