महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करणार काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा निर्धार
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदारसंघ चिंचवड विधानसभा मतदारसंघ व भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या तीनही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासंदर्भात काँग्रेस पक्ष आपली संपूर्ण ताकद पणाला लावणार असल्याचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष डॉ कैलास भाऊ कदम यांनी व्यक्त केले.
आकुर्डी येथे दिवाळी निमित्ताने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिवाळी फराळ उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना कैलास कदम म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला सत्तेवर आणण्यासाठी ठरवले आहे. पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेस पक्ष कोठेही कमी पडणार नाही व तीनही महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील. या कार्यक्रमास पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे व भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे हे तीनही उमेदवार उपस्थित होते.
यावेळी कामगार नेते विष्णुपंत नेवाळे, काँग्रेस सेवा दलाचे संग्राम तावडे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष शामला सोनवणे, बिंदू तिवारी, वरिष्ठ उपाध्यक्ष मयूर जयस्वाल, शहर उपाध्यक्ष मकरध्वज यादव, काँग्रेस पक्षाचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष विश्वनाथ जगताप, ॲड. अनिरुद्ध कांबळे, बाबा बनसोडे, गौरव चौधरी, अमर नाणेकर आदी प्रमुख उपस्थित होते.