Author: maharashtrabreakingnews.com

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डेक्कन जिमखाना पुणे येथील झेड ब्रिजच्या खाली असलेल्या सुकांता लेन हॉकर्स झोन येथे पुराच्या पाण्यातून हातगाडी काढताना घडलेल्या दुर्घटनेत३ हातगाडी धारकांचा मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी असून मृतांच्या नातेवाईकांना शासनाने प्रत्येकी १० लाख रुपये अर्थसाह्य द्यावे व महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभाग कार्यान्वित करून अशा घटना टाळाव्यात अशी मागणी आज कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली. पुणे झेड फ्रीज खाली असलेल्या हॉकर झोनच्या ठिकाणी मोठा पुर आला आणि या पुरात आपली हातगाडी वाहून जाईल म्हणून अभिषेक घाणेकर, आकाश माने आणि शिवा परिहार हे हातगाडी काढण्यासाठी गेले असता विजेचा धक्का लागून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला या दुर्दैवी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – भोसरी विधानसभा क्षेत्रातील ईद्रांयणी नदी काठच्या भागातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना महानगरपालिका पोलीस यांना सांगून सुखरूप बाहेर काढण्यात आमदार श्री पै महेशदादा लांडगे यांना यश आले. संपुर्ण पिंपरी चिंचवड शहरात पावसाने हाहाकार केलेला असतानाच मावळ तालुक्यात पवना खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने ईद्रांयणी नदी दुथडी भरून वाहत असतानाच दुपारी पालिका प्रशासनास सांगून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना केल्या होत्या.परंतु नदीचे पाणी अचानक मोठ्या प्रमाणात वाढल्याने चिखली भागात नदीकाठच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. घटनास्थळी तात्काळ धाव घेत अग्निशामक विभागास संपर्क करून बोलवून घेतले व नागरिकांना अहवान करण्यात आले. नागरिकांना पाण्यातून गाडी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाची पायाभरणी करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे कै. सोपानराव जयवंतराव भोईर यांच्या एकोणिसाव्या स्मृतिदिनानिमित्त गतवर्षीप्रमाणे विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामधे महिलांसाठी भजन स्पर्धांचे आयोजन केले आहे. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि नवप्रगती मित्र मंडळ यांच्या सहकार्याने ‘महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक व ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.     कॅरम स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी २९ जुलै पर्यंत नाव नोंदणी करावी. चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील कै. मनीषा भाऊसाहेब भोईर विरंगुळा केंद्र येथे कॅरम…

Read More

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आधुनिक माहिती- तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञानाची क्षितिजे विस्तारत आहेत. मात्र या युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. त्यातून आपणाला सुरक्षित ठेवणे काळाची गरज आहे. रिवॉर्ड जिंकलेले आहे असे फोन, फेक फोन कॉल्स, फ्रेंड रिक्वेस्ट येणे, मोफत नोकरीचे अमिष, शेअर मार्केट गुंतवणूक, क्रेडिट कार्ड नंबर मागणे, डेबिट कार्ड मागणे, व्हिडिओ कॉल, ऑडिओ कॉल यासारख्या फेक गोष्टींच्या मार्फत फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप यांच्या माध्यमातून जनतेची फसवणूक होताना दिसत आहे. तरुण पिढीही त्याला बळी पडताना दिसते. त्यामुळे स्ट्रॉंग पासवर्ड ठेवणे, तो ठराविक काळानंतर बदलणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक (गुन्हे अन्वेषण) मा. सागर पोमण यांनी केले.सूचना, माहिती आणि…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पुण्याचे महावितरण प्रभारी प्रादेशिक संचालक हे मनमानी कारभार करत असल्याची तक्रार पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनकडून करण्यात आली होती.त्याची दखल घेत महावितरण मुख्यालयाने तातडीने त्यांची उचलबांगडी केली आहे.पूर्णवेळ नवीन प्रादेशिक संचालक म्हणून भुजंग खंदारे यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले असून संघटनेच्या लढ्याला यश मिळाल्याने वीज ग्राहकांच्या अडचणी वेळेत सोडविण्यासाठी मदत होईल असे संघटनेने म्हटले आहे. महावितरण प्रादेशिक संचालक पद हे गेली चार वर्षांपासून रिक्त होते.त्यामुळे गेली चार वर्षे मुख्य अभियंता अंकुश नाळे यांच्याकडे कारभार होता.यादरम्यान पंचवीस लाख रकमेच्या पुढील कार्य पूर्तता अहवालांना दर्जा तपासणीच्या नावाखाली प्रादेशिक संचालक कार्यालयांकडे पाठविण्याचे आदेश नाळे यांनी काढले होते.त्याचा परिणाम…

Read More

गुडघाभर पाण्यातून वावरताना नागरिकांची होतेय तारांबळ पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरात पावसाचा हाहाकार सुरु असून पिंपळे सौदागर येथील लष्कराच्या हद्दीतून येणा-या पाण्यामुळे बीआरटी रोड ते क्रिस्टल हॉटेल रस्त्याला नदीचे स्वरुप आले आहे. पाण्याचा निचरा होण्यास रस्त्याच्या दोन्ही बाजुला स्टॉर्म वॉटर लाईन टाकली नसल्यामुळे रस्त्यावरील पाणी नागरिकांच्या घरात घुसून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांना गुडघाबर पाण्यातून वावरावे लागत आहे. बीआरटी रस्ता ते क्रिस्टल हॉटेल १८ मीटरचा रस्ता तयार करण्यासाठी महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत निविदा राबविण्यात आली. त्यासाठी लागणारी भारतीय लष्कराची जागा देण्यास लष्कर प्रशासनाने हिरवा कंदील दिला असून त्या बदल्यात…

Read More

– सोसायटीधारक प्रवाशांनी व्यक्त केले समाधान – आमदार महेश लांडगे यांनी दिलेला शब्द केला पूर्ण पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकींग न्यूज) – भोसरी विधानसभा मतदार संघातील चऱ्होली गाव मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. येथील तनिष्क पार्क सोसायटी आणि प्राईड सोसायटीपर्यंत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून, भविष्यात पिंपरी-चिंचवडचा हा ‘एन्ट्री पॉईंट’ राहणार आहे. त्यामुळे या भागात पीएमपी बस सुविधा सुरू करण्याबाबत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आणि प्रत्यक्षात बससेवा सुरू करण्यात आली आहे. तनिष्क पार्क बस सेवेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर, यश पवार, संदेश बडिगेर आणि सोसायटीतील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते बसला ‘ग्रीन सिग्नल’…

Read More

आमदार अमित गोरखे यांचे तहसीलदारांना आदेश तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अतिवृष्टी मुळे पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी, पिंपरीगाव,फुगेवाडी,मोरवाडी, दापोडी, भागात नागरिकांच्या घरात शिरले पुराचे पाणी.!!!* पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी पिंपरी गाव फुगेवाडी मोरवाडी, लालटोपी नगर, दापोडी सखल भागात नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे या नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी. यासाठी पिंपरी चिंचवड तहसीलदार जयराज देशमुख यांना त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांनी दिले आहेत. संपूर्ण पुणे जिल्ह्यात गेली 3 ते 4 दिवस सलग अतिवृष्टी होत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यात आज सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यांना उद्या (२६ जुलै २०२४) रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी उद्या देण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २५ जुलै व २६ जुलै २०२४ रोजी पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून पुणे जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा…

Read More

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रभाग क्रमांक-12 तळवडे- रुपीनगर मधील श्रीराम कॉलनी जलमय तळवडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रुपीनगर- तळवडे 1997 साली महापालिकेमध्ये जाऊन ही या परिसरामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. ज्योतिबानगर व रुपीनगर यामध्ये जो नाला आहे त्या नाल्यावर महापालिकेने करोडो रुपये खर्च करून सुद्धा या परिसरातील नागरिकांना योग्य प्रकारचे रस्ते, लाईट, पाणी या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याकारणाने या परिसरातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत.शांताराम भालेकर यांनी केलेल्या मदतकार्यामुळे नागरिकांनी  मोकळा श्वास सोडला. सतत धार पावसामुळे या परिसरातील ड्रेनेज लाईन, स्ट्रॉम वॉटर लाईन चोकअप झाल्या कारणाने हा परिसर पूर्णपणे जलमय झाला असून व नागरिकांना या सर्व परिस्थितीचा…

Read More