- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महापालिकेच्या नगररचना व विकास विभागामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवा सुविधांसाठी सुधारित दर निश्चित करण्यात आले असून या विषयांसह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या विशेष बैठकीत मान्यता दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय प्रशासक सिंह यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. या विषयांना प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही देशातील तसेच महाराष्ट्रातील वेगाने वाढणारे शहर असून गेल्या २० वर्षात शहरातील लोकसंख्या झपाट्याने…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “स्थापनेपासून सातत्याने समाजासाठी आणि देशासाठी योगदान देणारा टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी आहे!” असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य आदर्शगाव संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी चिंचवडला व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, पुणे आयोजित भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळ्यात पोपटराव पवार बोलत होते. ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे अध्यक्षस्थानी होते. या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील उद्योजकांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये तळवडे येथील श्री ओम टेक्नो सर्व्हिसेसचे संचालक अनिल शेटे आणि कात्रज येथील गणेश ग्रुप इंजिनिअरिंग प्रॉपर्टीजचे संचालक मंगेश पोखरकर यांना भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगरत्न पुरस्काराने…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – हरियाणा विधानसभा निवडणुकीत सर्व आघाडीच्या माध्यमांचा एक्झिट पोल खोटा ठरवत हरियाणाच्या सूज्ञ जनतेने कोणत्याही भूलथापा, खोटी आश्वासने व अपप्रचार यांना बळी न पडता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ; सबका विकास’ या संकल्पनेला साथ देत हरियाणामध्ये तिसऱ्यांदा कमळ फुलवत ‘हॅटट्रिक’ची किमया साधली. त्याबद्दल सर्वप्रथम हरियाणातील सर्व मतदार बंधू-भगिनींचे आभार. लवकरच महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होणार असून हरियाणातील या विजयामुळे राज्यातील भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती साधण्यासाठी आम्हीही उत्सुक असून पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तिन्ही जागांवर महायुतीचेच उमेदवार विजयी होतील, असा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी हे अभिनामाचे पद नव्याने निर्माण करणे, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदावर आनंद गायकवाड, पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंता या पदावर सोहन निकम, विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता या पदावर महेश कावळे, संतोष दुर्गे, समीर दळवी तसेच जेष्ठ वैद्यकीय अधिकारी या पदावर डॉ. वर्षा घोगरे आणि डॉ. शंकर मोसलगी, निवासी वैद्यकीय अधिकारी या पदावर लक्ष्मीकांत अत्रे आणि सहाय्यक आयुक्त या पदावर नाना मोरे यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्याच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी महापालिका सभेत मान्यता दिली. महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय आज प्रशासक सिंह यांच्या मान्यतेसाठी विशेष…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – इंदिरानगर, चिंचवड या झोपडपट्टीतील रहिवास्यांचे एसआरए अंतर्गत पुनर्वसन प्रकल्प राबविण्याचे काम सुरू झाले असून याठिकाणी एसआरए मार्फत लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली आहे; परंतु प्रसिद्ध करण्यात आलेली ही यादी सदोष असून यामध्ये बिल्डरमार्फत एसआरए अधिकारी आणि कर्मचारी यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केले असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांच्याकडे लेखी निवेदना द्वारे केला आहे. याबाबत नागरिकांचे प्रतिनिधी ॲड. उमेश खंदारे आणि दुर्योधन कदम यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका हद्दीतील स. नं. २०४ पै. व २०५ पै. एम. आय. डी. सी.च्या जागेवर अस्तित्वात असलेल्या चिंचवड…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- सावित्रीच्या लेकींनी सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. या नवदुर्गेची वेगवेगळी रूपं पाहत आहोत. पंतप्रधान, राष्ट्रपती,अवकाश विरांगणा,गान कोकिळा,लोकसभा अध्यक्षा ते आज राष्ट्रपती पद भूषविणार्या द्रौपदी मुर्मू अशी त्या- त्या क्षेत्रात सर्वोच्च पदी विराजमान झालेल्या महिलांची कितीतरी नावे सांगता येतील. ती शिकली, ती जिंकली, प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक कला, प्रत्येक मार्ग तिने व्यापला.इतकच काय प्रत्येक परिक्षेत, कसोटीवर अग्रभागी आहे. नवदुर्गेच्या नऊ रूपात तिचा वावर आहे. तिच्या जीवनातला अंधार पुरता निवळलेला नाही. अजूनही कुणीतरी दुर्दैवी निर्भया आहेतच. कायदा आणि समाज तिच्या पाठीशी आज उभा आहे.पण अजूनही हुंडा, कुंडली, षडाष्टक, उपासतापास अशा सामाजिक दृष्ट चक्रातून तिची पुरती सुटका झालेली…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता पासून पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भुमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे. शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भुमिपूजन या कार्यक्रमासाठी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तर राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहरराच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाने आणि शहराध्यक्ष राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकरच्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले.भाजप प्रणित महाराष्ट्र सरकारने राज्यात अक्षरशः शिक्षणाचा खेळ खंडोबा केला आहे. सरकारने दोन वर्षापासून शिक्षण क्षेत्राशी निगडित घेतलेले असंख्य निर्णय हे विद्यार्थ्यांच्या शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवत आहेत . हे सरकार बदलल्याशिवाय विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी संपणार नाहीत. म्हणूनच सरकार बदला, शिक्षण वाचवा घंटानाद आंदोलन करण्यात आले. .पिंपरी चिंचवड शहराच्या शहराध्यक्ष श्री. राहुल आहेर यांनी संबोधताना असे म्हणाले की , जिल्हा परिषदेच्या शाळेतील…
पीएमआरडीएकडून धडक कारवाई : लोणीकंदमध्ये पाच जणांवर गुन्हे दाखल पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हवेतील तालुक्यातील लोणीकंद भागातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या पाच जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले. संबंधित अनधिकृत बांधकाम थांबविण्याबाबत संबंधितांना काही दिवसांपुर्वी नोटीस दिली होती. पण त्याचे अनुपालन न झाल्याने पीएमआरडीएकडून आता धडक कारवाई होत असून सोमवारी (दि.७) संबंधितांवर गुन्हे नोंदविण्यात आले. लोणीकंद (ता. हवेली येथील) येथील स.नं. १६७ मध्ये अनधिकृत बांधकाम करणारे किशोर सुर्यकांत ढमढरे, लक्ष्मण श्रीपती ढमढरे, रफिक इक्बाल शेख, सागर दामोदर धोत्रे, अनिता संजय जोशी ( सर्व रा. लोणीकंद, ता. हवेली) यांचे विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात अनधिकृत बांधकाम सुरू…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना आणि केंद्रीय अन्वेषण विभाग ( सीबीआय ), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)यांच्या संयुक्त विद्यमाने भ्रष्टाचारविरोधी जागरुकता अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोशी संतनगर येथील पर्ल बेन्क्वीट हॉलमध्ये बुधवार दि. ९.१०.२०२४ रोजी दु. ४.०० वा. हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक (सीबीआय,एसीबी,पुणे ) गोपाल नाईक, पोलीस निरीक्षक एस.आर.नायर, संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे आणि संघटनेचे पदाधिकारी, संचालक, स्विकृत संचालक, सल्लागार व संघटनेचे सभासद उपस्थित राहणार आहेत. सीबीआय नागरीकांसाठी कशा प्रकारे उपयुक्त आहे, यासंदर्भात या कार्यक्रमात माहिती देण्यात येणार आहे. त्याशिवाय नागरिकांना त्यांच्या शासकीय कार्यालयाशी निगडीत बँका, पोस्ट कार्यालय, आयकर…
