काळुराम पवार, सीमा सावळे यांच्यासह 23 जणांनी घेतले अर्ज
२०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघासाठी २३ नामनिर्देशन अर्जाची विक्री
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक २४/१०/२०२४ रोजी विहित वेळेत तिस-या दिवशी एकुण ९ व्यक्तींनी निगडी येथील २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातुन एकुण २३ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे.
आज नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी नोंदविलेल्या माहितीचा तपशील :- सावळे सिमा राजेंद्र ,काळूराम मारुती पवार ,अजय सुधाकर गायकवाड ,प्रतिक्षा अर्जुन कांबळे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), डॉ.मनिषा सुमंत गरुड(गायकवाड) (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) ,सुरेश हरिभाऊ भिसे ,सुलक्षणा राजू धर (राष्ट्रवादी कॉग्रेस,शरदचंद्रजी पवार), लक्ष्मण (दादा) आत्माराम शिरोळे (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गट), रीता प्रकाश सोनवणे, यांनी एकुण २३ नामनिर्देशन अर्ज नेल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी कळविले आहे. तसेच आज अखेर एकुण ६३ व्यक्तींनी एकुण १३० नामनिर्देशन पत्रे विकत घेतली असुन एका उमेदवाराने एक नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे .