ठेकेदारांवर रस्त्यांच्या दोष दायित्वचा कालावधी निश्चित


पीएमआरडीएच्या आयुक्तांनी घेतली भूमिका; कंत्राटदारावर रस्ता दुरुस्तीची जबाबदारी



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विकसित केलेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा उत्कृष्ट असावा, यावर भर देण्यात येत आहे. यात रस्त्याच्या कामासंदर्भात संबंधित ठेकेदारांवर दोष दायित्वाचा कालावधी निश्चित आहे. आगामी काळात निर्धारित कालावधीत जर रस्ता खराब झाल्यास तो दुरुस्त करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर असते. याबाबत पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित निर्णयाची अंमलबजावणीचे सक्त निर्देश दिले आहे.

पीएमआरडीएचे कार्यक्षेत्र व्यापक असल्यामुळे सातत्याने विविध विकास कामे सुरू असतात. संबंधित कामे उत्कृष्ट आणि दर्जेदार व्हावी, या उद्देशाने महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित विभागांना निर्देश दिले आहेत. यात प्राधिकरणाने विकसित केलेल्या रस्त्याच्या कामाबाबत निर्धारित कालावधीपर्यंत संबंधित ठेकेदारांवर दोष दायित्वाचा कालावधी निश्चित केलेला असतो. याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जबाबदार यंत्रणेस दिले आहेत. दोष दायित्वाचा कालावधी रस्त्याच्या कामानुसार ३ ते ५ वर्षाचा आहे. यादरम्यान रस्ता खराब झाल्यास तो संबंधित ठेकेदाराने दुरुस्त करून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.
साधारण दीडशे किलोमीटर रस्त्यांची कामे
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सन २०१९-२० ते २०२३-२४ पर्यंत एकूण १४८ किलोमीटरपेक्षा अधिक रस्त्यांची कामे झाली आहे. यात मावळ तालुक्यात 14.53 खेड 15.24 मुळशी १४, भोर 7.25, वेल्हे 5.35, हवेली 26.3, पुरंदर 22.1, दौंड 7.85 आणि शिरूर तालुक्यात 35.5 किलोमीटरची रस्यांची कामे विविध ठेकेदारांच्या माध्यमातून करण्यात आली.
तालुकानिहाय कामांची संख्या
नागरिकांना सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने जिल्ह्याभरात ९२ रस्त्यांची कामे करण्यात झाली आहे. यात सर्वाधिक कामे हवेली, पुरंदरसह शिरूर तालुक्यातील आहे. यासह मावळ, खेड आणि वेल्हे तालुक्यातील प्रत्येकी ६, मुळशी ९, भोर ८, हवेली 26, दौंड ५, पुरंदर व शिरूर प्रत्येकी १३ रस्त्यांची कामे करण्यात आली आहे.
*तीन ते पाच वर्षाचा दोष दायित्व कालावधी*
पीएमआरडीएच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने रस्त्यांची कामे करण्यात आलेली आहे. यात रस्त्यांची सुधारणा, रुंदीकरण, काँक्रिटीकरणाचे समाविष्ट आहे. संबंधित कामे ठेकेदारांच्या माध्यमातून करण्यात आली असून त्यांच्यावर संबंधित कामानुसार दोष दायित्वाचा कालावधी साधारणतः ३ ते ५ वर्षाचा निश्चित केला आहे. या कालावधीत जर रस्ता खराब, नादुरुस्त झाला तर तो संबंधित ठेकेदाराने तातडीने दुरुस्त करून देणे बंधनकारक आहे.
जिल्ह्याभरात पीएमआरडीएच्या माध्यमातून रस्त्यांची कामे करण्यात आलेली आहे. संबंधित रस्ते दर्जेदार व्हावेत, या उद्देशाने ठेकेदारांवर दोष दायित्वाचा कालावधी निश्चित केला आहे. यादरम्यान रस्ते खराब झाल्यास, संबंधित गाव, भागातील नागरिकांनी याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे अर्ज करावे.
– डॉ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त पीएमआरडीए








