Author: maharashtrabreakingnews.com

आता ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे होणार रस्त्यांची देखभाल पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरातील रस्त्यांची देखभाल आणि व्यवस्थापन प्रक्रिया सुधारण्यासाठी भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आधारित रस्ता मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली (RAMS) विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून केंद्रिकृत डेटाची अनुपस्थिती, संसाधनांचे अकार्यक्षम वाटप आणि रस्तादुरुस्तीबाबतचे निर्णय यासारख्या अनेक वर्षांपासून शहरी रस्ते व्यवस्थापनामध्ये भेडसावणाऱ्या गंभीर आव्हानांना प्रणालीद्वारे मार्ग काढण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांच्या मालमत्तेबाबतची एकत्रित माहिती नसणे ही महत्त्वपूर्ण समस्या आहे. माहितीच्या अभावामुळे नियोजनामध्ये कमतरता निर्माण होताता. रस्त्याबाबत माहिती मिळविण्यासाठी कोणतीही रस्ता ओळख प्रणाली नसल्याने पायाभूत सुविधांचा मागोवा घेणे व त्यांचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक बनले आहे. रस्त्यांची देखभाल…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी चिंचवड शहराचे बदलते हवामान, प्रदूषण व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना व त्यांचे परिणाम, आपत्ती व्यवस्थापन करताना राबविल्या जाणाऱ्या उपाययोजना याबाबत माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि भारतीय हवामान विज्ञान विभाग (IMD) यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. हवामान बदलातील विविध आव्हाने सक्षमपणे हाताळण्यासाठी हा करार महत्वपूर्ण ठरणार आहे. निगडी येथील दुर्गादेवी टेकडी येथे हवामान बदलाचे संकेत देणारा अत्याधुनिक एक्स-बॅंड डॉप्लर वेदर रडार मनोरा उभारण्यात येणार आहे. याठिकाणी निश्चित केलेल्या जागेची पाहणी महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पुणे येथील भारतीय हवामान विज्ञान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी केली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नेहरूनगर न्यायालयामधील सोसायटीचे शाखेकरीता ज्यादा सेवकांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी पिं.चिं. ॲड. बार असोसिएशनतर्फे मा. अध्यक्ष अॅड. किरण एस.पवार व अन्य वकील बांधव यांनी माजी अध्यक्ष व दि पुणे लॉयर्स कन्झ्यु. को.ऑप सो. चे. तज्ञ संचालक ॲड. राजेश पुणेकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेहरूनगर पिंपरी न्यायालयामधील वकील वेगवेगळ्या अडचणींचा सामना करत असल्याचे देखील सांगितले. नेहरूनगर पिंपरी न्यायालयामधील वकील हे दि पुणे लॉयर्स कन्झ्यु. को.ऑप सो. सभासद असुन नेहरूनगर पिंपरी न्यायालयामधे सोसायटीची शाखा आहे. सदर शाखेमध्ये पुरेसे कर्मचारी नसल्याचे वकील बांधवांनी सांगितले. सदर सोसायटीची शाखा वकील बांधवांचे…

Read More

मधुकर पवळे क्रीडांगण हे क्रीडा विभागाच्या ताब्यात घेण्यात यावे निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – प्रभाग क्रमांक 13 निगडी यमुना नगर परिसरामध्ये कैलासवासी मधुकर पवळे क्रीडांगण आहे.कै मधुकर पवळे क्रीडांगण हे क्रीडा विभागाच्या ताब्यात घेण्यात यावे, अशी मागणी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी आयुक्ताकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्पर्धा परीक्षा केंद्र आहे या केंद्रामध्ये सुमारे 400 ते 500 विद्यार्थी अभ्यासासाठी रोज ये जा करत असतात व त्याच प्रमाणे क्रीडांगणावर सकाळ संध्याकाळ प्रभागातील नागरिकांचा व व खेळाडूंचा मोठा वावर असतो. आम्ही वेळोवेळी गेले अनेक वर्षापासून कैलासवासी मधुकर पवळे क्रीडांगण हे क्रीडा विभागाला वर्ग करावा असं वारंवार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिव्यांग व्यक्ती आणि बालकांचे जीवनमान उंचावण्यासाठी उन्नति सोशल फाउंडेशनने भरीव योगदान दिले आहे. उन्नतीने दिलेला मदतीचा हात दिव्यांगांच्या प्रगतीसाठी वरदान ठरला, अशी भावना दिव्यांग व्यक्तींनी व्यक्त केली असली तरी दिव्यांग घटकाप्रती सामाजिक बांधलकी जपण्याची आम्हाला संधी मिळाली, यात आम्ही कृतार्थ झालो, अशा शब्दांत उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा  कुंदा संजय भिसे यांनी समाधान व्यक्त केले. दिव्यांगांच्या प्रगतीसाठी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या टीमने वेळोवेळी पुढाकार घेऊन विशेष उपक्रम राबविले आहेत. सप्तर्षी फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग बालकांना मोफत औषधोपचार दिले. आजपर्यंत शेकडो दिव्यांग मुलांना व बालकांना मोफत औषध उपचार केले आहेत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांची आरोग्य तपासणी केली.…

Read More

– आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेची सकारात्मक अंमलबजावणी – बदलापूर येथील अत्याचार घटनेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या सर्व शाळांमध्ये आता माजी सैनिकांना सुरक्षेसाठी ‘तैनात’ करण्यात येणार आहे. महापालिका स्थायी समितीमध्ये संबंधित प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये करार तत्वावर कार्यरत असलेल्या 370 सुरक्षारक्षकांना कामातून कमी करून त्या ठिकाणी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) चे सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ठेवला होता. त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या रोजगारावर कुऱ्हाड आली होती. दरम्यान, भाजपा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र विधिमंडळ पक्षनेते पदी  देवेंद्र फडणवीस साहेब यांची घोषणा करण्यात आली आहे आणि आता हे स्पष्ठ झाले आहे कि उद्या गुरुवार दि 05/12/2024 रोजी मुंबई याठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि जनतेच्या मनातील महायुतीचे सरकार स्थापित होणार आहे . विधिमंडळ पक्षनेते पदी निवड तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस  यांचा शपथ विधी बाबत पिंपरी चिंचवड भाजप शहर कार्यकारणी तसेच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून ते साजरा करण्यासाठीचिंचवड येथील चाफेकर चौक याठिकाणी सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्तानी एकत्र येत जल्लोष साजरा केला. पिंपरी चिंचवड शहराच्या भरभराटी मध्ये…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) भाजपतर्फे आज, बुधवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटून जल्लोष साजरा केला. चाफेकर चौक – चिंचवड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी आणि भोसरी या तिन्ही विधानसभा परिसरात दुपारी 12.00 वाजता शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी, भाजपा कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस नामदेव ढाके, संजय मंगोडेकर, अजय पाताडे, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वुई टुगेदर फाउंडेशन, पिंपरी चिंचवड या सेवाभावी संस्थेच्या वतीने सोनावणे वस्ती, चिखली येथील विकास अनाथ आश्रम येथील ५५ मुलामुलींना (orphan children)अनेक वर्षापासून कायम निस्वार्थी मदतीचा हात असतो.यावेळी आणखी एक वेगळा उपक्रम म्हणून येथिल मुला मुलींना लागणारी आवश्यक अंतर्वस्त्रे आणि संगणक प्रदान करण्याचा कार्यक्रम (दि. १ डिसेंबर) आयोजित करण्यात आला . काळेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. रविंद्र इंगळे , अनिल पोरे, सीता केंद्रे व जयंत देशमुख, अतुल शेठ यांनी या उपक्रमासाठी मोठा हातभार लावला.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. कैलास जोरूले, अस्थिरोग तज्ज्ञ, बिर्ला हॉस्पीटल, डॉ. अमृता सहस्रबुधे – जोरूले उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र…

Read More

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथे मुंबई-पुणे महामार्ग ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या दिशेने जाणा-या मार्गादरम्यान असलेल्या रेल्वे मार्गावर नव्याने पूल उभारण्याबाबतच्या विषयासह  विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या विशेष बैठकीत मान्यता दिली.   पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय प्रशासक  सिंह यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. या विषयांना प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम यांच्यासह विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. चिंचवड येथील रेल्वे मार्गावर…

Read More