पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेकडून उद्या भ्रष्टाचारविरोधी जागरूकता अभियान
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना आणि केंद्रीय अन्वेषण विभाग ( सीबीआय ), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)यांच्या संयुक्त विद्यमाने भ्रष्टाचारविरोधी जागरुकता अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मोशी संतनगर येथील पर्ल बेन्क्वीट हॉलमध्ये बुधवार दि. ९.१०.२०२४ रोजी दु. ४.०० वा. हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक (सीबीआय,एसीबी,पुणे ) गोपाल नाईक, पोलीस निरीक्षक एस.आर.नायर, संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे आणि संघटनेचे पदाधिकारी, संचालक, स्विकृत संचालक, सल्लागार व संघटनेचे सभासद उपस्थित राहणार आहेत. सीबीआय नागरीकांसाठी कशा प्रकारे उपयुक्त आहे, यासंदर्भात या कार्यक्रमात माहिती देण्यात येणार आहे. त्याशिवाय नागरिकांना त्यांच्या शासकीय कार्यालयाशी निगडीत बँका, पोस्ट कार्यालय, आयकर कार्यालय, कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालय, जीएसटी कार्यालय आदिशी संबंधीत कामकाजात येणाऱ्या अडचणीबाबत देखील या वेळी चर्चा करण्यात येणार आहे.