संस्कार प्रतिष्ठानचे रक्षाबंधन अमृतसरला भारतीय सैनिकांसोबत
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –अमृतसर येथील अटारी बॉर्डरवरील सैनिकांना संस्कार प्रतिष्ठांनच्या महिलांची राखी बांधून रक्षाबंधन अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडली.यावेळी डिव्हिजन कमांडर गौरव सर उपस्थित होते.
संस्कार प्रतिष्ठांच्या वतीने बीएसएफ च्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानचिन्ह व शाल देऊन बीएसएफच्या जवानांना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड आणि सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या रक्षाबंधनामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संस्थेच्या 80 सभासद महिलांनी सहभाग घेतला होता रक्षाबंधन करताना महिलांचे आनंदाश्रू अनावर झाले असिस्टंट कमांडंट गौरव शर्मा सर यांनी सर्व महिलांचे कौतुक केले प्रत्यक्ष आम्ही आमच्या घरी जाऊन बहिणींच्या हस्ते राखी बांधू शकत नाही कारण आम्हाला आमचं कर्तव्य महत्त्वाचं असतं अशावेळी आपण येऊन आम्हाला राखी बांधता याचा आम्हाला खूप आनंद होतो आपण गेली सात वर्ष अटारी बॉर्डर येथे येऊन रक्षाबंधन करत आहात खूप कौतुकास्पद आपण सण साजरा करत असता यावेळी इन्स्पेक्टर अखिलेश कुमार सब इंस्पेक्टर विजयकुमार उपस्थित होते यामध्ये राजापूर कोल्हापूर सातारा पंढरपूर बारामती दौंड पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर चिपळूण गणपतीपुळे रत्नागिरी येथून महिलांचा सहभाग होता या रक्षाबंधन चे संयोजन डॉक्टर मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र फडतरे मनोहर कड आनंद पुजारी प्रिया पुजारी सायली सुर्वे संध्या स्वामी रेवती जरग श्रुती ताम्हणकर मानसी कदम सचिन जरग यांनी केले होते