Author: maharashtrabreakingnews.com

-भोसरीमध्ये परिवर्तनाची नांदी ; हजारो समर्थकांच्या समवेत पदयात्रा -परिवर्तनाचे तुफान पाहून विरोधकांना धडकी भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे सोमवारी ( दि 28 ) दुपारी दीड वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या चरणी श्रीफळ वाढविले.  छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.  फुलांची उधळण, रांगोळीच्या पायघड्या, फटाक्यांची आतिषबाजी आणि हजारो कार्यकर्त्यांचे मोठे शक्ती प्रदर्शन असे परिवर्तनाचे तुफान पाहून विरोधकांना धडकी भरली. भोसरी मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी, शिवसेना (उबाठा) काँग्रेस आणि इतर घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.…

Read More

चिंचवड मधून नाना काटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत केलं जोरदार शक्ती प्रदर्शन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  चिंचवड विधानसभेतून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नाना काटे यांनी बंडखोरी करत जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिरात दर्शन घेऊन नाना काटे यांच्या रॅलीची सुरवात झाली. यावेळी त्यांच्या सोबत माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, विनोद नढे, संतोष कोकणे,  उषा माई काळे, हरिभाऊ तिकोणे, खंडुशेठ कोकणे, शिरीष साठे, शेखर चद्रंकात काटे, शाम जगताप,सचिन काळे, तानाजी जवळकर, नवनाथ नढे, चद्रकांत तापकीर, बापु कातळे, विष्णु शेळके, सागर कोकणे, संगिता कोकणे, प्रशांत सपकाळ, सुमित डोळस, काळुराम कवितके यांच्यासह…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इको-फ्रेंडली दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी सरस्वती प्रतिमेचे पूजन संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार व शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत. यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांनी विद्यार्थ्यांना इको-फ्रेंडली दिवाळीचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले की, फटाके फोडण्याने वायू प्रदूषण व ध्वनिप्रदूषण होते. याबद्दल जनजागृती करण्यात आली. दिवाळीचे आकर्षण असलेले किल्ले बनवण्यासाठी सध्या बाजारात असलेले ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ने बनवलेले किल्ले न घेता दगड मातीचे किल्ले बनविणे अधिक हितकारक आहे. तसेच मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये अनिता…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – बदलापूरच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. अनेक माय माऊली घाबरल्या होत्या. शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलींबाबत काळजीत होत्या. त्यावेळी भोसरी मतदारसंघांमधील एकमेव व्यक्तीसमोर आली. ज्यांनी शहरातील तमाम भगिनींना आश्वस्त केले. “एकतर माझ्या शहरात अशी घटना घडूच देणार नाही, आणि चुकून जर माझ्या भगिनींना कोणत्याही प्रकारचा त्रास झालाच”तर भर चौकात अशा नराधमांना ठेचून काढील”. असे सांगणारी व्यक्ती म्हणजे भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे होते. त्यांच्या एका वाक्याने आमच्या भगिनी निश्चित झाल्याचे चिखली टाळगाव मधील ग्रामस्थांनी सांगितले. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेना – आरपीआय (आठवले) मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी आज हजारो चिंचवडकरांच्या साक्षीने थेरगाव ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय याठिकाणी उमेदवारी अर्ज चिंचवड विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे सादर  केला. याप्रसंगी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, गुजरातचे गृहमंत्री प्रदीप सिंह जडेजा, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, माजी महापौर माई ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, सदाशिव खाडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना शहरप्रमुख निलेश तरस, आरपीआय…

Read More

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिपावलीचा पहिला सण वसुबारस निमित्त गोमाता पूजन कुदळवाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. प्रभागामधील अनेक महिलांनी गोमातेचे पूजन केले. कुदळवाडी परिसरातील महिलाना गोमातेची पुजा करता यावी या साठी स्वी सदस्य दिनेश यादव यांनी गोमाता कुदळवाडी श्री विठ्ठल मंदिर चौकात पुजनाची व्यवस्था करण्यात आली होती. परिसरातील अनेक महिलानी गोमातेची पुजा करून नैवेद्य दाखवून दर्शन घेतले यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते. कोरोना संकटात संपूर्ण देशभरात दिवाळी आनंदाने पण साधेपणाने साजरी केली जाणार आहे. सगळीकडे दिवाळीची तयारी सुरु आहे. गोवत्स द्वादशी म्हणजेच, वसुबारस. आश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केले जाते. …यासाठी केली जाते गाय-वासराची पुजा!…

Read More

– भोसरी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी साधला संवाद भोसरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गेल्या दहा वर्षातील भोसरी विधानसभेमधील विद्यमान आमदारांचा कारभार पाहिला तर ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवून दिले गेलेले टेंडर, फुगवलेले एस्टिमेट आणि त्यातून ढासळलेली कामाची गुणवत्ता हेच दिसून येईल. अगदी छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या कामात कामाची हीच ढासळलेली गुणवत्ता दिसून आली. महाविकास आघाडीने हा मुद्दा समोर आणला. मात्र या सर्व कारभारावर महाराष्ट्र भर पिंपरी चिंचवडचे नाव मलीन झाल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी येथील अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी केली. महाविकास आघाडीने भोसरी पिंपरी आणि चिंचवड या तीन विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाला जागा सुटल्याने उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक नाराज झाले आहेत. शिवसैनिकांनी बैठक घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम न करण्याचा ठराव केला आहे. शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यात शिवसेना संपवण्याचा डाव केला आहे. असा आरोप ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यासह शिवसैनिकांनी केला आहे. पिंपरी- चिंचवड मधील आकुर्डी येथील सेना भवन येथे ही बैठक पार पडली. महाविकास आघाडीत बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत. नुकतीच शरद पवार यांच्या पक्षाची दुसरी यादी जाहीर झाली. यादीत पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी सुलक्षणा शीलवंत- धर यांचं नाव जाहीर करण्यात आलं. पिंपरी विधानसभा मतदारसंघात शहराध्यक्ष सचिन भोसले…

Read More

थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. या अधिकाराचा वापर योग्य पद्धतीने करण्याची जबाबदारी ही प्रत्येक मतदाराची आहे. कोणत्याही अमिषाला बळी न पडता योग्य उमेदवारास मत देऊन आपल्या शहराच्या, राज्याच्या आणि देशाच्या विकासात हातभार लावावा आणि २० नोव्हेंबर रोजी प्रत्येकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य बजवावे, असे आवाहन चिंचवड विधानसभा मतदारसंघ स्वीप टीमचे नोडल अधिकारी राजीव घुले यांनी केले. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदान टक्केवारी कमी असलेल्या भागात निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप टीमच्या वतीने मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. आज या टीमद्वारे पवनानगर, रॉजस स्कुल तसेच काळेवाडी येथील भारतमाता चौक या परिसरात जनजागृती…

Read More

पिंपरीत घर घर संविधान उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत नसणारे अनेक बदल काँग्रेसने संविधानात केले होते; तसेच काँग्रेसनेच संविधान धोक्यात आणण्याचे काम केले!” असे परखड वक्तव्य राज्यसभेचे खासदार, उत्तर प्रदेशातील माजी पोलीस महासंचालक बृज लालजी यांनी केले. पिंपरी येथील मिलिंदनगर परिसरातील वाल्मीकी आश्रमात आयोजित ‘संविधानाचा सन्मान : ‘घर घर संविधान’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आणि अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष दिलीप कांबळे, धनराज बिर्दा, मनोज तोरडमल, माणिक पौळ, नाना कांबळे, गणेश कलवले, संजय धुतडमल, मुकुंद यदमल, बेहेनवाल, गोरक्ष लोखंडे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला…

Read More