ताज्या घडामोडीनवरात्री विशेषपिंपरी

राजकीय क्षेत्रात सामाजिक दायित्व जपणारी नवदुर्गा – सुजाता हरेश नखाते

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- सावित्रीच्या लेकींनी सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. या नवदुर्गेची वेगवेगळी रूपं पाहत आहोत. पंतप्रधान, राष्ट्रपती,अवकाश विरांगणा,गान कोकिळा,लोकसभा अध्यक्षा ते आज राष्ट्रपती पद भूषविणार्‍या द्रौपदी मुर्मू अशी त्या- त्या क्षेत्रात सर्वोच्च पदी विराजमान झालेल्या महिलांची कितीतरी नावे सांगता येतील. ती शिकली, ती जिंकली, प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक कला, प्रत्येक मार्ग तिने व्यापला.इतकच काय प्रत्येक परिक्षेत, कसोटीवर अग्रभागी आहे.

नवदुर्गेच्या नऊ रूपात तिचा वावर आहे. तिच्या जीवनातला अंधार पुरता निवळलेला नाही. अजूनही कुणीतरी दुर्दैवी निर्भया आहेतच. कायदा आणि समाज तिच्या पाठीशी आज उभा आहे.पण अजूनही हुंडा, कुंडली, षडाष्टक, उपासतापास अशा सामाजिक दृष्ट चक्रातून तिची पुरती सुटका झालेली नाही. ती लढवय्यी आहे. ही सारी जोखडं झुगारून ती पुढे चालत राहील. प्रत्येक दुर्गोत्सवात तिची क्रांतीज्योत अधिकाधिक तेजस्वी होत जातेय. समाज दीर्घ निद्रेतून जागा होत आहे. कायदा कायद्याचं काम करेल, समाज समाजाचं. पण सावित्रीच्या लेकी, तुझी तू समर्थपणे लढायला सिद्ध हो! तू खुद को बदल तब ही जमाना बदलेगा तू बोलेगी ,मुह खोलेगी,तब ही तो जमाना बदलेगा. अशाच नवदुर्गा म्हणजे काळेवाडीतील शिवेसेनाचा बुलंद आवाज असणाऱ्या सुजाता हरेश नखाते होत.

नवदुर्गा निमित्त पिंपरी काळेवाडी शिवसेना महिला संघटिका सुजाता हरेश नखाते यांच्याशी सवांद साधला. त्या म्हणाल्या, माझे पती हरेश नखाते यांना समाजकार्याची आवड असल्याने त्यांच्या पावला वर पाऊल ठेवून मी ही समाज कार्यात भाग घेऊ लागले . अर्थात हे सगळे माझ्या पती मुळे शक्य झाले. काळेवाडी येथील समस्या सोडवताना अनेक प्रश्न हाताळले व सोडवले.अनेक महिलांच्या प्रश्नावर पाठपुरावा करत असताना माझ्या भागातील अनेक समस्यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मोर्चाचे नियोजन करून प्रश्न मार्गी लावण्यास काम केले.

सर्वसामान्य माणसाला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नावर माझ्या भागातील सर्व प्रश्न प्रयत्न करीत आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाला रोज सरकारने सांगितलेल्या सर्व नियमाचे पालन करण्यासाठी जनजागृती केली. हे करत असताना अनेकांना मदतीचा हात दिला.
शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. अनेकांना रोजगार निर्मिती करण्यासाठी रोजगार मेळावा उपलब्ध केले.

अनेकांना रोजगार निर्मिती करण्यासाठी रोजगार मेळावा उपलब्ध केले.हे काम करत असताना शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मला मदत केली. पाणी, आरोग्य, महिला सक्षमीकरण आदी प्रश्न सोडवले. मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये त्या कामांमध्ये कराटेंचे प्रशिक्षण घेतलेले अनेक प्रशिक्षित वर्ग चालू केले आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या भागातील ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्याच्या सर्व तपासण्या व औषध उपचार मोफत चे शिबिर आयोजित करण्यात आले होते.माझे पती हरेश आबा बाळकृष्ण नखाते यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या भागातील ज्येष्ठ नागरिक साठी विविध आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत असतात.

शासनाप्रमाणे वटपौर्णिमा महाशिवरात्री आषाढी वारी तसेच दिवाळीमध्ये दिवाळी पहाट लहान मुलांसाठी किल्ले बनवा स्पर्धा, शेती स्पर्धा, कुटुंबासाठी दिवाळी सेल्फी स्पर्धा आपण आयोजित करतो. दिवाळी फराळ, हळदी कुंकू समारंभ,नवरात्र निमित्त नवरात्र उत्सवानिमित्त महिलांसाठी नवरंग स्पर्धा, अशा स्पर्धा घेऊन महिलांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असते. महिलांवरील होणाऱ्या अत्याचार प्रतिबंध करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील आहे असतात.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आहे निवडणुकीमध्ये मी आपली सेवा करण्यास तात्पर्य आहे तरी सर्व नागरिकांनी आपण मला आपलंसं करून घेऊन सेवा करण्याची संधी द्यावी हीच सर्वांना अपेक्षा व्यक्त करते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button