ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन मतदारसंघातील ४१ उमेदवारांचे डिपॉजिट जप्त

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभा, भोसरी विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघामधील तब्बल ४१ उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार त्या जागेवर झालेल्या एकूण मतदानापैकी १/६ अर्थात १६.६ टक्के मते घेण्यात अपयशी ठरला, तर त्याने अर्ज करताना जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाते.

अनुसूचित जातीसाठी राखीव पिंपरी मतदारसंघात एकूण १५ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १३ उमेदवारांना आपले डिपॉजिट वाचविता आले नाही. पिंपरी मतदारसंघातील मतदारांनी अन्य उमेदवारांपेक्षा नोटाला अधिक प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघात ४०१३ मतदारांनी नोटाला मत दिले आहे. नोटाला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. केवळ तीन उमेदवारांना नोटा पेक्षा अधिक मते मिळवता आली आहेत.
चिंचवड मतदारसंघात एकूण २१ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १९ उमेदवारांना आपले डिपॉजिट वाचविता आले नाही. या मतदारसंघातील ४३१६ मतदारांनी अन्य उमेदवारांपेक्षा नोटाला अधिक प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघात देखील नोटाला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. केवळ तीन उमेदवारांना नोटा पेक्षा अधिक मते मिळवता आली आहेत.
भोसरी मतदारसंघात एकूण ११ उमेदवार रिंगणात होते. विजयी उमेदवार आणि मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवार वगळता इतर ९ उमेदवाराचे डिपॉजिट जप्त झाले आहे. अन्य दोन मतदारसंघाच्या तुलनेत भोसरी मतदारसंघात नोटाचा पर्याय खूप कमी मतदारांनी निवडला आहे. २६८५ मतदारांनी नोटाला मत दिले आहे. येथे नोटाला पाचव्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. केवळ चार उमेदवारांना नोटा पेक्षा अधिक मते मिळवता आली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button