Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»हजारो चिंचवडकरांच्या साक्षीने महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी भरला उमेदवारी अर्ज
ताज्या घडामोडी

हजारो चिंचवडकरांच्या साक्षीने महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी भरला उमेदवारी अर्ज

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com28 October 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेना – आरपीआय (आठवले) मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी आज हजारो चिंचवडकरांच्या साक्षीने थेरगाव ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय याठिकाणी उमेदवारी अर्ज चिंचवड विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे सादर  केला.

याप्रसंगी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, गुजरातचे गृहमंत्री प्रदीप सिंह जडेजा, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, माजी महापौर माई ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, सदाशिव खाडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना शहरप्रमुख निलेश तरस, आरपीआय शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, बाळासाहेब भागवत, माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे हे उपस्थित होते.

लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेऊन पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महायुतीचे कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत होता. सुवासिनींचे औक्षण, फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची पुष्पवृष्टी, ढोल ताशांच्या गजर आणि ‘अबकी बार, शंकरभाऊ आमदार’, ‘आले रे आले, कमळ आले’, ‘अमर रहे, अमर रहे, लक्ष्मणभाऊ अमर रहे’, अशा घोषणा देत भव्य दिव्य अशी पदयात्रा पिंपळे गुरव, पिंपळे सौदागरमार्गे रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे तापकीर चौक मार्गे ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयापर्यंत काढण्यात आली.

या पदयात्रेला सुमारे ५० हजारांहून अधिक कार्यकर्ते व नागरिक स्वयंस्फूर्तीने उपस्थित होते. विशेषतः महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून तसेच घरांच्या छतावरून नागरिकांनी शंकर जगताप यांच्यावर जोरदार पुष्पवृष्टी केली. नागरिकांचा हा उत्स्फूर्त उत्साह आणि पदयात्रेला उपस्थित कार्यकर्त्यांची गर्दी पाहून ही पदयात्रा म्हणजे शक्तिप्रदर्शन नसून ही महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या महाविजयी यात्रेची पूर्वतयारी असल्याची भावना, यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, अर्ज भरल्यानंतर शंकर जगताप यांनी पदयात्रेत सहभागी झालेल्या महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चिंचवड विधानसभेतील नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त केले. तसेच चिंचवड विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या २० तारखेला अशीच मनापासून साथ आणि  आशीर्वाद द्या, असे आवाहन जगताप यांनी यावेळी केले.

शत्रुघ्न काटे, संदीप कस्पटे, राजेंद्र जगताप व राम वाकडकर पदयात्रेत सामील

मागील काही दिवसांपासून ज्यांच्या नाराजीची चर्चा सुरू होती ते भाजपचे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, माजी नगरसेवक संदीप कस्पटे, भाजप उपाध्यक्ष राम वाकडकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी या पदयात्रेत सहभागी होत आम्ही शंकर जगताप यांच्यासोबत असून त्यांना मताधिक्याने आमदार करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन काम करणार असल्याचे स्पष्ट करत या नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

थेरगाव येथील शनी मंदिरात गोपूजन करत साधला ‘वसुबारस’ योग!

पदयात्रेदरम्यान थेरगाव येथील शनी मंदिरात असलेल्या गोमातेचे पूजन शंकर जगताप यांनी केले. त्यामुळे अर्ज भरण्याआधी आजचा वसुबारसचा योग साधला गेला. मंदिराचे संस्थापक अध्यक्ष संजय गायखे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी जगताप यांच्या विजयासाठी शनिमंदिरात महायज्ञ केला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवसूबारस निमित्त महिलांना गोमातेची पुजा करता यावी यासाठी दिनेश यादव यांचा आदर्श उपक्रम
Next Article शहरातील भगिनी सुरक्षेच्या मुद्द्यावर आमदार महेश लांडगे यांच्या शब्दामुळे ‘‘आश्वस्त’’!
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.