ताज्या घडामोडीपिंपरी

श्रेयस पतसंस्थेची सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रेयस पतसंस्थेची सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला. नवी सांगवी कारवार समाज सभाग्रहामध्ये  पहिली ते बारावी पर्यंतच्या 65 विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रात मांडणारे उत्कृष्ट रचनाकार, गायक म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेले ज्यांनी संगीतनाटके, संगीत दिग्दर्शक म्हणून काम पाहिलेले आणि त्यांनी भूपाळी गान, आरती गान, लोकरंग, “माझे एक  ऐक  देवा “अशी महानाटके यांनी सादर केली आहे असे होनराजे मावळे यांना शिवाजी महाराजांची मूर्ती संस्थेचे अध्यक्ष सतीश मदने यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश मदने म्हणाले की आमची संस्था ,आम्हाला समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेतून आम्ही गेल्या दहा वर्षापासून विद्यार्थी गुणगौरव , दुष्काळग्रस्तांना मदत, वारकऱ्यांना जेवन वाटप, ज्ञानेश्वरी वाटप, अंध अपंग मुलांना शालेय वस्तूचे वाटप, जेष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा, वृक्षरोपण, रक्तदान शिबिरे असे उपक्रम सातत्याने राबवत असल्याचे सतीश मदने यांनी यावेळी सांगितले .

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड म्हणाले की आपल्या संस्थेला मिळालेल्या नफ्यातून समाजासाठी काम करणारे पिंपळे गुरव, सांगवी परीसरातील उत्कृष्ट संस्था आहे असे सतत समाज हितासाठी काम करणारी श्रेयस पतसंस्था म्हणून नावलौकिक असल्याचे जोगदंड यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश मदने, सचिव योगेश देशमुख, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर क्षीरसागर खजिनदार सुधीर घाडगे, संतोष टकले, मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड , उत्कृष्ट रचनाकार होनराजे मावळे, हेमंत राजे मावळे व्यवस्थापिका  सौ सारिका कुलकर्णी, प्रकाश बंडेवार, मुरलीधर दळवी अनेक सामाजिक कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे संयोजन सौरभ क्षीरसागर ,सागर यनपुरे यांनी केली तर उपस्थितांचे आभार संस्थेच्या व्यवस्थापिका सौ सारिका कुलकर्णी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button