Author: maharashtrabreakingnews.com

आ. गोरखे यांच्या कामगिरीची योग्य दखल घेतली जावी – महाराष्ट्र सकल मातंग समाजाची मागणी पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  शनिवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालामध्ये महायुतीला यामध्ये घवघवीत यश मिळाले. महायुतीमध्ये भाजप हा मोठा पक्ष आहे. भाजपला मिळालेल्या या यशामध्ये केंद्रीय व राज्य पातळीवरील अनेक प्रमुख नेत्यांचे व स्टार प्रचारकांचे योगदान आहे. यामधे राज्य पातळीवरील एक तरुण आश्वासक चेहरा म्हणून आमदार अमित गोरखे यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली होती ती जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे दिसते. विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी राज्यभर सभा बैठका घेऊन अनुसूचित जाती, आणि दलित, वंचित समाजाची निर्णायक मतं भाजपा व महायुतीकडे…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  “अस्वस्थ माणसांना स्वस्थ करण्याचे काम गझल करीत असते. अर्थातच त्यासाठी परकायाप्रवेश करून गझलकार मानवी भावभावनांना शब्दरूप देत असतो!” असे विचार ज्येष्ठ गझलकार डॉ. शिवाजी काळे यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह, पिंपरी येथे रविवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ रोजी व्यक्त केले. गझलपुष्प कला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक संस्थेच्या सहाव्या वर्धापनदिन सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. शिवाजी काळे बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते सचिन भेगडे, उद्योजक संजॉय चौधरी, ज्येष्ठ गझलकार प्रमोद खराडे, गझलपुष्पचे अध्यक्ष संदीप जाधव, उपाध्यक्ष प्रशांत पोरे, संस्थापक व सचिव  दिनेश भोसले, कोषाध्यक्ष अभिजित काळे आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ज्येष्ठ गझलकार…

Read More

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाच्या ‘मेराकी-२४’ ला प्रारंभ पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  भविष्यकाळ हा डिजाईन क्षेत्रासाठी सुवर्णकाळ असणार आहे. डिजाइनर शिवाय सध्या कुठल्याही गोष्टीचे स्वरूप किंवा तिच्या अस्तित्वाची कल्पना करणे अशक्य आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीतील गोष्टींना मूर्त स्वरूप देऊन स्पप्नांना सत्यात उतरविण्यासाठी सर्वोत्तम देत परिश्रम घ्यायला हवेत. आवडीच्या क्षेत्रात प्लॅन ‘बी’चाही विचार आपल्या मनाला शिवू न देता कष्ट केल्यास, यशाची प्राप्ती नक्कीच होते, असा विश्वास अल्ट्रावायलेट ऑटोमोटिव्ह कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला. ते एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिजाईन (आयओडी) तर्फे कोरेगाव पार्क येथील ‘कोपा’ माॅलमध्ये आयोजित ‘मेराकी-२४’ च्या उद्घाटन समारंभाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी, एमआयटी एडीटी…

Read More

उद्योगपती अरविंद जैन यांच्या हस्ते लोकार्पण; `आया महोत्सव` हे थीम गीत सादर पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  निगडी येथील श्री 1008 भगवान महावीर अहिंसा ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या `पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवा’ च्या श्रीमुख पत्रिकेचे लोकार्पण उद्योगपती अरविंद जैन यांच्या हस्ते रविवारी (२४ नोव्हेंबर) निगडी-प्राधिकरण येथे करण्यात आले. पंचकल्याणक महोत्सवाचे आयोजन येत्या ११ डिसेंबर ते १५  डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. याच निमित्ताने पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाचे `आया महोत्सव` हे थीम गीत सादर करण्यात आले. `आया महोत्सव` या थीम गीताची रचना प्रसिद्ध कवी, संगीतकार आणि गायक हर्षित अभिराज यांनी केली आहे. या पत्रिका लोकार्पण कार्यक्रमात हर्षित यांनी या गीताचे सादरीकरण देखील केले. यानिमित्ताने उद्योगपती अरविंद…

Read More

उद्योजकतेला नवकल्पनांची जोड असावी प्रा.डाॅ.सुनिता कराड; पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  सध्याच्या शिक्षण पद्धतीत आपण मागणीपेक्षा पुरवठा जास्त करत आहोत. त्यामुळेच बाजारात बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसते. परंतू आता नवीन शिक्षणपद्धती स्विकारून संशोधन, नवकल्पनांची जोड असणाऱ्या उद्योजकतेचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव तर मिळेलच सोबतच त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळून बेरोजगारीचा प्रश्नही सुटेल व देशाच्या प्रगतीला हातभार लागेल, असे मत एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनिता कराड यांनी व्यक्त केले. त्या एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे तर्फे विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ४८ हून अधिक नामवंत कंपन्यासोबत सामंजस्य करार (एमओयू) कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. यावेळी कंपन्यांच्या प्रतिनिधींसह …

Read More

सर्व मतदारांचे समन्वय समितीच्या वतीने आभार पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  महायुती सरकारचे लोकाभिमुख निर्णय, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर मतदारांनी दाखवलेल्या विश्वास यामुळे राज्यात माहितीचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले आहेत. तसेच प्रचारात सर्व घटक पक्षांचा योग्य समन्वय यामुळे पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदार संघात विजय सोपा झाला असे प्रतिपादन समन्वयक व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष योगेश बहल यांनी केले.     महायुती सरकारने मागील अडीच वर्षात घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयावर महाराष्ट्रातील नागरिकांनी विश्वास दाखवून महायुती सरकारला भरभरून मतदान केले. याचे सर्व श्रेय महायुती सरकारने नेमलेल्या समन्वय…

Read More

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२९ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यातील कार्तिकी एकादशी उद्या मंगळवारी ( दि.२६ ) लाखो वैष्णव भाविकांच्या साक्षीने हरिनाम गजरात साजरी होत आहे. बुधवारी ( दि.२७ ) श्री’चा रथोत्सव होत आहे. दरम्यान सोमवारी ( दि. २५ ) श्री पांडुरंगरायांचे पालखी सोहळ्यातील दिंडीची नगरप्रदक्षिणा व इंद्रायणी नदीत श्रीं पांडुरंगरायांचे पादुकांचे वैभवी स्नान हरिनाम गजरात झाले. राज्यातून आलेल्या शेकडो दिंड्यानी मंदिर आणि नगरप्रदक्षिणा टाळ ,विना ,मृदुंगाचा त्रिनाद करीत सोमवारी ( दि. २५ ) हरिनामाचे गजरात केली. यावेळी भाविकांच्या गर्दीने तीर्थक्षेत्र अलंकापुरी स्नानास इंद्रायणी नदी काठ फुलला. आळंदी कार्तिकी यात्रेस आलेल्या भाविक, वारक-यांचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विधानसभा सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार महेश लांडगे यांना निवडणूक निरीक्षक श्री. वीणा हूडा यांच्या उपस्थितीत भोसरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांच्या हस्ते निवडणूक प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. भोसरी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ११ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीची मतमोजणी बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे मतमोजणी कक्षात सुरळीत पार पडली. या निवडणुकीमध्ये महेश (दादा) लांडगे विजयी झाले. त्याबद्दल त्यांना बालेवाडी स्टेडियम येथील मतमोजणी कक्षात निवडणूक प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सतिश थेटे, रविद्र रांजणे, मतमोजणी आराखडा व स्ट्रॉंग रूम व्यवस्थापन समन्वय अधिकारी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदारांना मंत्री पदाचे वेध लागले आहेत. आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप आणि आमदार अण्णा बनसोडे हे मंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. तिन्ही विधानसभा मतदारसंघातून कुठला आमदार मंत्रीपद खेचून आणतो यावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. आमदार अण्णा बनसोडे यांनी अजित पवारांकडे मंत्रिपदाची मागणी केलेली आहे. चिंचवड मधून शंकर जगताप हे मंत्रीपदासाठी अनुकूल आहेत. आमदार महेश लांडगे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत असून गेल्या वेळेस त्यांचं मंत्री पद थोडक्यात हुकल होतं. यामुळे पिंपरी- चिंचवड शहरात कुणाला मंत्रीपद मिळते हे पाहावं लागणार आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधासभेत महायुतीचे उमेदवार विजयी झाले…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभा, भोसरी विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघामधील तब्बल ४१ उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार त्या जागेवर झालेल्या एकूण मतदानापैकी १/६ अर्थात १६.६ टक्के मते घेण्यात अपयशी ठरला, तर त्याने अर्ज करताना जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाते. अनुसूचित जातीसाठी राखीव पिंपरी मतदारसंघात एकूण १५ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १३ उमेदवारांना आपले डिपॉजिट वाचविता आले नाही. पिंपरी मतदारसंघातील मतदारांनी अन्य उमेदवारांपेक्षा नोटाला अधिक प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघात ४०१३ मतदारांनी नोटाला मत दिले आहे. नोटाला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. केवळ…

Read More