पिंपरीत आंतरविभागीय हॉकी (मुले) स्पर्धां संपन्न
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती अंतर्गत रयत शिक्षण संस्थेचे, महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी, पुणे-१७ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरविभागीय मुले हॉकी स्पर्धांचे आयोजन १५ आणि १६ ऑक्टोबर २०२४ रोजी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, पिंपरी या ठिकाणी करण्यात आले. या स्पर्धांमध्ये चार विभागातील विविध संघाच्या माध्यमातून ७२ मुलांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा बुधवार दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी २:३० वा. वाजता मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, पिंपरी या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमासाठी एम. यु. वाणिज्य महाविद्यालय, पिंपरीचे शारिरीक शिक्षण संचालक प्रा. शाकुर सय्यद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, प्रो. ( डॉ.) सुरेश गोसावी हे खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर डॉ. दीपक माने, माजी क्रीडा संचालक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ; डॉ. विष्णू पेठकर, प्रभारी क्रीडा संचालक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ; डॉ. रमेश गायकवाड, सिनेट सदस्य श्री किशोर घडियार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा विभाग, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रोफेसर (डॉ.) पांडुरंग भोसले सरांनी प्रमुख पाहुणे यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत शारीरिक शिक्षण संचालक डॉ. पांडुरंग लोहोटे यांनी केले.
प्रो. डॉ. सुरेश गोसावी सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘सिलेक्शन आणि एलिमिनेशन या मर्यादेतच खेळ खेळला जात नाही, तर खेळामध्ये सहभाग नोंदवणे हे महत्त्वाचे आहे असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्याच बरोबर या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे प्रा. शाकुर सय्यद सरांनी खेळाडूंना खेळाबरोबरच अभ्यासही महत्त्वाचा आहे याचे महत्त्व पटवून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालक , डॉ. पांडुरंग लोहोटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर (डॉ.) पांडुरंग भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या परिश्रमाने या स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाल्या.