न्यू सिटी प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इको-फ्रेंडली दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी सरस्वती प्रतिमेचे पूजन संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार व शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत. यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांनी विद्यार्थ्यांना इको-फ्रेंडली दिवाळीचे महत्त्व पटवून दिले.
ते म्हणाले की, फटाके फोडण्याने वायू प्रदूषण व ध्वनिप्रदूषण होते. याबद्दल जनजागृती करण्यात आली. दिवाळीचे आकर्षण असलेले किल्ले बनवण्यासाठी सध्या बाजारात असलेले ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ने बनवलेले किल्ले न घेता दगड मातीचे किल्ले बनविणे अधिक हितकारक आहे. तसेच मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये अनिता रोडे, निशा पवार, आणि गीतांजली दुबे यांनी भाषण केले इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गाण्यावरती नृत्य केले याप्रसंगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक यावेळी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटवस्तू देण्यात आली. पूजा देवगिरी यांनी सूत्रसंचालन केले व आभार तृप्ती शर्मा यांनी मानले.