चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

२६ व्या ‘ स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव ‘ अंतर्गत तारांगण सभागृह सायन्स पार्क येथे परिसंवाद

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – २६ व्या स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवा अंतर्गत ४ नोव्हेंबर २०२४, सोमवार रोजी सायं. ५.०० ते ७.०० दरम्यान ‘ मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा – पुढे काय? ‘ या विषयावर परिसंवाद नामवंत साहित्यिकांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड तारांगण सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे. 

परिसंवादात सहभागी होण्यासाठी मा. डॉ. सदानंद मोरे (अध्यक्षमहाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ), लक्ष्मीकांत देशमुख (अध्यक्ष, ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन), मा. रामदास फुटाणे (ज्येष्ठ कवीचित्रपट निर्माते), मा. संजय सोनवणी (भाषातज्ञ व इतिहास संशोधक) आदी ख्यातनाम साहित्यिक व कलाप्रेमी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे समन्वयक मा. राजन लाखे (ज्येष्ठ कवीलेखक) असणार आहेत.
हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे.
तरीपिंपरी – चिंचवडपुणे व लगतच्या रसिक-श्रोत्यांनी या अनोख्या सांस्कृतिक दीपोत्सवाचा सहकुटुंब लाभ घ्यावा असे आवाहन पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन तर्फे  प्रवीण तुपे (मुख्य संयोजक) व  राजीव तांबे (सहसंयोजक) यांच्याद्वारे करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button