मधुकर पवळे क्रीडांगण बनले गुंड व नशा करणाऱ्या लोकांचा अड्डा प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष – सचिन चिखले


मधुकर पवळे क्रीडांगण हे क्रीडा विभागाच्या ताब्यात घेण्यात यावे



निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – प्रभाग क्रमांक 13 निगडी यमुना नगर परिसरामध्ये कैलासवासी मधुकर पवळे क्रीडांगण आहे.कै मधुकर पवळे क्रीडांगण हे क्रीडा विभागाच्या ताब्यात घेण्यात यावे, अशी मागणी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी आयुक्ताकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्पर्धा परीक्षा केंद्र आहे या केंद्रामध्ये सुमारे 400 ते 500 विद्यार्थी अभ्यासासाठी रोज ये जा करत असतात व त्याच प्रमाणे क्रीडांगणावर सकाळ संध्याकाळ प्रभागातील नागरिकांचा व व खेळाडूंचा मोठा वावर असतो.
आम्ही वेळोवेळी गेले अनेक वर्षापासून कैलासवासी मधुकर पवळे क्रीडांगण हे क्रीडा विभागाला वर्ग करावा असं वारंवार सांगत आलो आहोत . व त्याचप्रमाणे अनेक वेळा पत्र व्यवहार देखील केलेला आहे हे क्रीडांगण सध्या कुणाच्याही ताब्यात नसल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात भटकी जनावर व त्याचप्रमाणे गुंड, नशा करणारी माणसे मुले यांचा अड्डा झालेला आहे. हे वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून सुद्धा यावर कारवाई होत नाही यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकाची व खेळाडू वर्ग मोठ्या प्रमाणात नाराजी आहे
या क्रीडांगणाला कोणताही टाईम टेबल नसल्यामुळे रात्रभर या ठिकाणी गावगुंड व कपल्स येऊन रोमान्स करत असतात अनेक वेळा येताना जाताना ज्येष्ठ नागरिकांना समोर लज्जास्पद कृत्य चालू असते व त्याचप्रमाणे मागील काही दिवसांपूर्वी याच क्रीडांगणामध्ये किरकोळ भांडणे, खून करण्याचा प्रयत्न असे प्रकार सातत्याने होत आहेत हे सर्व वेळोवेळी आम्ही प्रशासनाला व पोलिसांना सांगितले आहे तरीदेखील याकडे प्रशासन दुर्लक्ष करतं ही मनाला लागणारी गोष्ट आहे या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध व्यक्त करतो.
पुढील आणखी एखादी घडून शहराचे नाव खराब होणार नाही याकरिता आपण लवकरात लवकर हे क्रीडांगण क्रीडा विभागाच्या ताब्यात देऊन या ठिकाणी एक व्यवस्थित टाइम टेबल आखावा व सुरक्षारक्षक देऊन नागरिकांची व्यवस्थित आणि चांगली सोय करून देण्यात यावी व सीमा भिंत याचीसुद्धा दुरुस्ती करून देण्यात यावी. यावर लगेच ॲक्शन घ्यायला अशी अपेक्षा व्यक्त करतो.
अन्यथा पुढील दोन ते तीन दिवसांमध्येच क्रीडा विभागामध्ये येऊन मनसे द्वारे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.








