Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळावर शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुर्ननियुक्ती करण्यात आली असून राज्याच्या गृहनिर्माण विभागाकडून दि. २३ जुलै रोजी या संदर्भातील शासन निर्णय पारित झाला आहे . सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितपणे निर्णय घेऊन शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव जाहीर केले होते. मात्र लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना पुणे म्हाडाचे अध्यक्ष पद हे शासकीय लाभाचे पद असल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आढळराव पाटील म्हणाले कि, पुणे म्हाडाचा कार्यभार…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “जातिनिष्ठ हा बुद्धिनिष्ठ असू शकत नाही म्हणून कोणताही विद्रोह विवेकी असावा!” असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक आणि विचारवंत प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पुणे येथे व्यक्त केले. पाली – मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दी आणि ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त बाबा भारती प्रतिष्ठान, पिंपरी – पुणे आयोजित बाबा भारती जीवनगौरव, समाजभूषण, धम्मभूषण आणि साहित्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषद – पुणे प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार अध्यक्षस्थानी होत्या; तर नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे आणि बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  लायन्स क्लब भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी जीवन सोमवंशी यांची निवड करण्यात आली. ऑटोक्लस्टर सभागृह, चिंचवड येथे गुरुपौर्णिमेनिमित्त रविवार, दिनांक २१ जुलै २०२४ रोजी वेदान्ताचार्य ह. भ. प. सुभाषमहाराज गेठे, निर्माण डेव्हलपर्सचे चेअरमन संदीप माहेश्वरी, मालपाणी उद्योगसमूहाचे डायरेक्टर आणि लायन्सच्या महाराष्ट्र विभागाचे माजी मल्टिपल कौन्सिल चेअरमन गिरीश मालपाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत जुलै २०२४ ते जून २०२५ या १९व्या सेवावर्षासाठी नूतन कार्यकारिणीने पदभार स्वीकारला. त्यामध्ये जीवन सोमवंशी (अध्यक्ष), मुरलीधर साठे (सचिव), मुकुंद आवटे (कोषाध्यक्ष) यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी गिरीश मालपाणी यांनी आपल्या मनोगतातून रामायण आणि महाभारतातील दाखले देत उत्तम नेतृत्वासाठी आवश्यक असलेल्या दहा गुणांची माहिती दिली.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांतध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारिणीची आढावा बैठक खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात पार पडली. याप्रसंगी शहराध्यक्ष कैलास कदम यांनी पिंपरी ,चिंचवड, भोसरी ब्लॉक कमिटीच्या प्रभाग प्रमाणे बूथ प्रतिनिधींचा आढावा घेतला, यावेळी बोलताना कैलास कदम म्हणाले, सर्व मतदारसंघात बूथस्तरावर पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बांधणी करावी, प्रदेश पातळीच्या सूचनेवरून योग्य ते बूथ प्रतिनिधी नेमणूक करून त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, निवडणुकीचा कालावधी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड डेंग्यू आजाराने डोके वर काढले असून दिवसेंदिवस शहरात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत पडणारी भर ही चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर डेंग्यू आजाराबाबत शहरभर जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या शिलेदारांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांच्या नेतृत्वाखाली २५ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत संपूर्ण शहरात डेंग्यू जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानासंदर्भात चंद्रशेखर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे यांची भेट घेऊन सदर अभियानाची माहिती दिली. यावेळी या वेळी प्रदेश प्रवक्ते गौरव चौधरी, प्रदेश सोशल मीडिया समन्वयक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणारा महाराष्ट्रातून 38 टक्के जीडीपी मिळत असून देखील अर्थसंकल्प आंध्रप्रदेश बिहार विशाखापट्टण उत्तरांचल सिक्कीम हैदराबाद राज्यांना जास्त प्राधान्य  दिले अशी प्रतिक्रिया फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज चे अध्यक्ष अभय भोर यांनी दिली. 4.0 इंडस्ट्रीज कडे वाटचाल करत असताना 2.0 जात अर्थसंकल्प. रोड रस्ते बिहारला सव्वीस हजार कोटी देशात 12 इंडस्ट्रियल हब परंतु महाराष्ट्राला प्राधान्य नाही . उद्योगात होत असलेले परिवर्तन पाहता औद्योगिक वाढ ही 15% टक्के पटीने वाढणे गरजेचे आहे सध्या साडेनऊ % आहे तंत्रशिक्षण आणि खेळते भांडवल यावर योजना जाहीर होणे महत्त्वाचे होते महाराष्ट्र मध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत असते.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2024-25 चा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला आहे.महिला उद्योगांना स्पेशली क्लस्टर निर्मिती चालना देणे गरजेचे होते परंतु महिला उद्योगाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले अशी प्रतिक्रिया पिंपरी चिंचवड महिला लघुउद्योजक संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी  दिली. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात वेगवेगळी उत्पादनं आणि सेवा यांच्यावरील प्रत्यक्ष (डायरेक्ट) आणि अप्रत्यक्ष कर ( इन-डायरेक्ट टॅक्स) मध्ये बदल करण्याची घोषणा केली. महिला स्टार्टअप उद्योगांना नवीन कोणतीच योजना नाही आहे त्या योजना राबविल्या जात नाही. महिला उद्योगांना स्पेशली क्लस्टर निर्मिती चालना देणे गरजेचे होते परंतु महिला उद्योगाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. दहा लाख एज्युकेशन साठी फंड उपलब्ध केला स्वागत आर्य 1000…

Read More

पिंपर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहर व पिंपरी चिंचवड शहरात एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन) प्रकल्प खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झाले असून, शहरातील झोपडपट्टी भागात खाजगी विकासकांना एसआरए प्रकल्पांतर्गत घरकुल इमारत बांधकाम परवानगी देण्यात येत आहे. यामध्ये मोठ्या प्रमणावर भ्रष्टाचार आणि घोटाळा होत असून या विरोधात पिंपरी-चिंचवड भाजपा चिटणीस तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी जाहीर आक्षेप नोंदवला असून, एसआरए अधिकारी निलेश गटणे यांची चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचे निवदेन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. याबाबत काळभोर यांनी निवेदनात म्हटले आहे की, एसआरए प्रकल्प अधिकारी निलेश गटणे व खाजगी विकासक यांचे आर्थिक हितसंबंध असून, त्या संदर्भात एसआरए प्रकल्प अधिकारी निलेश…

Read More

– शहर अन्‌ परिसरातील हजारो लातुरकरांच्या जिव्हाळ्याचा कार्यक्रम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातून पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण आणि पंचक्रोशीमध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले लातूरकर स्नेहमेळाव्यानिमित्ताने एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी भाजपा आमदार महेश लांडगे आणि मार्गदर्शक म्हणून अभिमन्यू पवार उपस्थित राहणार आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, रांजनगाव, तळेगाव आणि भोसरी एमआयडसी क्षेत्रात तसेच आयटी व सेवा क्षेत्रात मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक शहरात वास्तव्यास आहेत. गावापासून दूर असलेल्या या लातुरकरांना आपुलकीने एकत्र येता यावे. या करिता ‘‘लातुरकरांचा स्नेहमेळावा’’ आयोजित केला आहे. भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे गुरूवार, दि. २५ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी…

Read More

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डेंग्यूमुक्त करण्यासाठी शहरात सर्वत्र अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी बीट डेंग्यू म्हणजेच डेंग्यूमुक्त पिंपरी चिंचवड शहर अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांमध्ये सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात साफसफाई करून सक्रीय सहभाग नोंदवावा आणि आठवड्याभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत नागरिकांना माहिती देऊन जास्तीत जास्त लोकसहभाग वाढविण्यावर भर द्यावा. तसेच शहरातील नागरिकांनी देखील डेंग्यूबाबत आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व सरकारी व खाजगी कार्यालये, मनपा कार्यालये, सरकारी व खाजगी बँका येथे “डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड (BEAT Dengue Campaign)” मोहिमेअंतर्गत डास नियंत्रणबाबत कार्यवाही व साफसफाई करण्यात आली. तसेच पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्येही आयुक्त शेखर…

Read More