Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्यावर हक्क भंग कारवाई करून सेवेतून हकालपट्टी  केल्यास राज्यातील सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना न्याय मिळेल या मागणीचे निवेदन शरद पवार संजीवनी आरोग्य मित्रचे राज्यप्रमुख डॉ. सतिश दत्तात्रय कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या राज्यातील परिस्थिती सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांसाठी आरोग्य सेवा मिळणे  खूप भयानक झालेले आहे , खाजगी योजना समाविष्ट रुग्णालय जुन्या पिक्चर मधील डाकू मंगलसिंग चे चोरीचे अड्डे झालेले आहेत, त्यांना भस्म्या आजार जडला आहे , मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांची बिलासाठी लूट करताना दिसत आहेत. आपण सर्व…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये  सोमवार दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत जनसंवाद सभा होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय महिन्यातील दुस-या आणि चौथ्या सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या असून ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

Read More

विजयादशमी आणि साईबाबा पुण्यतिथी निमित्त धार्मिक कार्यक्रम पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – विजयादशमी आणि श्री साईबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त वडमुख वाडी येथील साई मंदिरामध्ये हजारो भक्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शनिवारी, विजयादशमीच्या दिवशी दुपारची आरती विश्वस्त, अध्यक्ष सुभाष नेलगे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मुख्य मंदिरातील दीपोत्सवात भाविकांनी सहभाग घेतला. शुक्रवारी सकाळी सुरू झालेल्या या सांस्कृतिक महोत्सवाची सांगता रविवारी श्रीं ची काकड आरती, सनई वादन, मंगलस्नान, गोपाळकाला, माध्यान्ह आरती, धुपारती, शेजारती अशा विविध धार्मिक कार्यक्रमाने झाली.

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “नुकताच अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आलेली मराठी मुळातच अभिजात भाषा आहे. प्राचीन काळापासून संतसाहित्यासह वैविध्यपूर्ण साहित्याच्या समावेशामुळे ती समृद्ध झाली आहे!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. दिलासा साहित्य सेवा संघ आयोजित दिलासा व्हॉट्सॲप समूहावर वर्षभर साप्ताहिक सदरलेखन करणार्‍या लेखकांचा सन्मान करताना गिरीश प्रभुणे बोलत होते. माजी नगरसेवक सुरेश नढे – पाटील अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के, क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड यांच्या मातोश्री सविता दशरथ गायकवाड, दिलासाचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांची व्यासपीठावर; तर ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी, प्रा. डॉ. धनंजय भिसे, सुहास घुमरे, जयश्री…

Read More

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आयोजित कार्यक्रमाला १ लाखांहून अधिक नागरिकांची हजेरी महाभोंडला कार्यक्रमात कथ्थक, रासगरबा, गोंधळी, पारंपारिक नृत्यांचे सादरीकरण सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार यांच्या वतीने विजयादशमीनिमित्त आयोजित करण्यात आलेला महिलांसाठी महाभोंडला व रावणदहन सोहळा पिंपळे गुरव, सांगवी आणि पिंपरी चिंचवड शहरातील लाखो नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि जल्लोषात संपन्न झाला. सुमारे १ लाखांहून अधिक नागरिकांच्या साक्षीने अहंकाराचे प्रतीक असलेल्या रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. सांगवी येथील पीडब्लूडी ग्राउंडवर शनिवारी (दि. १२ ऑक्टोबर) सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत हा सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व  छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी माता आणि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- विजयादशमी निमित्ताने शनिवार नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन यांच्या सौजन्याने पिंपळे सौदागर याठिकाणी पिंपरी-चिंचवड, पुणे शहरातील सर्वात भव्य दिव्य असा रावण दहन कार्यक्रम संपन्न झाला. यंदाचा विजयादशमी कार्यक्रम पिंपळे सौदागरच नव्हे तर संपूर्ण शहरासाठी आकर्षक ठरला.जय श्रीराम नावाचा जयघोष करीत रावणाचा प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तीन दिवसांपूर्वीच भारतातील सर्वात आदरणीय आणि यशस्वी  उद्योगपती स्व.रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला यामुळे या कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी सर्व पिंपळे सौदागर वासिया तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले अक्षय फटे यानी हनुमान पात्र साकारत उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच या कार्यक्रमात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – तळवडे ते चऱ्होली हा प्रवास आता सुसाट होणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने देहू ते आळंदी रस्त्याच्या डांबरीकरण  व मजबुतीकरण कामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. या कामासाठी आमदार महेश लांडगे यांनी प्रचंड पाठपुरावा केला होता. नागरिकांची गैरसोय, रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण होणे गरजेचे आहे असा मुद्दा आमदार लांडगे यांनी निदर्शनास आणून दिला होता. याची दखल घेत प्रशासनाने या कामाची निविदा प्रसिद्ध केली असून, लवकरच हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. भोसरी मतदारसंघात येणाऱ्या तळवडे ते चऱ्होली या भागामध्ये प्रचंड नागरिकरण वाढले आहे. त्याच तुलनेत तळवडे, चिखली, मोशी या भागात…

Read More

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपा आमदार महेश लांडगे यांचे निवेदन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवडमधील महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरला पद्मभूषण रतन टाटा यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले आहे. उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात भारताची मान जगभरात उंचावणारे देशाचे महान सुपुत्र पद्मभूषण सर रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. संपूर्ण देशाने शोक व्यक्त केला आणि दुखवटा पाळला. औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या विकासामध्ये टाटा ग्रुपचा मोलाचा वाटा राहिला आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या माध्यमातून शहरात औद्योगिक क्षेत्राला सुरूवात…

Read More

रतन टाटा यांना सायन्स पार्कमध्ये श्रद्धांजली अर्पण पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पाच गावांचे एकत्रीकरण करून पिंपरी चिंचवड नगरपालिका स्थापन झाली. मेट्रो सिटी असा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी चिंचवडचे नाव घेतले जाते. यामधे उद्योगपती रतन टाटा यांचे अमूल्य योगदान आहे. त्यांच्या स्मृती चिरंतन जतन करण्यासाठी शहरवासीयांनी पुढे यावे असे आवाहन पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तुपे यांनी केले.    भारताच्या उद्योग जगताचे पितामह पद्मविभूषण रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. पुणे, पिंपरी चिंचवड शहर व रतन टाटा यांचे भावनिक स्नेह संबंध होते. रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चिंचवड,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आजच्या या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात माणूस आपल्या अपूर्ण स्वप्नांच्या पूर्ततेसाठी अविरतपणे धावतो आहे. मात्र हे धावणे त्याला सर्वच पातळ्यांवर समाधानी ठेवू शकत नाही. त्यामुळे मानसिक आरोग्य राखणे हे सर्वांपुढील आव्हान आहे, असे प्रतिपादन मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. बाबासाहेब पवळ यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात ‘१० ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त’ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, आपल्या क्षमतेनुसार स्वप्न पाहणे, त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणे, आत्मविश्वास जागृत ठेवणे, सकारात्मक राहणे, अपयश पचविण्याची क्षमता ठेवणे, सकारात्मक लोकांच्या सहवासात राहणे आणि प्रामाणिकपणा, नम्रता, सत्यता, सोज्वळता, अहिंसेवर भर दिल्यास मानसिक…

Read More