रावेत वाल्हेकरवाडी चिंचवडेनगर चिंचवड या भागात मेट्रोचा विस्तार करावा – शिवसेना उद्धव ठाकरे गटाची मागणी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रावेत वाल्हेकरवाडी चिंचवडेनगर चिंचवड या भागात मेट्रोचा विस्तार करावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाची मागणी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड आणि पुणे ह्या झपाट्याने वाढणाऱ्या भागात वाहतूककोंडी सोडवण्यास मेट्रोचा विस्तार होणे काळाची गरज आहे. सध्या असणारे मेट्रोचे मार्ग हे चिंचवड सारख्या मध्यवर्ती भागाला सोडून बाहेरून आहेत. रावेत वाल्हेकरवाडी चिंचवडेनगर चिंचवड हा भाग झपाट्याने नागरीकरण वाढलेला भाग आहे. येत्या काळात येथे अनेक नवीन गृहप्रकल्प उभे राहतील. लाखो विध्यार्थी उच्च शिक्षण घेणाऱ्या अनेक मोठ्या शैक्षणिक संस्था हि येथे आहेत. लाखो कामगार कष्टकरी वर्ग वास्त्यव्यास असून हे कष्टकरी रोज चाकण हिंजवडी तळवडे ह्या भागात प्रवास करतात, आणि वाहतूक कोंडीत अडकतात.
तेव्हा रावेत, वाल्हेकरवाडी चिंचवडेनगर चिंचवड ह्या भागाच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी आणि पर्यावरण संरक्षण हेतूने ह्या भागात मेट्रो अशी मार्गिका होण्यास आवश्यक डी पी आर तयार करावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या चिंचवड विभागाच्या पद्धधिकार्यांनी पुणे महा मेट्रोचे महा व्यवस्थापक श्रावण हर्डीकर ह्यांच्याकडे केली.निवेदन देताना शहर संघटक संतोष सौदणकर, उपशहर हरेश नखाते, विभाग प्रमुख संदीप भालके,विभाग प्रमुख नितीन दर्शले, विभाग संघटक अमित दर्शले, विभाग समन्वयक अक्षय पांढरे यावेळी उपस्थित होते.