ताज्या घडामोडीपिंपरीभोसरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रभाग क्रमांक-12 तळवडे- रुपीनगर मधील श्रीराम कॉलनी जलमय
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रभाग क्रमांक-12 तळवडे-
रुपीनगर मधील श्रीराम कॉलनी जलमय
तळवडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रुपीनगर- तळवडे 1997 साली महापालिकेमध्ये जाऊन ही या परिसरामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. ज्योतिबानगर व रुपीनगर यामध्ये जो नाला आहे त्या नाल्यावर महापालिकेने करोडो रुपये खर्च करून सुद्धा या परिसरातील नागरिकांना योग्य प्रकारचे रस्ते, लाईट, पाणी या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याकारणाने या परिसरातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत.शांताराम भालेकर यांनी केलेल्या मदतकार्यामुळे नागरिकांनी मोकळा श्वास सोडला.
सतत धार पावसामुळे या परिसरातील ड्रेनेज लाईन, स्ट्रॉम वॉटर लाईन चोकअप झाल्या कारणाने
हा परिसर पूर्णपणे जलमय झाला असून व नागरिकांना या सर्व परिस्थितीचा त्रास असून सुद्धा
परिसरामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही नगरसेवक असून ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे या परिसरामध्ये अनेक नागरिकांचा घरात पाण्याचे तळे साचले असून सर्व रस्ते जलमय झालेले चित्र दिसून येत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनातील स्थापत्य विभाग त्याचप्रमाणे ड्रेनेज विभाग यांच्याशी शांताराम भालेकर यांनी संपर्क साधून चार जेसीबी उपलब्ध करून व या यंत्रणेचा वापर करून त्या परिसरातील जलमय झालेले रस्ते व नागरिकांच्या घरातील पाणी बाहेर काढण्यात आले व या परिसरातील नागरिकांनी मोकळा श्वास टाकला.