दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे बदलापूर येथे झालेल्या महिलांच्या शोषणाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध आंदोलन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे बदलापूर शहरात आणि राज्यामध्ये चाललेल्या महिलांच्या शोषणाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध आंदोलन आज पिंपरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात घेण्यात आले.
आंदोलनात अनेक महिला भगिनींनी आपले विचार व्यक्त केले आणि सरकारवर ताशेरे ओढले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दुर्गा भोर यांनी शासनाने महिला सदस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष असून आता महिलांनाच हातामध्ये शस्त्र उचलण्याची वेळ येईल त्याआधी शासनाने कठोर कारवाई करून आतापर्यंत झालेल्या घटनांमधील आरोपींना कठोरात कठोर शासन मृत्युदंड द्यावा अन्यथा महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले तसेच अनेक महिलांनी यावेळी पोलीस खाते शासन आणि प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त केली मार्गदर्शक श्री अभय भोर यांनी राज्यातील पुरुषांनी सुद्धा पुढाकार घेऊन महिलांनीच महिलांसाठी मोर्चे नाही तर पुरुषांनी ही महिलांसमोर भिंत बनून राहिले पाहिजे महिलांकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे डोळे काढून ठेवले पाहिजे.
शासनाने लाडकी बहीण योजना कडून दीड हजार रुपये दिले परंतु आज महाराष्ट्रात अनेक बहिणींना हे दीड हजार रुपये त्यांच्या कफन वेळ येऊ नये पुढील काळामध्ये कठोर शासन करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी आणि लाडकी बहीण योजनेपेक्षा महिलांना सुरक्षा अनेक आधुनिक यंत्रणा वापरून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली या ठिकाणी दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या असंख्य महिला उपस्थित होत्या.