पिंपळे सौदागर येथील संरक्षण खात्याच्या ताब्यात असलेल्या डी.पी.रस्त्याच्या कामाची माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्याकडून पहाणी





या रस्त्यामुळे नाशिक फाटा ते जगताप डेअरी या बीआरटी मार्गालगतच्या स्वराज गार्डन, क्रिस्टल हॉटेल, योगा पार्क, आणि ट्राइज सोसायटीकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. हा रस्ता नाशिक फाट्याकडून कोकणे चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करणारा आहे. तसेच काटे वस्ती, गोविंद गार्डन आणि ट्राइज सोसायटीकडे वाहने सहज जाऊ शकतील त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. या रस्त्यामुळे परिसरातील सुमारे पंचवीस हजार नागरिकांना लाभ होणार आहे. नाशिक फाटा, कोकणे चौक आणि गोविंद गार्डन परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. हिंजवडी आणि वाकडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एक सोयीचा मार्ग ठरणार. प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे .रस्त्याचे काँक्रिटीकरण १० मीटर रुंदीचे राहणार. वाहन चालकांना सुकर प्रवास अनुभवता येईल.
तसेच पादचारी आणि सायकलस्वारांच्या सुरक्षेचा विचार करून हा रस्ता बनविला गेला आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना २ मीटर रुंद पदपथ आणि एका बाजूस १.५ मीटर रुंद सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे.त्यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.








