ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवडमध्ये होणार लातुरकरांचा स्नेहमेळावा – आमदार महेश लांडगे, आमदार अभिमन्यु पवार यांचा पुढाकार

Spread the love

– शहर अन्‌ परिसरातील हजारो लातुरकरांच्या जिव्हाळ्याचा कार्यक्रम

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातून पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण आणि पंचक्रोशीमध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले लातूरकर स्नेहमेळाव्यानिमित्ताने एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी भाजपा आमदार महेश लांडगे आणि मार्गदर्शक म्हणून अभिमन्यू पवार उपस्थित राहणार आहेत.

पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, रांजनगाव, तळेगाव आणि भोसरी एमआयडसी क्षेत्रात तसेच आयटी व सेवा क्षेत्रात मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक शहरात वास्तव्यास आहेत. गावापासून दूर असलेल्या या लातुरकरांना आपुलकीने एकत्र येता यावे. या करिता ‘‘लातुरकरांचा स्नेहमेळावा’’ आयोजित केला आहे.

भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे गुरूवार, दि. २५ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ असा दिवसभर हा स्नेहमेळावा होणार आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर, अहमदपूर, औसा, उदगीर, चाकूर, जळकोट, निलंगा, देवणी, शिरुअनंतपाळ, रेणापूर आदी भागातील सुमारे २५ हजार नागरिक पुणे आणि सभोवतालच्या परिसरात वास्तव्यास आहेत.

…. असा आहे स्नेहमेळावा
‘‘लातूरकरांचा स्नेहमेळावा’’ दणक्यात साजरा होणार आहे. या निमित्ताने भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे यांच्यासह शहरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी आमदार महेश लांडगे आणि मार्गदर्शक म्हणून आमदार अभिमन्यू पवार उपस्थित राहणार आहेत. यावेळी लातुरकरांच्या काही समस्या ऐकूण घेण्यात येणार आहेत. सकाळी १० वाजता कार्यक्रम सुरू होणार असून, दुपारी स्नेहभोजन आणि त्यानंतर विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button