भाजप प्रणित महाराष्ट्र सरकारच्या गलथान कारभारला कंटाळून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने घंटानाद आंदोलन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहरराच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाने आणि शहराध्यक्ष राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकरच्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले.भाजप प्रणित महाराष्ट्र सरकारने राज्यात अक्षरशः शिक्षणाचा खेळ खंडोबा केला आहे. सरकारने दोन वर्षापासून शिक्षण क्षेत्राशी निगडित घेतलेले असंख्य निर्णय हे विद्यार्थ्यांच्या शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवत आहेत .
हे सरकार बदलल्याशिवाय विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी संपणार नाहीत. म्हणूनच सरकार बदला, शिक्षण वाचवा घंटानाद आंदोलन करण्यात आले. .पिंपरी चिंचवड शहराच्या शहराध्यक्ष श्री. राहुल आहेर यांनी संबोधताना असे म्हणाले की , जिल्हा परिषदेच्या शाळेतील आमचा गणवेश आम्हाला द्या जो तुम्ही विधानसभा सभागृहात क्वालिटी असलेला दाखवला होता, कमी पटसंख्येचा नावाखाली चौदा हजार जिल्हा परिषद शाळा बंद केल्या , कंत्राटी शिक्षक भरती , जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे पोकळ आश्वासन, शिक्षकांना दोन वर्षापासून पगार नाही, तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षक नेमलेले नाहीत, रोजगार निर्माण देणाऱ्या कंपन्या गुजरात व इतर राज्यात गेल्या, नीट परीक्षातील भ्रष्टाचार, एम फॉर्म विद्यार्थ्यांना मिळणारा स्टाईफंड बंद केला, पीएचडी विद्यार्थ्यांची छात्रवृत्ती बंद केली , सरळ सेवा भरती जागा रिक्त ठेवल्या , सरळ सेवा भरती परीक्षा फी वाढवली. असे अनेक मुद्द्यांच्या विरोधात निषेध नोंदवण्यात आला . यावेळी प्रस्तावना भोसरी विधानसभा मुख्य सरचिटणीस चैतन्य बनकर यांनी केले . प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड मुख्य प्रवक्ते माधव पाटील , महिलाअध्यक्ष अध्यक्ष ज्योती निंबाळकर , माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, ओबीसी सेल शहराध्यक्ष विशाल जाधव , भोसरी विधानसभा ओबीसी विभाग अध्यक्ष ज्ञानेश आल्हाट ओबीसी भोसरी अध्यक्ष संतोष माळी , ग्राहक संरक्षण समिती कार्याध्यक्ष सुशांत खुरासने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी ऋषभ भडाळे, ज्ञानेश्वर पुदाले , वैष्णवी पवार, आर्यन धोत्रे, स्वप्निल खंडागळे, आदित्य सोनवणे, ऋतिक गायकवाड, अभिषेक कांबळे, उमान शेख, संकेत वाघमारे, अरबाज खान, भूषण कुदळे, सुरज आवारे , तुषार गायकवाड, आर्यन गायकवाड, साहिल जुमघरे , संविधान वाघमारे, ऋषिकेश सत्रे आदी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .