Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील इयत्ता नववीची विद्यार्थिनी दुर्वा वाजे हिने नुकत्याच झालेल्या (SFA ) स्पोर्ट्स फॉर ऑल चॅम्पियनशिप, पुणे या स्पर्धेत तायक्वांदो अंडर-५२ या वजन गटात अप्रतिम  कौशल्ये दाखवत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात रौप्य पदक प्राप्त केले. दुर्वाला चंद्रकांत ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा व पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी दूर्वा वाजेचे कौतुक करत तिला…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – पीसीईटीच्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकतेच ‘सेलेस्टियल नाईट’ या खगोलशास्त्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टीम अनंतम या महाविद्यालयाच्या रॉकेट्री आणि स्पेस रिसर्च टीम तर्फे आयोजित या कार्यक्रमाचे नेतृत्व कार्यकारी संचालक पार्थ बिरवटकर आणि व्यवस्थापकीय संचालक अथर्व शितोळे यांनी केले.     या कार्यक्रमाला ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दोन दुर्बिणींच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी शुक्र, गुरू व त्याचे चार चंद्र, शनी व त्याच्या कड्या, तसेच चंद्राचे अविस्मरणीय दर्शन घेतले.     विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचा अनुभव देण्यासाठी आणि अवकाश विज्ञानाची गोडी लागावी या उद्देशाने ‘सेलेस्टियल नाईट’ सारख्या कार्यक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात येणार आहे अशी माहिती…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून, ही व्याख्यानमाला येत्या २६, २७ आणि २८ डिसेंबर रोजी इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे उपस्थित होते. व्याख्यानमालेचे यंदाचे १० वे वर्ष आहे. व्याख्यानमालेतील उद्घाटनाचे पुष्प २६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता लोकसभेच्या माजी सभापती प‌द्मभूषण सुमित्रा महाजन गुंफणार आहेत. ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावर त्या बोलणार आहेत. या पहिल्या पुष्पाचे अध्यक्षस्थान इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्य मंत्रिमंडळाचे बहुप्रतिक्षित खातेवाटप शनिवारी रात्री जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, सामान्य प्रशासन (जीएडी), ऊर्जा (नवीनीकरण ऊर्जा वगळून), विधी व न्याय आणि माहिती-जनसंपर्क ही खाती असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास बरोबरच गृहनिर्माण आणि सार्वजिनक बांधकाम (सार्वजिनक उपक्रम म्हणजे एमएसआरडीसी) तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व उत्पादन शुल्क हे खाते असेल. महत्त्वाचे मानले जाणारे महसूल खाते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे. शिंदेसेनेचे दादा भुसे हे राज्याचे नवे शालेय शिक्षण मंत्री असतील. प्रताप सरनाईक यांना परिवहन, पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झालेले भाजपचे आकाश फुंडकर हे नवे कामगार मंत्री असतील.…

Read More

पुणे पुस्तक महोत्सवात तिसरा विश्वविक्रम: फुगे सोडून आनंदोत्सव पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पुणे पुस्तक महोत्सवात भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पुस्तकरूपी संविधान प्रतिकृती उभारण्याचा जागतिक विश्वविक्रम शनिवारी करण्यात आला आहे. या विक्रमासाठी तब्बल ९७ हजारांपेक्षा अधिक पुस्तकांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या पुस्तक महोत्सवात तिसरा विश्वविक्रम झाला आहे. या विक्रमाच्या निमित्ताने आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून, आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, संयोजन समितीचे सदस्य प्रविण तरडे, बागेश्री मंठाळकर, प्रसेनजीत फडणवीस, राहुल पाखरे, डॉ. संजय चाकणे, मंदार जोशी, मिलिंद कांबळे, सुनील भंडगे,…

Read More

काला म्हणजे सामाजिक ऐक्य आणि भक्त व देवामधील प्रेमाचे दर्शन – ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील महापूजा, नगरप्रदक्षिणा, कीर्तन, धुपारती आणि भव्य आतिषबाजीबरोबरच ढोलताशा पथकाकडून ‘श्रीं’ना मांवनदना सुमारे १ लाख मोरया भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – ह.भ.प. पुरुषोत्तम दादा पाटील यांच्या काल्याच्या किर्तनासह महापूजा, नगरप्रदक्षिणा, या धार्मिक कार्यक्रमांनी आणि भव्य आतिषबाजीबरोबरच महाप्रसादाने व धुपारतीने श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या ४६३ व्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता झाली. समारोपाच्या दिवशी पहाटे चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव आणि चिंचवड ब्रम्हवृंद यांच्या श्रींच्या संजीवन समाधीची विधिवत महापूजा करण्यात आली. त्यानंतर त्यानंतर मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमामध्ये सुधारणा करण्यासाठी सन २०२४ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३१ वर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान आमदार अमित गोरखे यांनी मुद्रांक शुल्क आणि स्टॅम्प पेपरच्या वापराबाबत काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेतील चर्चेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे.. स्टॅम्प पेपरचे दरवाढ धोरण: १०० व २०० रुपयांचे स्टॅम्प पेपर बंद करून किमान ५०० रुपयांचे स्टॅम्प पेपर उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे. ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची दरवाढ किती कालावधीसाठी स्थिर ठेवली जाणार? दरवर्षी मुद्रांक शुल्क पेपरांची छपाई आणि सध्याच्या उपलब्धतेंचा आढावा घेऊन १०० व २००…

Read More

खरबडे युथ फाउंडेशनच्या वतीने स्व.सोपान दादा खरबडे यांच्या स्मरणार्थ भोसरी येथे रक्तदान शिबीर, अंधः मुलांना अन्नदान करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी येथे खरबडे यांच्या स्मरणार्थ ” रक्त दान हेच श्रेष्ठ दान ” समजून सिरोजिकल इन्स्टिट्यूट ब्लड सेंटर पुणे या रक्तपेढीला 75 रक्त बाटल्यांचे संकलन करून देण्यात आले. आपल्याला समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि ते दिले पाहिजे दत्त भावनेतून पांजरपोळ येथील अंधःशाळेतील ८० विद्यार्थांना अन्नदान करण्यात आले.त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गौशाला ट्रस्ट येथे गौमातेला १० क्विंटल चाऱ्याचे वाटप करण्यात आले त्यानंतर श्री.स्वामी समर्थ विद्यामंदिर लांडेवाडीतील येथे १०० विद्यार्थांना शालेय दफ्तर वाटण्यात आले. विविध…

Read More

अनधिकृत फलकांविरोधात महापालिकेची कारवाई तीव्र पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात कारवाई तीव्र केली असून गेल्या दोन महिन्यांत सुमारे ३६ हजार अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, फ्लेक्स आणि किऑक्स हटविण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त अनधिकृत फलकधारकांकडून आतापर्यंत सुमारे ४७ हजार रुपये दंड वसूल केला असून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात २ गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. १४ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या पहिल्या मोहिमेमध्ये २८ हजार अनधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि होर्डिंग्ज हटवण्यात आले. तर विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीनंतर २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या…

Read More

आमदार शंकर जगताप यांनी विधान सभेत उपस्थित केला औचित्याचा मुद्दा चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – निळ्या पूर रेषेतील बाधित जुन्या अधिकृत बांधकामांना वाढीव टीडीआर देऊन पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केला जावा, अशी आग्रही मागणी आमदार शंकर जगताप यांनी आज (शनिवारी) विधानसभेत केली. आमदार जगताप यांनी चिंचवड मतदारसंघातील निळ्या पूर रेषेतील जुन्या अधिकृत बांधकामांबाबत औचित्याचा मुद्दा विधान सभेत उपस्थित केला. जगताप म्हणाले की, चिंचवड, रावेत वाकड, ताथवडे, पुनावळे, सांगवी, पिंपळे गुरव या पवनानदीच्या पात्रालगत व त्याच बरोबर इंद्रायणी आणि मुळा नदीच्या दाट वस्तीत असलेल्या जुन्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे त्या इमारतींमधील पार्किंग व्यवस्था अपुरी पडत आहे.या परिस्थितीमध्ये त्या जुन्या…

Read More