एसआरए प्रकल्पातील घोटाळ्याप्रकरणी अधिकारी निलेश गटणे यांची चौकशी व्हावी भाजप चिटणीस सचिन काळभोर यांची मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी
पिंपर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहर व पिंपरी चिंचवड शहरात एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन) प्रकल्प खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झाले असून, शहरातील झोपडपट्टी भागात खाजगी विकासकांना एसआरए प्रकल्पांतर्गत घरकुल इमारत बांधकाम परवानगी देण्यात येत आहे. यामध्ये मोठ्या प्रमणावर भ्रष्टाचार आणि घोटाळा होत असून या विरोधात पिंपरी-चिंचवड भाजपा चिटणीस तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी जाहीर आक्षेप नोंदवला असून, एसआरए अधिकारी निलेश गटणे यांची चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचे निवदेन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे.
याबाबत काळभोर यांनी निवेदनात म्हटले आहे की, एसआरए प्रकल्प अधिकारी निलेश गटणे व खाजगी विकासक यांचे आर्थिक हितसंबंध असून, त्या संदर्भात एसआरए प्रकल्प अधिकारी निलेश गटणे ह्याची महाराष्ट्र राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच पुणे जिल्हाधिकारी व पुणे विभागीय आयुक्त यांनी चौकशी करावी. निलेश गटणे यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी. तसेच एसआरए प्रकल्पांतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टी भागात खाजगी विकासकांना बांधकाम परवानगी देण्यात आली. मंत्रालयात एसआरए प्रकल्पाच्या नावाखाली बिल्डर व इतर राजकीय नेत्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन नावाखाली एसआरए प्रकल्प राबविण्यात येणार असून त्या ठिकाणी बिल्डर व एसआरए प्रकल्प अधिकारी निलेश गटणे यांचे आर्थिक हितसंबंध असून, त्यासंदर्भात ताबडतोब दखल घेऊन कारवाई करण्यात यावी. शहरातील बहुतांश झोपडपट्टी पुनर्वसन नावाखाली नावाखाली बिल्डरांनी झोपडपट्टी पुनर्वसन सुरू केले आहे. यापैकी काही ठिकाणी झोपडपट्टील नागरिकांना मोर्चा तसेच आंदोलन वगैरे करून एसआरए प्रकल्पाबाबत आक्षेप घेतला असून, काही ठिकाणी सामान्य झोपडपट्टी धारकांनी आंदोलन किंवा मोर्चा काढण्यासाठी लेखी पत्राद्वारे एसआरए प्रकल्प अधिकारी निलेश गटणे यांना लेखी पत्राद्वारे निवेदन देण्यात आले होते. त्यासंदर्भात एसआरए प्रकल्प अधिकारी निलेश गटणे यांनी दखल घेतली नाही. उलट बिल्डरला फोन करून झोपडपट्टीधारक आंदोलन किंवा मोर्चा काढणार आहेत, अशी माहिती मोबाईलद्वारे फोन करुन दिली. निलेश गटणे यांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड पोलिसांकडून काढून घेण्यात यावे. जेणेकरून बिल्डर व एसआरए प्रकल्प अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध जगजाहीर होतील.
झोपडपट्टी भागात बिल्डर व झोपडपट्टी धारक यांचे वादविवाद होत असून बिल्डर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बरोबर घेऊन झोपडपट्टी धारकांना धमकी देऊन हात पाय तोडण्याची भाषा वापरुन दादागिरी करून सह्यांची मोहीम हाती घेऊन आर्थिक लाभाचे आमिष दाखवून बिल्डर झोपडपट्टी धारकांना प्रलोभन देऊन झोपडपट्टी खाली करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करून दडपशाही सुरू आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, ह्यांना लेखी पत्राद्वारे तसेच ईमेलवर तक्रार दाखल केली आहे. त्या संदर्भात अद्याप दखल घेतली नसून, एसआरए प्रकल्प अधिकारी निलेश गटणे यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी काळभोर यांनी केली आहे.