Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संपूर्ण प्राधिकरण भागामध्ये वीज पुरवठ्यातील अनियमितता आणि अकार्यक्षमता वाढली आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. आम्ही, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत एमएसईबी कार्यालय प्राधिकरणाकडे आपल्या वीज पुरवठ्यातील समस्यांचा तात्काळ निवारणासाठी लेखी निवेदन सादर केले आहे. लेखी निवेदनात आम्ही एमएसईबीच्या कार्यकारी अभियंत्यांना वीज पुरवठ्यातील समस्यांचे त्वरित समाधान करण्याची विनंती केली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तीन दिवसांची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. या मुदतीच्या आत कार्यवाही न केल्यास, त्यांच्या कार्यालयास टाळे ठोकून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महावितरण चे अधिकारी श्री सरोदे आणि श्री वाघमारे यांना देण्यात आला आहे. यावेळी ईखलास भाई सय्यद, दिलीप…

Read More

– टपरी, पथारी, हातगाडी पंचायत महापालिका प्रशासनाला विचारणार जाब – पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – टपरी पथारी हातगाडी, धारक फळभाजी विक्रेते, यांच्यावर होणाऱ्या सततच्या कारवाई विरोधात तसेच सर्वांना परवाना मिळावा. पक्क्या गाळ्यांमध्ये पुनर्वसन व्हावे, यासह विविध मागण्यांसाठी टपरी, पथारी, हातगाडी पंचायतच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उद्या बुधवारी दुपारी पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर हे आंदोलन होणार असल्याची माहिती बाबा कांबळे यांनी दिली. बाबा कांबळे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशातील गोरगरीब, कष्टकरी, बहुजन, मागासवर्गीय कष्टकरी शेतमजूर यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणपणाने लढा दिला. आता अनेकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. परंतु स्वातंत्र्य…

Read More

शाखाप्रमुख, गटप्रमुख यांनी कार्यकर्त्यांमधील दुवा म्हणून काम करावे – संतोष सौंदणकर नेहरूनगर शाखेच्या वतीने नाम फलकासह जेष्ठ शिवसैनिक आणि कोविड योद्ध्यांचा सत्कार पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेच्या पहिल्या शाखेची स्थापना अतिशय खडतर आणि दहशतीच्या वातावरणात झाली होती. विरोधक थेट गावगुंडांच्या माध्यमातून शिवसैनिकांवर हल्ले करायचे. तरीही, हिंदुह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिदुत्वाचा त्याग या शिवसैनिकांनी त्यावेळी केला नाही. त्यांच्या त्यागाच्या आणि बलिदानाच्या बळावर आज शहरात शिवसेनेने आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. कडवट शिवसैनिक हा जुन्या ज्येष्ठ शिवसैनिकांसारखा असावा. मिंधे गटातील गद्दारांनी सुरुवातीला शिवसेना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना संपणार असल्याची आवई उठविली. परंतु, लोकसभेच्या पराभवाने विरोधकांचे…

Read More

-महिला आघाडीच्या घोषणांनी पिंपरी चौक दणाणला पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महायुतीत सहभागी असलेले अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडीचे रौद्ररूप मंगळवारी पिंपरीमध्ये पाहायला मिळाले. ”हा कसला भाऊ, हा तर ओवाळणी खाऊ” असे म्हणत महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रवी राणा यांच्या प्रतिमेला जोडे मारले. ”राणा यांच्या विरोधात करायचे काय खाली डोके वर पाय” अशा घोषणांनी महिलांनी पिंपरी चौक दणाणून सोडला. अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून अमरावतीमध्ये  नुकतेच एक वक्तव्य केले, ते म्हणाले होते की “विधानसभेसाठी तुमचे आशीर्वाद द्या अन्यथा तुमच्या खात्यातून दीड हजार रुपये पुन्हा काढून घेऊ.”  या वक्तव्यानंतर राणा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. धडाडीच्या आणि नव्या दमाच्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर पक्षाची बांधणी आणि आखणीची धुरा सोपविताना भाजप दिसत आहे. त्याचाच प्र्त्येय आज आला. संघटन वाढ आणि युवकांची फौज पाठीशी असणारे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री अनुप मोरे यांची भाजयुमो महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महासचिव विक्रांत पाटील आणि प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांची निवड करण्यात आली आहे. युवा मोर्चाच्या माध्यमातून तरुण, युवा पिढी यांच्यासमोर स्वतःची प्रतिमा जपण्याचं काम अनुप मोरे यांनी केलं. त्यामुळे त्यांच्याशी युवा पिढी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील  विविध उपाययोजना, उपक्रम, प्रकल्प यामध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून ‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अभिप्राय नोंदवावेत. तसेच १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत आपल्या घरावर तिरंगा फडकवावा, असे आवाहन जनसंवाद सभेच्या माध्यमातून आज  करण्यात आले.             पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग नोंदवत   अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह  क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे १९, १४,३,१४,१,७,१२ आणि ८ अशा एकूण ७८ तक्रारी वजा सूचना मांडल्या. सर्व क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या जनसंवाद सभेत विविध…

Read More

– भोसरी विधानसभा मतदार संघात २५ मोफत बस पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गौरी-गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील चाकरमान्यांचा उत्साह यंदा द्विगणित होणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या वतीने मोफत बस दिल्या जाणार आहेत. त्यासाठीचे बुकिंग सुरू झाले आहे. गणेशोत्सव आणि कोकणाचे अनोखं नाते आहे. कोकणी लोकांना गणपती येण्याच्या तीन-चार महिने आधीपासूनच बाप्पाचे वेध लागलेले असतात. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गाड्या फुल्ल असतात. त्यामुळे चाकरमान्यांना खासगी बसनेही प्रवास करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भोसरीतून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना खुशखबर दिली आहे. एसटी महामंडळाच्या 25 बस…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरी चिंचवड शहर बचत गट महासंघ सेलची सुमारे ७० जणांची जम्बो कार्यकारिणी शहराध्यक्षा ज्योती गोफणे यांनी जाहीर केली. पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा ‘नियुक्तीपत्र प्रदान सोहळा’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी आमदार आण्णा बनसोडे, ज्येष्ठ नेते माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, माजी शहराध्यक्षा वैशाली काळभोर, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, पिंपरी चिंचवड निरीक्षक शीतल हगवणे युवती अध्यक्ष वर्षा जगताप, युवक अध्यक्ष शेखर काटे, माजी नगरसेविका माया बारणे, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, सामाजिक न्याय सेलच्या अध्यक्षा गंगा धेंडे, माजी…

Read More

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा स्थापना दिन उत्साहात पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  विद्यार्थ्यांना पारंपारिक शिक्षणाबरोबरच नाविण्यपूर्ण व त्यांच्यातील कौशल्यांचा विकास करणारे शिक्षण देण्याची गरज आहे. देशाच्या वैज्ञानिक प्रगतीत भर घालणारे व संशोधनास प्रवृत्त करणारे शिक्षण पुरवत असताना, त्यांना सांस्कृतीक मुल्ये देखील पुरवायला हवीत. ज्यातून त्यांच्यात राष्ट्रविषयीचे प्रेम आणि समर्पणाची भावना आपसुकच तयार होईल. एमआयटी एडीटी विद्यापीठ देखील अगदी अशाच प्रकारे शिक्षण देत असल्याने, विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा एमआयटी ब्रँडवरील विश्वास वृद्धींगत होत आहे, असे प्रतिपादन भारतीय निती आयोगाचे सदस्य तथा संरक्षण संशोधन आणि विकास संस्था(डीआरडीओचे) माजी चेअरमन पद्मभूषण डाॅ.विजय कुमार सारस्वत यांनी व्यक्त केले. ते येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेली काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालय औंध येथे पुरुष व महिला वार्ड मध्ये साफसफाई होत नसल्या मुळे रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना तीव्र मनस्ताप सहन करावा लागत होता. जिल्हा रुग्णालय येथील शौचालय घाण असून त्या ठिकाणी रोज साफसफाई न करता तसेच वार्ड साफसफाई होत नसल्यामुळे त्या ठिकाणी अक्षरशा झुरळ व रुग्णाच्या टेबल वर मरून पडलेली झुरळे होती तसेच पेशंटच्या बेड वर मांजराची उलटी व रुग्णांना व नातेवाईकांना आत्मनास्पद वागणूक दिली जाते या संदर्भात नागरिकांनी मेघराज लोखंडे अध्यक्ष :- चिंचवड विधानसभा ( राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार ) यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मेघराज लोखंडे यांनी औंध जिल्हा (…

Read More