जिल्हा रुग्णालय औंध येथे झुरळ व मांजरी सुळसुळाट
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेली काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालय औंध येथे पुरुष व महिला वार्ड मध्ये साफसफाई होत नसल्या मुळे रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना तीव्र मनस्ताप सहन करावा लागत होता. जिल्हा रुग्णालय येथील शौचालय घाण असून त्या ठिकाणी रोज साफसफाई न करता तसेच वार्ड साफसफाई होत नसल्यामुळे त्या ठिकाणी अक्षरशा झुरळ व रुग्णाच्या टेबल वर मरून पडलेली झुरळे होती तसेच पेशंटच्या बेड वर मांजराची उलटी व रुग्णांना व नातेवाईकांना आत्मनास्पद वागणूक दिली जाते या संदर्भात नागरिकांनी मेघराज लोखंडे अध्यक्ष :- चिंचवड विधानसभा ( राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार ) यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मेघराज लोखंडे यांनी औंध जिल्हा ( एस.आय ) रुग्णालय येथे स्वता आढावा व पाहणी करत महानगरपालिका प्रशासन जिल्हा रुग्णालय औंध येथे दुर्लक्ष करत आहे व त्या ठिकाणी अस्वच्छता खूप जास्त प्रमाणात पसरली आहे हॉस्पिटल कमी आणि प्राणी संग्रहालय जास्त अशी अवस्था जिल्हा रुग्णालय औंध ची झाली आहे.
जर एखाद्या रुग्णाला त्या ठिकाणी फूड पॉइझन,डेंग्यू,चिका अश्या प्रकारच्या रोग झाल्यास त्या ठिकाणी कोण जबाबदार आहे असा प्रश्न देखील मेघराज लोखंडे यांनी म.न.पा प्रशासनाला विचारला आहे रुग्णांना कोणत्या ही प्रकारची गैरसोय होऊ नये याची दक्षता जिल्हा रुग्णालय यांनी घ्यावी आणि साफसफाई साठी कर्मचारी वाढ करण्याची गरज असल्याचे मेघराज लोखंडे यांनी म्हणले आहे. यावेळी अवधूत कदम,अमित शहाणे आशिष अभिषेक मेमजादे,अभिषेक गिरी,वैभव माने आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.