ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ते भक्तीशक्ती टप्प्याचे काम जलद गतीने सुरु

Spread the love

 

पुणे मेट्रोच्या टप्पा-१ उत्तरेकडील विस्ताराचे काम वेगात सुरु

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) संचालित पुणे मेट्रो प्रकल्पाच्या टप्पा-१ चे काम सप्टेंबर २०२४ रोजी पूर्ण होऊन टप्पा-१ वरील प्रवासी सेवेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांच्या सोयीकरिता टप्पा-१ चे उत्तर (पीसीएमसी) व दक्षिण (स्वारगेट) टोकाला विस्तारीकरणाचे काम महामेट्रोने हाती घेतले आहे. त्यातील उत्तर विस्तारीकरण म्हणजे पीसीएससी ते भक्तीशक्ती ह्या एकूण ४.५१९ किमी अंतराच्या प्रस्तावित उन्नत मार्गिकेचे काम जलद गतीने सुरु आहे. पिंपरी – चिंचवड महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस यांच्याकडून उत्तम सहकार्य मिळत असून आवश्यक त्या परवानगी मिळाल्या आहेत.

औद्योगिक क्षेत्र, डिफेन्स, शासकीय कार्यालय आणि विविध महाविद्यालयांमुळे या मार्गावर वाहनचालकांची मोठी गर्दी होताना निदर्शनास येते. यामुळे वाहन चालवताना होणारा त्रास आणि आणि वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी आगामी काळात मेट्रो सर्वांकरिता फायदेशीर ठरणार आहे. सध्या या ठिकाणी वाहतुकीचे सुयोग्य व्यवस्थापन करून मेट्रोचे कार्य पूर्ण केले जात आहे. या भागात मेट्रोच्या कार्याला स्थानिक नागरिक व तसेच नागरी प्रशासनाचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

आतापर्यंत झालेल्या कार्याची अधिकृत आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.

– फाऊंडेशन १५१ पैकी २८,
– पियर १५१ पैकी १३,
– सेगमेंट कास्टिंग १३३७ पैकी २०१

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button