Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )   रयत विद्यार्थी विचार मंच संस्था शिक्षण, रोजगार,आरोग्य, क्रीडा,कला,महिला सक्षमीकरण या क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात २०१७ पासून कार्यरत आहे. सांगण्यात अतिशय आनंद होत आहे कि यावर्षी संस्थेचा ०७ वा वर्धापन दिन साजरा करित आहोत. या उभरत्या समाजाची उभारणी करणाच्या हातांना प्रोत्साहन व कौतूक म्हणून सलग दुसऱ्या वर्षी  संस्था  महाराष्ट्रातील  प्रा. स्वामीराज भिसे यांना शिक्षण क्षेत्रातील कर्मवीर भाऊराव पाटील रयत गौरव पुरस्कार, चंद्रकांत जगताप यांना रोजगार क्षेत्रातील रतन टाटा रयत गौरव पुरस्कार,  डॉ.फैज सय्यद यांना आरोग्य क्षेत्रातील संत मदर तेरेसा रयत गौरव पुरस्कार, हर्ष राऊत व   विजय कापसे यांना कला क्षेत्रातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रयत गौरव पुरस्कार, …

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर येथील  संरक्षण खात्याच्या ताब्यात असलेल्या  क्रिस्टल हॉटेल, ट्राइज सोसायटी ते नॅचरल आइस्क्रीम कॉर्नर जोडला जाणाऱ्या रस्त्याच्या संरक्षण भिंतीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.मा.विरोधी पक्षनेता विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी महानगरपालिके कडे या कामासंदर्भात   सातत्याने पाठपुरावा  केला.या कामाची आज महापालिकेचे संबंधित अधिकारी स्थापत्य विभागाचे डेप्युटी सुनील शिंदे ,क्लीम्सी कन्स्ट्रक्शन चे हबीब ,सल्लागार प्रतिनिधी  यांच्यासोबत पहाणी केली. हा रस्ता  १८ मीटर रुंद आणि ९२० मीटर लांबीच्या ‘डीपी’ रस्ता आहे. या रस्त्याच्या निर्मितीसाठी १४ कोटी ८२ लाख ८९ हजार रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. संरक्षण खात्याच्या ताब्यात असलेल्या जागेचे महापालिकेकडे हस्तांतरण झाले…

Read More

नवनियुक्त कामगार मंत्र्यांशी लवकरच शिष्टमंडळाची चर्चा – मंत्री अतुल सावे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांचे सुमारे दोन महिन्यापासून ऑनलाइन पद्धतीने कामकाज पूर्ण ठप्प झालेले असून लाखो बांधकाम कामगारांचे विविध योजना रखडल्या आहेत. विविध मागण्या घेऊन विधिमंडळ हिवाळी अधिवेशनामध्ये नागपुर येथे महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील कामगारांनी हजारोच्या संख्येने मोर्चाद्वारे धडक देत आपल्या मागण्यांचा आवाज बुलंद केला. यात पिंपरी चिंचवड सह पुणे जिल्ह्यातील कामगारांचा मोठा सहभाग होता. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संयुक्त समिती व कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने यशवंत स्टेडियम येथून मोठ्या घोषणा देत आपल्या मागण्या चे फलक घेऊन मोर्चास सुरुवात झाली विधानमंडळाच्या प्रवेशद्वारासमोर आल्यानंतर पोलिसांनी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- चिंचवड येथील श्रीमन महासाधु श्रीमोरया गोसावी महाराज यांच्या ४६३व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमांसह या सोहळ्यात मोरया भक्तांसाठी दंत व नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर यावेळी उपस्थित गणेश भक्तांच्या सहकार्याने ‘श्रीं’चा सामुदायिक महाअभिषेकही यावेळी संपन्न झाला. माजी नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे यांच्या वतीने या शिबिराचे व सामुदायिक महाअभिषेक पूजेचे आयोजन केले होते. या शिबिरात सुमारे २८६ नागरिकांनी नेत्र तपासणी शिबिराचा तर १६९ नागरिकांनी दंत शिबिराचा लाभ घेतला. नेत्र शिबिरासाठी डॉ. शरद चव्हाण, डॉ रवींद्र चव्हाण यांचे सहकार्य लाभले. तसेच नेत्र तपासणी शिबिरासाठी…

Read More

पुणे – (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – हिंदू धर्म हा शाश्वत धर्म असून, या चिरंतन व सनातन धर्मातील आचार्य सेवाधर्माचे पालन करतात, हा सेवा धर्म म्हणजेच मानव धर्म आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काढले. हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेच्या वतीने शिक्षण प्रसारक मंडळीच्या महाविद्यालयाच्या मैदानात हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.येत्या २२ डिसेंबर पर्यंत हा महोत्सव सुरु आहे. हिंदू संस्कृती, संस्कार आणि सामाजिक सेवाकार्याची माहिती सादर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक देवस्थाने, सामाजिक, धार्मिक संस्था, मठ मंदिरांच्या सेवाकार्याचा त्यात सहभाग आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वामी…

Read More

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिखली येथील प्रज्ञानबोधिनी इंग्लिश मीडियम शाळेत आजी आजोबा मेळावा उत्साहात संपन्न झाला. शाळेच्या द्विदशकपूर्ती वर्षाच्या निमित्ताने हा मेळावा आयोजित केला होता. सुमारे 100 आजी आजोबा यावेळी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक सचिव श्री यादवेंद्र जोशी व अध्यक्ष मदनलाल कांकरिया हे यावेळी उपस्थित होते. प्राथमिक व माध्यमिक च्या निवडक विद्यार्थ्यांनी नृत्यद्वारे गणेश वंदना सादर केली. सहावी व सातवीच्या मुलींनी स्वागत गीत सादर केले. बाल वर्गाच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन प्रदर्शन केले. कृष्णा कृष्णा हे बडबड गीत विद्यार्थ्यांनी सादर करून गोष्टी सांगितल्या व गाणी म्हटली. संगीत व नाटकांनी कार्यक्रमात रंगत आणली. इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी तबल्यांची…

Read More

चिंचवड देवस्थान ट्रस्ट, संस्कृती संवर्धन विकास महासंघ व स्थानिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांचा ४६३वा संजीवन समाधी सोहळा चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ओम नमस्ते गणपतये… ओम गणपतये नमः … ‘मोरया, मोरया’च्या जयघोषाने हजारो मोरया भक्तांनी पहाटे एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या ४६३ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सामूहिक अथर्वशीर्ष पठण भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. चिंचवड देवस्थान ट्रस्ट, संस्कृती संवर्धन विकास महासंघ व स्थानिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने या अथर्वशीर्ष पठणचे आयोजन करण्यात आले होते. गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी व अनेक शाळकरी…

Read More

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त व्याख्यानाचे आयोजन चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी फक्त देशातून नव्हे तर थेट शत्रूच्या घरात घुसून स्वातंत्र्याची लढाई लढली. इंग्लडमधील ज्या ‘इंडिया हाऊस’ मध्ये वास्तव्य करून सावरकरांनी या स्वातंत्र्यलढ्याचे प्रतिनिधित्व केले. त्याच इंडिया हाऊसच्या बाहेर आज तेथील ब्रिटिश सरकारने सावरकरांच्या गौरवार्थ फलक लावला आहे. म्हणजे ज्या इंग्रज सरकारविरोधात लढण्यात सावरकरांनी आपले आयुष्य पणाला लावले त्या शत्रूने त्यांचा गौरव केला. मात्र दुसरीकडे ज्या देशवासीयांसाठी त्यांनी हा लढा लढला त्याच देशवासीयांकडून आज त्यांची उपेक्षा होत आहे, यासारखी दुसरी शोकांतिका नाही, असे प्रतिपादन व्याख्यात्या अपर्णा कुलकर्णी यांनी केले. चिंचवड देवस्थान…

Read More

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांचा ४६३ वा संजीवन समाधी सोहळा चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या ४६३ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने नामवंत गायक पं. संजीव अभ्यंकर यांचा ‘स्वररंजन’ हा भक्तीगीतांचा कार्यक्रम श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिराच्या प्रांगणात आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरवातीला चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, ॲड. राजेंद्र उमाप, ॲड. देवराज डहाळे यांच्या हस्ते पं. संजीव अभ्यंकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला. ‘तुज नमन असो प्रथमेशा’ या पं. संजीव अभ्यंकर यांनी गेलेल्या श्रीगणेश वंदनेने ‘स्वरसंजीवन’…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहरातील विविध भागातील रस्ते दुरुस्ती करणे, परिसरातील स्थापत्य विषयक दुरुस्ती कामे करणे, अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटविणे यासह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या विशेष बैठकीत मान्यता दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये  महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय प्रशासक  सिंह यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. या विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम यांच्यासह विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. कस्पटे वस्ती, वेणू नगर, कावेरी…

Read More