ताज्या घडामोडीपिंपरी

‘डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड’साठी सरसावले युवक काँग्रेसचे शिलेदार! प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव यांच्या पुढाकारातून राबविणार जनजागृती अभियान

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड डेंग्यू आजाराने डोके वर काढले असून दिवसेंदिवस शहरात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत पडणारी भर ही चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर डेंग्यू आजाराबाबत शहरभर जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या शिलेदारांनी कंबर कसली आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांच्या नेतृत्वाखाली २५ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत संपूर्ण शहरात डेंग्यू जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानासंदर्भात चंद्रशेखर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे यांची भेट घेऊन सदर अभियानाची माहिती दिली.
यावेळी या वेळी प्रदेश प्रवक्ते गौरव चौधरी, प्रदेश सोशल मीडिया समन्वयक वसीम शेख, जिल्हा प्रवक्ते विशाल कसबे, जिल्हा सरचिटणीस जिफिन जॉन्सन, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतिक जगताप, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या सात दिवसीय अभियानाचा शुभारंभ उद्यापासून (दि. २५ जुलै) करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत वयवर्ष ६ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी डेंग्यू जनजागृती चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर शहरातील प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना जनजागृती करणारे पत्रक वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत हे पत्रक असणार आहे. त्याचबरोबर शहरभर पथनाट्याद्वारेही नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. तसेच युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आपापल्या परिसरातील घरोघरी जाऊन नागरिकांना स्वच्छतेसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.

प्रतिक्रिया :

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी डेंग्यू आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. महापालिका प्रशासन आपल्या परीने विविध उपाययोजना करीत आहेत. मात्र शहराचा एक जागरूक नागरिक या नात्याने महापालिका प्रशासनाच्या या प्रयत्नांना हातभार लावून आपले शहर डेंग्यूमुक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीनेही विविध उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. नागरिकांनीही या अभियानात सहभागी होऊन ‘डेंग्यूमुक्त पिंपरी चिंचवड’ करण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडावी.
– चंद्रशेखर जाधव,
प्रदेश सचिव, युवक काँग्रेस.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button