- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
– शहरातील पहिला पिंपरी-चिंचवड स्पोर्ट्स क्लबची पायाभरणी – आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेला प्रशासनाचे पाठबळ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून कै. आण्णासाहेब मगर स्टेडिअम आधुनिकपद्धतीने विकसित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी शहरातील पहिला पिंपरी-चिंचवड स्पोर्ट्स क्लब उभारण्यात येणार आहे. प्रशासनाने या प्रकल्पाचा ‘प्रोजेक्ट रिपोर्ट’ तयार केला आहे. आगामी काळात या प्रकल्पाच्या माध्यमातून शहराच्या क्रीडा क्षेत्राला नवा आयाम मिळणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून कै. आण्णासाहेब मगर स्टेडिअमचे पुनरुज्जीवन करण्यात करण्यात येत आहे. मात्र, सदर स्टेडिअम दुसरीकडे स्थलांतरीत करण्यात येईल, असा ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवण्याचा प्रयत्न राजकीय हेतुने केला जातो आहे. परंतु, यामध्ये…
२०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघासाठी २३ नामनिर्देशन अर्जाची विक्री पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक २४/१०/२०२४ रोजी विहित वेळेत तिस-या दिवशी एकुण ९ व्यक्तींनी निगडी येथील २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातुन एकुण २३ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे. आज नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी नोंदविलेल्या माहितीचा तपशील :- सावळे सिमा राजेंद्र ,काळूराम मारुती पवार ,अजय सुधाकर गायकवाड ,प्रतिक्षा अर्जुन कांबळे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), डॉ.मनिषा सुमंत गरुड(गायकवाड) (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) ,सुरेश हरिभाऊ भिसे ,सुलक्षणा राजू धर (राष्ट्रवादी कॉग्रेस,शरदचंद्रजी पवार), लक्ष्मण (दादा) आत्माराम शिरोळे (रिपब्लीकन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने काल दुपारी ३ वाजेपासून ते आज दि. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत १६ व्यक्तींनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून ३८ नामनिर्देशन पत्रे नेली असून आतापर्यंत एकही नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलेले नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाद्वारे निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध झाली असून उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरण्यास देखील सुरुवात झाली आहे. त्यानुसार थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील तिसऱ्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सद्गुरु नगर भोसरी येथे झालेल्या अपघातात पाच बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखदायक आणि संताप जनक आहे. वास्तविक महाराष्ट्र शासन, ठेकेदार आणि महापालिकेचा बांधकाम परवाना विभाग यांच्या अक्षम्य चुकामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना वारंवार घडत आहेत याला प्रतिबंध घालण्यासाठी सुरक्षितता, सुरक्षिततेची साधने आणि सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. कंपन्या आणि उद्योजकांना सरकार अभय देत असल्यामुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत. सदरच्या घटनेमधील सर्वदोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी.सदर घटना दुर्दैवी आहे मृतांच्या नातेवाईकांना ताबडतोब प्रत्येकी दहा लाख रुपये अर्थसाह्य देण्यात यावे. कामगार नेते काशिनाथ नखाते…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर पथविक्रेता समितीची निवडणूक झाली यात पिंपरी चिंचवड शहरातील सर्व विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आणि नॅशनल हॉकर्स फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघ कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वातील पॅनलच्या ७ पैकी ६ उमेदवार भरघोस मताने विजयी झाले. याबद्दल कामगार नेते काशिनाथ नखाते व विजयी उमेदवार , पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज कौतुक केले. यावेळी किरण साडेकर, प्रल्हाद कांबळे,किसन भोसले, सलीम डांगे, राजू बिराजदार ,लक्ष्मण शेरखाने,संतोष माळी, राजेश माने आदी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात स्थापनेपासून आजपर्यंत आयुक्ताच्या…
परळी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज परळी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-२०२४ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे, मा. खा. प्रीतम मुंडे आणि मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. 2019 साली परळीतून धनंजय मुंडे निवडून आले होते. त्यामुळे महायुतीत परळी विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडे आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं औक्षण केलं.
मेळाव्यात हजारो तरुण सभासदांचा उत्स्फूर्तपणे सहभाग चिंचवड मतदारसंघातील कामगार वर्गापर्यंत कमळ पोहचविण्याचा संकल्प चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा निवडणुकीत पुढील २५ दिवस संघर्षाचे दिवस आहेत. आपला विजय निश्चितच आहे. त्यामुळे हा संघर्ष विजयासाठी नसून महाविजयासाठी करायचा आहे. शंकरभाऊंना मागील दोन निवडणुकांच्या तुलनेत अधिक मताधिक्याने आमदार पदी निवडून आणायचे आहे. आणि त्यासाठी आमचा सिंहाचा वाटा असेल असा संकल्प, माथाडी व जनरल कामगार युनियनच्या हजारो सभासदांनी केला. वाल्हेकरवाडी येथील चिंचवडे लॉन्स याठिकाणी भारतीय जनता माथाडी आणि सुरक्षारक्षक कामगार युनियन महासंघाचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला शहरातील जवळपास १३०० हुन अधिक सभासद उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. “सध्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रिडा व युवक सेवा संचालनालय, (महाराष्ट्र राज्य) पुणे जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, पालघर द्वारा आयोजित राज्य स्तरीय रोलर हॉकी क्रिडा स्पर्धा (२०ऑक्टो ते २१ऑक्टो २०२४) विरार मध्ये पार पडल्या. वयोगट १९ वर्षाखालील मुले मध्ये टाटा मोटर्स विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल ने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी अवघड निकष आहेत. प्रथम जिल्हास्तरीय स्पर्धा मधील विजेता संघ हा विभागीय स्पर्धेसाठी पात्र होतो. पुणे विभागात – पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, नगर शहर, नगर ग्रामीण, रायगड, सोलापुर शहर, सोलापुर ग्रामीण या सर्वांचा समावेश आहे. विभागीय स्पर्धेतील विजेता संघच फक्त…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती अंतर्गत रयत शिक्षण संस्थेचे, महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी, पुणे-१७ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरविभागीय मुले हॉकी स्पर्धांचे आयोजन १५ आणि १६ ऑक्टोबर २०२४ रोजी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, पिंपरी या ठिकाणी करण्यात आले. या स्पर्धांमध्ये चार विभागातील विविध संघाच्या माध्यमातून ७२ मुलांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा बुधवार दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी २:३० वा. वाजता मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, पिंपरी या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमासाठी एम. यु. वाणिज्य महाविद्यालय, पिंपरीचे शारिरीक शिक्षण संचालक प्रा. शाकुर सय्यद हे प्रमुख पाहुणे…
– जातीद्वेष संपवून हिंदूंनी एकत्रित येण्याची गरज – निगडीत मातृशक्ती जागर कार्यक्रम निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – स्त्रीचा शब्द कुटुंबात परवलीचा शब्द असतो, ते एक अस्त्र असते त्याची ताकत ओळखून त्यांनी द्वेषमुक्त निकोप एकसंध समाजनिर्मितीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जेष्ठ सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले. निगडी येथील सावरकर मंडळ परिसरात झालेल्या भव्य मातृ शक्ती जागर कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई तारे प्रामुख्याने उपस्थित होत्या. पुढे बोलतांना सोलापूरकर यांनी मातृसत्ताक पद्धतीचा उल्लेख करत चापेकर बंधूंच्या मातोश्रींचे उल्लेख करून राष्ट्रहितासाठी असंख्य महिलांचे अतुलनीय योगदान आहे आता महिलांना त्यांचे न्याय हक्क त्वरित मिळवून देण्यासाठी…
