चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

‘हम सब शंकरभाऊ’ हा नारा देत कार्यकर्ते लागले जोमात कामाला

Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी काळेवाडी प्रभागात प्रचारामध्ये  जोरदार आघाडी घेतली आहे. मतदारसंघातील महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी मैदानात उडी घेतली असून घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधताना आणि पत्रक वाटप करताना दिसत आहेत.

महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी मतदारसंघातील सर्व प्रभागांमध्ये गाठीभेटी आणि बैठकांचा धडाका लावला आहे. संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघात त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर काळेवाडीतील महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिवसरात्र जगताप यांच्या प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे. घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधताना तसेच २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानादिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी घराबाहेर पडून शंकर जगताप यांनाच मतदान करावे असे आवाहन करताना दिसत आहेत.

यावेळी माजी नगरसेविका ज्योती भारती, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, माजी नगरसेविका ललिता पाटील, माजी नगरसेविका नीता पाडाळे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य काळूराम नढे, माजी स्वीकृत सदस्य विनोद तापकीर, माजी स्वीकृत सदस्य देविदास पाटील, शिवसेनेचे सुनील पालकर, शिवसेनेचे  दिलीप कुसाळकर, हनुमंत सुतार, गोरक्षक मंगेश नढे, प्रमोद येवले,  सामाजिक कार्यकर्ते रमेश काळे, सोमनाथ तापकीर, हर्षद नढे, धर्मा पवार, प्रकाश लोहार, अमोल भोसले, राहुल झाडखंडे, प्रशांत डाकवे, विशाल वाळके, प्रकाश तंबोरे, अंकुश नढे, प्रशांत नढे, समर्थ राऊत, सीताराम जगताप, बाबा जगताप, कैलास सानप, संदीप जाधव, दीपक पंचबुद्धे, आशिष कांबळे, अश्विनी कांबळे, किरण पन्हाळे, गौरव कदम, सुधीर सोनवणे, सागर वाघमारे, सागर सोनवलकर, सज्जत तांबोळी, सचिन काळे, कय्युम शेख, पंकज मिश्रा यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकर्ते म्हणतात; “हम सब शंकरभाऊ”

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणूक प्रचाराला सुरवात झाली आहे. मात्र आम्ही मागील वर्षभरापासून विकासकामांच्या माध्यमातून काळेवाडी प्रभागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत सातत्याने पोहचण्याचा प्रयत्न करत आहोत. आताही जवळपास आमचा किमान दोन वेळा प्रचार प्रभागात पूर्ण होत आला आहे. नागरिकांचाही आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच  प्रभागातील चारही नगरसेवक महायुतीचे असल्याने यावेळी शंकरभाऊंना नक्कीच विक्रमी मताधिक्य काळेवाडीतून मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. त्याचबरोबर प्रभागातील महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी हा स्वतःला उमेदवार समजूनच काम करत असल्याची भावना यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button