Author: maharashtrabreakingnews.com

महिला पत्रकार सरकारसाठी लाडक्या बहिणी नाहीत का ? पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – बदलापूर येथे काल झालेल्या जन आक्रोश आंदोलनाच्या वेळी वृत्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना अर्वाच्य भाषा वापरणारे तसेच स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणारे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हेत्रे यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड मधील पत्रकारांनी आज नायब तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे केली. बदलापूर येथे एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारा संदर्भात जन आक्रोश निर्माण झाला होता. यावेळी वृत्तांकन करत असलेल्या महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना तेथील माजी नगराध्यक्ष वामन म्हेत्रे यांनी अर्वाच्य व अश्लील भाषा वापरली व स्त्री मनास…

Read More

पक्ष फोडण्यात मशगुल असलेल्या गृहमंत्र्यांमुळे महाराष्ट्रातील गुन्हेगार मोकाट फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे आंदोलन, फास्टट्रॅक सुनावणी घेण्याची मागणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पक्ष फोडण्यात मश्गुल आहेत. त्यांना महाराष्ट्रात काय चाललंय याच्याशी काही देणे घेणे नाही. महाराष्ट्रात कायदा पायदळी तुडवला जात आहे. गुन्हेगारांवर वचक राहिला नाही. गुन्हेगार पोलिसांना जुमानत नाही तेथे सर्वसामान्य जनतेने काय व्यथा सांगायची. महाराष्ट्राची वाटचाल नक्की कोणत्या दिशेने चालली आहे असा प्रश्न आम्हा कार्यकर्त्यांना पडत आहे. महाराष्ट्रात राजरोसपणे सुरू असलेल्या अंदाधुंदी मनमानीला, गुन्हेगारीला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पुणे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक श्रमशक्ती भवन,आकुर्डी येथे पार पडली. या बैठकीमध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे यांना पक्षाने उमेदवारी द्यावी,अशी भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरुन बोलताना पक्षाचे शहर सरचिटणीस प्रा.जयंत शिंदे म्हणाले की,राज्यात सत्तापरिवर्तन होण्यासाठी पिंपरीत परिवर्तन होणे आवश्यक आहे. यासाठी परिवर्तनवादी चळवळीतून पुढे आलेले आणि शिव-शाहू-फुले- आंबेडकर यांच्या विचारांचा पुरोगामी वारसा पुढे घेऊन जाणारे इंजि. देवेंद्र तायडे यांचा पक्षाने पिंपरी विधानसभेसाठी प्राधान्याने विचार करावा! लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब जो उमेदवार देतील तो निवडून आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष …

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड शहरात उभारण्यात येणाऱे विकास प्रकल्प, पायाभूत सुविधा व त्यांचे शहराच्या पर्यावरणावर होणारे परिणाम यांचे मुल्यांकन करणारा सन २०२३-२४ चा ‘पर्यावरण सद्यस्थिती अहवाल’ आयुक्त तथा प्रशासक शेखऱ सिंह यांच्याकडे आज झालेल्या विशेष बैठकीत सादर करण्यात आला. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृहात झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, मुख्य लेखा परिक्षक प्रमोद भोसले, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, सह शहर अभियंता डॉ.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अमोल थोरात वैफल्यग्रस्त होऊन शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या विरोधात वैयक्तिक पातळीवर टीकाटिपण्णी करून सोशल मीडियावर सवंग प्रसिद्धी मिळवत आहेत. शहरातील काही भाजपचे कार्यकर्ते पक्ष सोडून गेल्याचे खापर शहराध्यक्ष शंकर जगताप व आमदार महेश लांडगे यांच्यावर फोडत आहेत. याच रागातून थोरात यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र, थोरात यांचे वैफल्यग्रस्तेतून बेताल वक्तव्य असून, त्यांचे आरोपही बिनबुडाचे आहेत. थोरात यांना पक्षात कवडीची किंमत नसून केवळ माध्यमाकडून सवंग प्रसिद्धीसाठी थोरात हे स्टंटबाजी करत आहेत, असा घणाघाती आरोप पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. पत्रकात त्यांनी म्हटले आहे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रावेत वाल्हेकरवाडी चिंचवडेनगर चिंचवड या भागात मेट्रोचा विस्तार करावा  अशी मागणी  शिवसेना उद्धव ठाकरे गटाची मागणी  महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड आणि पुणे ह्या झपाट्याने वाढणाऱ्या भागात वाहतूककोंडी सोडवण्यास मेट्रोचा विस्तार होणे काळाची गरज आहे. सध्या असणारे मेट्रोचे मार्ग हे चिंचवड सारख्या मध्यवर्ती भागाला सोडून बाहेरून आहेत. रावेत वाल्हेकरवाडी चिंचवडेनगर चिंचवड हा भाग झपाट्याने नागरीकरण वाढलेला भाग आहे. येत्या काळात येथे अनेक नवीन गृहप्रकल्प उभे राहतील. लाखो विध्यार्थी उच्च शिक्षण घेणाऱ्या अनेक मोठ्या शैक्षणिक संस्था हि येथे आहेत. लाखो कामगार कष्टकरी वर्ग…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे बदलापूर शहरात आणि राज्यामध्ये चाललेल्या महिलांच्या शोषणाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध आंदोलन आज पिंपरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात घेण्यात आले. आंदोलनात अनेक महिला भगिनींनी आपले विचार व्यक्त केले आणि सरकारवर ताशेरे ओढले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दुर्गा भोर यांनी शासनाने महिला सदस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष असून आता महिलांनाच हातामध्ये शस्त्र उचलण्याची वेळ येईल त्याआधी शासनाने कठोर कारवाई करून आतापर्यंत झालेल्या घटनांमधील आरोपींना कठोरात कठोर शासन मृत्युदंड द्यावा अन्यथा महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले तसेच अनेक महिलांनी यावेळी पोलीस खाते शासन आणि प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त केली मार्गदर्शक श्री अभय भोर यांनी…

Read More

पिंपरी/ मुंबई ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुंबईसह महाराष्ट्र राज्यांमध्ये रस्त्यावर विक्री करणारा फेरीवाला हा घटक अत्यंत महत्त्वाचा असू सामान्य माणसांचा सेवक आहे त्यांच्यासाठी असलेल्या कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे महाराष्ट्र राज्यातील ५० लाख फेरीवाल्याकडे सरकारचे दुर्लक्ष झालेले आहे म्हणून सदरच्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी येत्या २६ ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येणार असून लवकरच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर फेरीवाले धडकण्याचा निर्धार आजच्या परिषदेत घेण्यात आला. यावेळी कॉ. दिलीप पवार, मॅकंजी डाबरे, कामगार नेते काशिनाथ नखाते, अखिलेश गौड ,प्रशांत सरखोत,प्रफुल्ल म्हात्रे, के नारायणन, विनिता बाळेकुंद्री, शैलेंद्र कांबळे, हुस्ना खान, बबन कांबळे,इरफान चौधरी,राजू बिराजदार ,किरण गाडेकर, बालाजी लोखंडे, नितीन सुरवसे, शंकर भंडारी,मनोज यादव ,फरीद…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –अमृतसर येथील अटारी बॉर्डरवरील सैनिकांना संस्कार प्रतिष्ठांनच्या महिलांची राखी बांधून रक्षाबंधन अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडली.यावेळी डिव्हिजन कमांडर गौरव सर उपस्थित होते. संस्कार प्रतिष्ठांच्या वतीने बीएसएफ च्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानचिन्ह व शाल देऊन बीएसएफच्या जवानांना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड आणि सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या रक्षाबंधनामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संस्थेच्या 80 सभासद महिलांनी सहभाग घेतला होता रक्षाबंधन करताना महिलांचे आनंदाश्रू अनावर झाले असिस्टंट कमांडंट गौरव शर्मा सर यांनी सर्व महिलांचे कौतुक केले प्रत्यक्ष आम्ही आमच्या घरी जाऊन बहिणींच्या हस्ते राखी बांधू शकत नाही कारण आम्हाला आमचं कर्तव्य महत्त्वाचं असतं अशावेळी आपण…

Read More

चिंचवड ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  चिंचवड येथील कमला शिक्षण संस्था संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज महाविद्यालया मध्ये स्वातंत्र्यदिनी महाविद्यालयातील सायबर योद्ध्यांनी क्विक हील फाउंडेशनच्या सहाय्याने सुरु असलेल्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा कार्यक्रमांतर्गत जनजागृतीपर नाटिका सादर केली. ज्यात, फिशिंग, ओळख चोरी, आणि ऑनलाइन घोटाळे यांसारखे विविध सायबर धोके प्रभावीपणे दाखवण्यात आले. ही नाटिका मनोरंजक स्वरूपात सादर केली गेली, ज्यामुळे ती सर्व वयोगटातील आणि पार्श्वभूमीच्या लोकांसाठी सुलभ झाली. या प्रयत्नामुळे जनतेमध्ये सायबर हल्ल्यांपासून स्वत:चे संरक्षण कसे करावे याविषयी पाथ नाटीकेद्वारे सादरीकरण केले. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजीनदार डॉ. भूपाली शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र…

Read More