- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पुणे मेट्रोच्या टप्पा-१ उत्तरेकडील विस्ताराचे काम वेगात सुरु पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) संचालित पुणे मेट्रो प्रकल्पाच्या टप्पा-१ चे काम सप्टेंबर २०२४ रोजी पूर्ण होऊन टप्पा-१ वरील प्रवासी सेवेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांच्या सोयीकरिता टप्पा-१ चे उत्तर (पीसीएमसी) व दक्षिण (स्वारगेट) टोकाला विस्तारीकरणाचे काम महामेट्रोने हाती घेतले आहे. त्यातील उत्तर विस्तारीकरण म्हणजे पीसीएससी ते भक्तीशक्ती ह्या एकूण ४.५१९ किमी अंतराच्या प्रस्तावित उन्नत मार्गिकेचे काम जलद गतीने सुरु आहे. पिंपरी – चिंचवड महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस यांच्याकडून उत्तम सहकार्य मिळत असून आवश्यक त्या परवानगी मिळाल्या आहेत. औद्योगिक क्षेत्र, डिफेन्स, शासकीय कार्यालय…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी मोरवाडी येथे ५ न्यायालय फर्निचर सहित तयार असून या ठिकाणी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय व जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन व्हावे यासाठी पिंपरी चिंचवड मधील वकिलांनी वारंवार मागणी केली होती. सदर न्यायालयांच्या प्रस्तावास मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिली असून सदरचा प्रस्ताव निधी अभावी शासन स्तरावर प्रलंबित आहे. परंतु सदरच्या प्रक्रियेला वेळ लागणार असल्यामुळे तोपर्यंत इतर दोन न्यायालये पिंपरी मोरवाडी येथे सुरू करण्यासाठी आज रोजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. के. महाजन साहेब* तसेच पिंपरी न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश श्री. एम. जी. मोरे यांनी आज रोजी मोरवाडी येथील जुन्या न्यायालयाची पाहणी केली. यावेळी आकुर्डी येथील…
पीएमआरडीएच्या आयुक्तांनी घेतली भूमिका; कंत्राटदारावर रस्ता दुरुस्तीची जबाबदारी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विकसित केलेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा उत्कृष्ट असावा, यावर भर देण्यात येत आहे. यात रस्त्याच्या कामासंदर्भात संबंधित ठेकेदारांवर दोष दायित्वाचा कालावधी निश्चित आहे. आगामी काळात निर्धारित कालावधीत जर रस्ता खराब झाल्यास तो दुरुस्त करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर असते. याबाबत पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित निर्णयाची अंमलबजावणीचे सक्त निर्देश दिले आहे. पीएमआरडीएचे कार्यक्षेत्र व्यापक असल्यामुळे सातत्याने विविध विकास कामे सुरू असतात. संबंधित कामे उत्कृष्ट आणि दर्जेदार व्हावी, या उद्देशाने महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित विभागांना निर्देश…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत आकारणी न झालेल्या मालमत्तांचे नोंदणी व करआकारणी कार्यवाही करण्यासाठी मे. स्थापत्य कन्सल्टंट प्रा.लि या खासगी कंपनीची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फत शहरातील मालमत्तांचे सर्वंकष सर्वेक्षण सुरू आहे. मालमत्ता सर्वेक्षणात आकारणी न झालेल्या सद्यस्थितीत २,५१,१६५ इतक्या नविन मालमत्ता आढळून आल्या आहेत. त्यापैकी २,०३,८९४ मालमत्तेची मोजणी पुर्ण झाली असून त्यावर कर आकारणी कार्यवाही सुरु आहे. सर्वेक्षणात आढळून आलेल्या मालमत्तापैकी १,१३,८३१ या मालमत्तांचे मालमत्ताधारकांना मालमत्ताकर आकारणीसाठी कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी नोटीस, एसएमएस यामाध्यमातून कळविण्यात आले आहे व येत आहे. सदरची कागदपत्रे मालमत्तेस अद्यावत व बिनचूक नाव लावण्यासाठी व विशेष…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्यांना दुचाकीवर असताना हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे. हेल्मेट असल्याशिवाय अधिकारी-कर्मचार्यांसह इतर नागरिकांना महापालिकेत प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे महापालिका भवनाच्या बाहेरील बाजूस दुचाकी लावण्यासाठी गर्दी होत आहे. राज्यात दुचाकी अपघातामध्ये होणार्या मृत्यूंची संख्या लक्षणीय आहे. हेल्मेटचा वापर केल्यास मृत्यू संख्येमध्ये निश्चित घट होऊ शकते, असे निदर्शनास आणून देण्यात आले. याची दखल घेऊन वाहनचालकाने स्वतः आणि सोबत बसलेल्या व्यक्तीने रस्ता सुरक्षा मानकांची पूर्तता करणार्या हेल्मेटचा वापर करावा. त्यासाठी प्रशासनाने दुचाकी वाहनचालकांसाठी हेल्मेट वापराची सक्ती करावी. वाहतूक नियमांबाबत जनजागृती करावी, अशा सक्त सूचना रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीत असलेल्या चऱ्होली येथील काळे कॉलनीमध्ये विद्युत खांब उभारण्यात यावा अशी मागणी सचिन काळे युवा मंचच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आळंदी नगरपरिषदेच्या विद्युत विभागाचे अभियंते विष्णूकुमार शिवशरण यांच्याकडे लेखी निवेदन देऊन विद्युत खांब उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, काळे कॉलनी येथे गेल्या १० वर्षापासून काही भागातील रस्त्यावर विद्युत खांब नसल्याने रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य असते. रात्री रस्त्यावर लाईट नसल्यामुळे महिलांना रस्त्यावर ये -जा करता येत नाही. अनेक विद्यार्थीनी संध्याकाळी शिकवणीसाठी घराबाहेर ये- जा करत असतात. या अंधाराचा फायदा घेऊन काही टवाळखोर त्या ठिकाणी विद्यार्थिनींची छेडछाड काढण्याच्या घटनाही…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रीडा व युवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद यांच्यावतीने अकोला येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सरस्वती भुवन इंग्लिश मीडियम स्कूल ची इशप्रित कटारिया या विद्यार्थिनी रोप्य पदक व भुसावळ येथे झालेल्या ऑल इंडिया बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये कास्य पदक पटकवल्याबद्दल आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते इशप्रित कटारिया हिचा सत्कार करण्यात आलाआमदार शंकर जगताप यांनी तिच्या पुढील भावी वाटचाली करता शुभेच्छा देत तिचे अभिनंदन केले त्याप्रसंगी शाळेच्या संस्थापिका जागृती धर्माधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा कांबळे ,प्रायमरीच्या मुख्याध्यापिका माया बायस वैशाली ढिसाळ ( समन्वयक ) ,शाळेचे इतर शिक्षक वर्ग व मुल मुली उपस्थित होत्या इशप्रित कटारिया…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथे मुंबई-पुणे महामार्ग ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या दिशेने जाणा-या मार्गादरम्यान असलेल्या रेल्वे मार्गावर नव्याने पूल उभारण्याबाबतच्या विषयासह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या विशेष बैठकीत मान्यता दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय प्रशासक सिंह यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. या विषयांना प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम यांच्यासह विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. चिंचवड येथील रेल्वे मार्गावर मुंबई-पुणे…
शालेय वयातच विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम समजून सांगणे गरजेचे ‘पेस’ संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – व्यसन म्हणजे काय ? व्यसनाचे दृष्टचक्र कसे असते, त्या चक्रामध्ये एकदा अडकले की त्याचे होणारे दुष्पपरिणाम… म्हणून व्यसनापासून कसे दूर राहता येईल, ही माहिती देतानाच ‘मी स्वतः व्यसन करणार नाही आणि दुसऱ्यांनाही व्यसन करू देणार नाही’, अशी विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. दरम्यान, शालेय वयातच विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम समजून सांगितल्यास त्यांचे जीवन उज्ज्वल बनल्याशिवाय राहणार नाही. निमित्त होते, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालयामध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्तीवर आधारित व्याख्यानाचे. आज समाजात वावरत असताना विद्यार्थ्यांना अनेक बाह्य गोष्टी आकर्षित करीत असतात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – रावेत येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (PCACS) महाविद्यालयात ‘करिअर जागरूकता आणि परीक्षा तयारी शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात हिंजेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या संधी, योग्य करिअर निवडीच्या परीक्षा तयारीसाठी आवश्यक असलेल्या कार्यक्षम पद्धतीवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले. मार्गदर्शन दुर्गेश पुराणिक आणि राजेश पाटील यांनी केले. यामध्ये विद्यार्थ्यांना विविध करिअर पर्यायांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना त्यांचे वैयक्तिक गुण वैशिष्ट्य आणि आवड लक्षात घेऊन योग्य करिअर निवडण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. परीक्षा तयारीसाठी कार्यक्षम…
