Author: maharashtrabreakingnews.com

विरोधकांचे गर्वहरण जनता करणार पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना आरपीआय (आठवले गट) महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी दिवाळी सणाचे औचित्य साधून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. विशेषतः जेष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले. कठीण काळात नेहमी आपली पाठराखण करणाऱ्या महेशदादा लांडगे यांच्या पाठीशी याही वेळी आपले आशीर्वाद असल्याचे ज्येष्ठांनी सांगितले. महिला भगिनींनी यावेळी ठिकठिकाणी औक्षण करून महेशदादांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.    सध्या विधानसभा निवडणूक आणि दिवाळी दोन्हीची धामधूम सुरू आहे. भोसरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांनी लक्ष्मीपूजन तसेच दिवाळी पाडव्याच्या दिवशी पंचक्रोशीतील विविध गावांचा धावता दौरा केला. त्या त्या गावातील ग्रामदैवतांचे दर्शन घेतले.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदारसंघ चिंचवड विधानसभा मतदारसंघ व भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या तीनही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासंदर्भात काँग्रेस पक्ष आपली संपूर्ण ताकद पणाला लावणार असल्याचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष डॉ कैलास भाऊ कदम यांनी व्यक्त केले. आकुर्डी येथे दिवाळी निमित्ताने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिवाळी फराळ उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना कैलास कदम म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला सत्तेवर आणण्यासाठी ठरवले आहे. पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेस पक्ष कोठेही कमी पडणार नाही व तीनही महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील. या कार्यक्रमास पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी गावठाणा मध्ये काढलेल्या प्रचार रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अवघे भोसरीकर एकवटले. “यंदा खेळ बदलणार आणि एकी हेच बळ “अशा घोषणांनी भोसरीकरांनी निवडणुकीच्या प्रचाराचे लक्ष वेधले. प्रचंड जनसमुदाय आणि एकवटलेले भोसरीकर यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अजित गव्हाणे यांनी चांगलाच रंग भरला आहे. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांना नुकतेच फुगे कुटुंबीयांकडून बळ मिळाले आहे. याचीच परिणीती गव्हाणे यांच्या प्रचारानिमित्त काढलेल्या रॅलीमध्ये दिसून आली. भोसरी गावठाणा मध्ये काढलेल्या रॅलीमध्ये माजी नगरसेविका भीमाबाई फुगे, सम्राट फुगे यांनी पुढाकार घेतला. रॅलीमध्ये अजित गव्हाणे यांना गावठाणातील…

Read More

महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांचा नागरिकांच्या गाठीभेटी आणि बैठकांचा धडाका – चक्रपाणी वसाहत, लांडगे वस्ती , सद्गुरुनगर भागातील मतदारांनी दिला विजयाचा विश्वास पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील चक्रपाणी वसाहत, लांडगे वस्ती , सद्गुरुनगर  या भागांमध्ये गाठीभेटी आणि बैठकांचा धडाका लावला आहे.  त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमदार लांडगे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत. घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधताना तसेच दि. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानादिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी घराबाहेर पडून महेश लांडगे यांना मतदान करावे, असे आवाहन करताना दिसत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांसाठी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करणार आहेत. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते महाविकास आघाडी म्हणून प्रत्येक उमेदवाराच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहणार असल्याचे काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे, चिंचवडचे राहुल कलाटे, पिंपरीच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत यांच्या प्रचारार्थ  शनिवारी (दि.2) पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी तर्फे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळी फराळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांसमोर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने…

Read More

नवयुगच्या ‘दिवाळी सांज’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “समाजाला एकसंध ठेवण्याचे काम साहित्य करते!” असे विचार खासदार श्रीरंग बारणे यांनी बीना इंग्लिश मीडियम स्कूल, पांढारकरनगर, आकुर्डी येथे बुधवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजी व्यक्त केले. नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित ‘दिवाळी सांज २०२४’ या उपक्रमात ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव लिखित ‘सादगी’ या गझलसंग्रहाचे आणि ‘पवनेचा प्रवाह’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना श्रीरंग बारणे बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच बीना एज्युकेशनल ट्रस्टचे सचिव अकमल खान, नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव, कार्याध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील, संचालक प्रा.…

Read More

कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी पहाटचे आयोजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिचली माझी बांगडी, राधा ही बावरी अशी गाणी रसिकांची दाद घेऊन गेली. तुझ्या विना वैकुंठाचा, आली माझ्या घरी ही दिवाळी, चल गं सखे चल गं सखे पंढरीला अशा एकाहून एक सरस गीतांनी दिवाळी पहाटचा पहिला दिवस गाजला. निमित्त होते पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान यांच्या वतीने नटसम्राट निळू फुले रंगमंदिरमध्ये दिवाळी पहाटचे. गणेशाचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. दर्दी रसिकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. पार्श्वगायिका ज्योती गोराणे, गायिका निकिता बहिरट, गायिका भक्ती कापरे यांनी गायलेल्या, तुझ्या विना वैकुंठाचा, आली माझ्या घरी ही…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – २६ व्या स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवा अंतर्गत ४ नोव्हेंबर २०२४, सोमवार रोजी सायं. ५.०० ते ७.०० दरम्यान ‘ मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा – पुढे काय? ‘ या विषयावर परिसंवाद नामवंत साहित्यिकांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड तारांगण सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे.  परिसंवादात सहभागी होण्यासाठी मा. डॉ. सदानंद मोरे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ), लक्ष्मीकांत देशमुख (अध्यक्ष, ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन), मा. रामदास फुटाणे (ज्येष्ठ कवी, चित्रपट निर्माते), मा. संजय सोनवणी (भाषातज्ञ व इतिहास संशोधक) आदी ख्यातनाम साहित्यिक व कलाप्रेमी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे समन्वयक मा. राजन लाखे (ज्येष्ठ कवी, लेखक) असणार आहेत. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे. तरी, पिंपरी – चिंचवड, पुणे व…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी काळेवाडी प्रभागात प्रचारामध्ये  जोरदार आघाडी घेतली आहे. मतदारसंघातील महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी मैदानात उडी घेतली असून घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधताना आणि पत्रक वाटप करताना दिसत आहेत. महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी मतदारसंघातील सर्व प्रभागांमध्ये गाठीभेटी आणि बैठकांचा धडाका लावला आहे. संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघात त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर काळेवाडीतील महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिवसरात्र जगताप यांच्या प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे. घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधताना तसेच २० नोव्हेंबर…

Read More

समाजाभिमुख सुशिक्षित नेतृत्व हवे आहे – डॉ. सुलक्षणा शिलवंत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – पिंपरी चिंचवड शहरातील बौद्ध, मागास दुर्बल घटकाला समाजाभिमुख सुशिक्षित तसेच दृष्टे नेतृत्व हवे आहे असे मत बौद्ध समाज विकास महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस यांनी व्यक्त केले. बौद्ध समाज विकास महासंघाच्या वतीने आज पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत यांना पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी भाऊसाहेब डोळस म्हणाले की, बौद्ध दलित व मागासवर्गीय समाजाला अपेक्षित असलेले सहकार्य व विकास आजतागायत होऊ शकला नाही यासाठी या समाजाच्या प्रश्नांची जाण असलेल्या सुशिक्षित व दृष्टे नेतृत्वाची गरज आहे. पिंपरी चिंचवड…

Read More